नेहमी Gratitude स्टेजमध्ये रहा...
नेहमी Gratitude स्टेजमध्ये रहा... 👉 मित्रांनो, एक वडील आणि त्यांचा 15 वर्षाचा मुलगा एका रेल्वे मध्ये बसलेले असतात. थोडयावेळाने रेल्वे सुरु होते. मुलगा खिडकी बाहेर पाहतो आणि वडिलांना काही प्रश्न विचारतो. बाबा बाबा हे काय आहे. बाबा सांगतात बाळा ते झाडे आहेत...🌳 पुन्हा थोड्या वेळाने मुलगा प्रश्न विचारतो, बाबा बाबा हे काय आहे... बाबा म्हणतात बाळा ते पक्षी आहेत...🦜 पुन्हा थोड्या वेळाने मुलगा प्रश्न विचारतो बाबा बाबा हे काय आहे. त्यावर वडील म्हणतात बाळा ते पर्वत आहेत...⛰️ मुलगा पुन्हा थोड्या वेळाने प्रश्न विचारतो बाबा बाबा हे काय आहे. बाप मुलाला म्हणतो बाळा ते तलाव आहे... 👉 हे पाहुन समोरच्या सीटवर बसलेला व्यक्ती त्या मुलाच्या बापाला म्हणतो तुम्ही या पागल मुलाचा इलाज का करत नाही...??? त्यावर वडील म्हणतात माझ्या मुलाचे कालच डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे... आणि आजच तो हे नवीन जग पाहत आहे...😊 👉 मित्रांनो, एक विचार करा... जो व्यक्ती हे जग पाहु शकत नाही... त्यांच्यासाठी हे जग कसे असेल... तो व्यक्ती देवाच्या मंदिरात गेल्यावर देवाला काय मागत असेल.??? यावर थोडा विचार करा...