छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या

मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का?? समुद्रातील मोठे जहाज, एका छोट्याशा छिद्रामुळे समुद्रात बुडवू शकते...🛳️ सांगण्याचे तात्पर्य असे आहे की, आपण नेहमी छोट्या छोट्या गोष्टीकडे खूप दुर्लक्ष करत असतो... कधी कधी एखादे महत्त्वाचे काम असुन पण आपण ते काम पूर्ण करत नाही... जे होईल ते पाहता येईल, आशा निगेटिव्ह अटीट्युडमध्ये आपण राहत असतो... आणि ह्याच छोट्या छोट्या सवयी माणसाला उधवस्त करतात... आयुष्य खराब करतात... 👉 मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टी माणसाच्या जीवनात खूप मोठा बदल करू शकतात... आणि छोट्या छोट्या गोष्टी केल्यानेच माणुस परिपूर्ण होतं असतो... जो पर्यंत तुम्ही तुमच्या क्षेत्रात परिपूर्ण होतं नाही, तो पर्यंत तुम्हाला यश मिळणारच नाही... तुम्हाला एका उदाहरणं सांगतो, जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात येईल... 👉 मित्रांनो, कल्पना करा... उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. तुम्ही मार्केटमध्ये एक माठ विकत घ्यायला जाता... माठ विकत घेण्याआधी तुम्ही माठ आतुन बाहेरून बरोबर आहे का हे पाहता..... मटक्याला बोटाने किंवा बोटामधल्या अंगठीने थोडं वाजवून पाहता... कारण मटक्याचा जेवढा कडक आवाज येईल तेवढे मटके चांगले...