Motivation आणि Discipline यशाचा खरा मंत्र
Motivation आणि Discipline यशाचा खरा मंत्र विद्यार्थी जीवन हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे पर्व असते. याच काळात घडलेले संस्कार, सवयी आणि निर्णय भविष्यातील यश किंवा अपयश ठरवतात. आज अनेक विद्यार्थी यशस्वी होण्याचे स्वप्न पाहतात, मोठी ध्येये ठरवतात, पण त्यापैकी काहीच विद्यार्थी त्या ध्येयांपर्यंत पोहोचतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे Motivation आणि Discipline यांच्यातील फरक समजून न घेणे. 👉🏻 आपल्याला अनेकदा एखादे प्रेरणादायी भाषण ऐकून किंवा एखादा यशस्वी व्यक्तीचा व्हिडिओ पाहून खूप उत्साह येतो. त्या क्षणी वाटते की आता आपण खूप मेहनत करू, वेळ वाया घालवणार नाही आणि आयुष्यात काहीतरी मोठे करून दाखवू. पण काही दिवसांनी तो उत्साह कमी होतो आणि पुन्हा जुन्याच सवयी सुरू होतात. यालाच Motivation म्हणतात. 👉🏻 Motivation म्हणजे एखादे काम करण्यासाठी मिळणारी प्रेरणा. ती आपल्याला सुरुवात करायला मदत करते. पण Motivation कायम टिकत नाही. ती हवामानासारखी बदलत राहते. कधी ती खूप असते तर कधी अजिबात नसते. 📌 याउलट Discipline म्हणजे स्वतःला दिलेले वचन पाळणे. मन नसतानाही योग्य काम करणे. अ...