छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या

 


मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का??

समुद्रातील मोठे जहाज, एका छोट्याशा छिद्रामुळे समुद्रात बुडवू शकते...🛳️

सांगण्याचे तात्पर्य असे आहे की, आपण नेहमी छोट्या छोट्या गोष्टीकडे खूप दुर्लक्ष करत असतो... कधी कधी एखादे महत्त्वाचे काम असुन पण आपण ते काम पूर्ण करत नाही...जे होईल ते पाहता येईल, आशा निगेटिव्ह अटीट्युडमध्ये आपण राहत असतो...

आणि ह्याच छोट्या छोट्या सवयी माणसाला उधवस्त करतात... आयुष्य खराब करतात...

👉 मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टी माणसाच्या जीवनात खूप मोठा बदल करू शकतात... आणि छोट्या छोट्या गोष्टी केल्यानेच माणुस परिपूर्ण होतं असतो...

जो पर्यंत तुम्ही तुमच्या क्षेत्रात परिपूर्ण होतं नाही, तो पर्यंत तुम्हाला यश मिळणारच नाही...

तुम्हाला एका उदाहरणं सांगतो, जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात येईल...
👉 मित्रांनो, कल्पना करा... उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत.

तुम्ही मार्केटमध्ये एक माठ विकत घ्यायला जाता...माठ विकत घेण्याआधी तुम्ही माठ आतुन बाहेरून बरोबर आहे का हे पाहता.....

मटक्याला बोटाने किंवा बोटामधल्या अंगठीने थोडं वाजवून पाहता... कारण मटक्याचा जेवढा कडक आवाज येईल तेवढे मटके चांगले भाजलेले असते... टणक आणि मजबूत असते...

तुम्ही दोन तीन मटके पाहता आणि नंतर एक चांगले मटके निवडता...

तुम्ही दुकानदाराला... मटक्याचा भाव विचारता....

दुकानदार म्हणतो, 100 रुपयाला एक मटके आहे...

तेवढ्यात तुम्हाला दिसते की, तुम्ही जे मटके विकत घेत आहात त्याला खालच्या बाजूने छोटसे छिद्र आहे...

तुम्ही लगेच दुकानदाराला म्हणता की, हा माठ तर फुटका आहे...

तेंव्हा दुकानदार तुमच्यासमोर दोन ऑपशन ठेवतो...

A) मला 20 रुपये कमी द्या... 80 रुपयामध्ये माठ विकत घ्या...घरी जाऊन छिद्र बुजवून घ्या...

किंवा

B) 100 रुपयामध्ये दुसरा माठ खरेदी करा...

मित्रांनो, आता मला सांगा तुम्ही कोणते ऑपशन निवडाल...🙄

👉 काही ठराविक लोकच A ऑपशन निवडतील...परंतु जे हुशार लोक असतील ते ऑपशन B निवडतील... कारण प्रत्येक व्यक्तीला परिपूर्ण गोष्टी हव्या असतात...

मित्रांनो, जगातील प्रत्येक व्यक्तीला कोणतीही गोष्ट चांगली आणि परिपूर्ण पाहिजे असते....

तुम्ही मार्केटमध्ये शॉपिंग करायला जाता...
ड्रेस खरेदी करत असताना आपल्या आवडीचा रंग निवडता... ड्रेस अंगात बरोबर येईल असाच ड्रेस खरेदी करत असता...

पैसे देऊन तुम्ही लहान मोठा ड्रेस, किंवा फाटका ड्रेस अजिबात खरेदी करत नसता...

कोणतीही गोष्ट घेताना तुम्ही परफेक्ट पाहता...आणि नंतरच खरेदी करत असता...बरोबर ना

👉 मित्रांनो, एक विचार करा...
तुम्ही 100 रुपयाची वस्तू खरेदी करण्या अगोदर खूप साऱ्या पद्धतीने पाहता, प्रश्न करता आणि नंतर खरेदी करता....

मग विचार करा,
जो व्यक्ती स्वतःचे लाखो रुपये खर्च करून एखादी कंपनी सुरु करतो, हॉटेल सुरु करतो, तो व्यक्ती त्याच्या कंपनीमध्ये कोणत्या व्यक्तीला अथवा कोणत्या मुलांना जॉब देईल...

परिपूर्ण ज्ञान असलेल्या व्यक्तीला जॉब देईल की अर्धवट ज्ञान असलेल्या व्यक्तीला जॉब देईल...

साहजिकच आहे,
👉 जो व्यक्ती परिपूर्ण असेल त्यालाच जॉब देईल....

मित्रांनो, जो व्यक्ती परिपूर्ण असतो, त्याच्यासाठी कुठेही जॉब उपलब्ध असतात...

आता स्वतःला प्रश्न विचारा की, तुम्ही तुमच्या क्षेत्रात, तुमच्या कामात परिपूर्ण आहात का...??

तुम्ही जर परिपूर्ण नसाल तर आजपासून स्वतःला काही दिवस, काही महिने द्या आणि परिपूर्ण व्हा...

जो व्यक्ती त्याच्या क्षेत्रात परिपूर्ण असतो तोच व्यक्ती यशस्वी असतो...💫

धन्यवाद... 🙏🏻🌹😇

✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

छोट्या छोट्या सवयीचे मोठे फायदे...🧘‍♂️