पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

  स्वतःचा दृष्टीकोन सुधारा 👉 एकदा एका कुटुंबाच्या समोरच्या घरात नवीन भाडेकरू राहायला येतात. खिडकीतून त्यांचे दोरीवर वाळत घातलेले कपडे पाहून बायको नवऱ्याकडे तक्रार करते की लोक खूप चांगले आहेत. पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत.  नवरा म्हणतो, साबण संपला असेल  दुसऱ्या दिवशी वाळत घातलेले कपडे पाहून बायको परत तेच वाक्य म्हणते की लोक खूप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत. कदाचित तिला कपडे चांगले धुता येत नसतील.  नवरा ऐकून घेतो असे रोज चालते.  एक दिवस पहाते तर काय चमत्कार एकदम स्वच्छ धुतलेले कपडे पाहून नवऱ्याला म्हणते, अहो ऐकलंत का? समोरच्या वहिनी सुधारल्या, त्यांना कुणीतरी कपडे धुवायला शिकवलेले दिसते. आज कपडे अगदी चकाचक धुवून वाळत घातलेत.  राणी, मी आज सकाळी लवकर उठलो आणि आपल्या खिडक्या साफ केल्या काचा आतुन आणि बाहेरून ओल्या फडक्याने पुसून घेतल्या त्यामुळे तुला ते कपडे स्वच्छ दिसतात. समोरचे नाही आपणच सुधारलोय. आपला दृष्टीकोन स्वच्छ ठेवुन आपण दुसऱ्याकडे पाहिले पाहिजे.