पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका सुताराची प्रेरणादायी कहाणी

इमेज
एक सुतार काम करणारा 60 वर्षांचा माणूस होता तो आत्ता ज्या मालकाकडे काम करत होता तिथे त्याला 40 वर्षे झाले होते. ह्या 40 वर्षाच्या काळात त्याने हजारो घरे बनवली होती. पण आता त्याला संसाराला वेळ द्यायचा होता. तो त्याच्या मालकाकडे जाऊन म्हणतो, मालक 40 वर्षे मी तुमच्याकडे इमाने इतबारे काम केले पण आता मला माझ्या संसाराला वेळ द्यायचा आहे, माझ्या मुलांबरोबर, माझ्या मुलांच्या मुलांबरोबर वेळ घालवायचा आहे. मला रिटायर व्हायचे आहे. आता मालक तर मालक असतात, जाता जाता सुद्धा आपल्या कामगारांकडून अजून थोडं काम कसं करून घ्यायचं हे त्यांना चांगलच माहिती असते. तेंव्हा मालक त्या सुताराला म्हणतो ठीक आहे. तुला रिटायर व्हायचंय तर तू होऊ शकतोस पण एक शेवटचे तीन महिन्यांचे काम आले आहे ते फक्त करून जा, ते काम झाल्यानंतर तुझा छान पैकी निरोप समारंभ करू आणि एकदम उत्साहात तुला निरोप देऊ. एवढे वर्ष मालकाने आपल्याला सांभाळून घेतलं, आपल्याला आधार दिला, हा विचार करून त्या सुताराने ते काम करायला होकार दिला. पण आता त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आला होता. त्याने विचार केला होता की मस्त घरी बसून आराम करेल, पण अजून 3

5 बेडकाची प्रेरणादायी गोष्ट...

इमेज
      5 बेडकाची प्रेरणादायी गोष्ट... 👉 मित्रांनो, 6 बेडूक एका नदीमध्ये राहत होते... नदीमध्ये राहुन राहुन ते बोर व्हायला लागतात... ते 6 बेडूक एक दिवस विचार करतात की, आपण सर्वजण जंगलात फिरायला जाऊया...आणि सर्व मिळुन ते एक दिवसी जंगलात फिरायला जातात... 😄 जंगलात फिरत असताना दुपारी त्यांना तहान लागते... ते इकडे तिकडे पाणी शोधतात, थोड्या वेळाने त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते, त्यांना एक पडकी विहिर दिसते...  👉 सर्वजण त्या विहिरीजवळ धावत जातात आणि लगेच त्या विहिरीत उडया मारतात... पोटभर पाणी पितात, विहिरीमधले किडे वैगरे खातात आणि तेथेच मुक्कामी राहतात...  काही दिवसानंतर त्या विहिरीतले पाणी कमी व्हायला लागते... त्यामुळे 6 ही बेडूक विहीरी बाहेर निघण्याची तयारी करतात...  वरती येण्यासाठी 6 ही बेडूक खूप प्रयत्न करतात परंतु वरती येताना घसरण एवढी होती की, पाय घसरून ते खाली पडायचे... वरती येण्याचा 6 ही बेडूक खूप प्रयत्न करत होते परंतु त्यांना अपयशच येत होते...  प्रयत्न करुनसुद्धा यश मिळत नाही म्हणून 5 बेडूक विहिरीतच राहण्याचा निर्णय घेतात. आपलं काय होईल याचा निर्णय ते देवावर सोडतात...आणि दुःखी होऊन