प्रेरणादायी गोष्ट

 

👉 मित्रांनो, एका गावात एक धनंजय नावाचा व्यक्ती राहत होता. धनंजय गाई म्हशी पाळत असे... रोज सकाळी गाई म्हशीना चरायला घेऊन जाणे आणि रात्री  घरी आणणे असे त्याचे रोजच काम असे... 


धनंजय हा खूप मेहनती होता तसा तो खूप प्रेमळ आणि श्रद्धाळू सुद्धा होता... 


👉 धनंजयच्या गावाच्या बाहेर एक टेकडी होती. त्या टेकडीवर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर होते. 

धनंजय रोज सकाळी अंगोळ करायचा आणि देवाचा पाया पडायला जायचा... देव दर्शन करायचा आणि नंतर गाई म्हशी घेऊन रानात जायचा... 


एके दिवसी... एक गाय एका सुंदर वासराला जन्म देते. 


 धनंजय रोजच्या सारखा देव दर्शनसाठी जात असतो... देवाला जाताना त्याची नजर त्या सुंदर वासरावर पडते... 


धनंजयला ते वासरू खूप खूप आवडायचे त्यामुळे धनंजय देव दर्शनला जाताना त्या वासराला आपल्या पाठीवर बसुन सोबत घेऊन जायाचा... 


👉 असेच दिवसा मागे दिवस जाऊ लागलेत तसेच धनंजय सुद्धा त्या वासराला रोज आपल्या पाठीवर बसुन देवाचे दर्शनसाठी घेऊन जात... 


आता, त्या छोट्यासा वासराचे एका मोठ्या बैलामध्ये रूपांतर  झाले होते... 


धनंजय जेंव्हा त्या बैलाला आपल्या पाठीवर बसुन देव दर्शनाला जात असे तेंव्हा त्याच्या गावातले सर्व लोक आश्चर्यचकित होऊन धनंजय आणि त्याच्या पाठीवर असलेल्या बैलाला पाहत. 


👉 लोकांना कळत नसे की एवढा मोठा बैल एक सामान्य व्यक्ती रोज आपल्या पाठीवर बसुन एका टेकडीवर घेऊन जातो. देव दर्शन करतो आणि पून्हा त्या बैलाला घेऊन परत खाली येतो...


लोकांसाठी ही गोष्ट खूप नवलाची होती परंतु धनंजयसाठी ही गोष्ट रोजची होती... 


👉 धनंजय त्या बैलाला त्याच्या लहानपणापासून पाठीवर बसुन देव दर्शनसाठी घेऊन जायचा त्यामुळे धनंजयच्या शरीराला ती एक सवय लागुन गेली होती... आजपण धनंजय त्या बैलाला बैल म्हणुन पाहत नाही तर एक वासरू म्हणून पाहतो आणि त्याला रोज आपल्या पाठीवर बसुन देवाचे दर्शन घेण्यासाठी घेऊन जातो... 


मित्रांनो, मी आता जी  गोष्ट सांगितली ती पूर्ण पणे काल्पनिक आहे. परंतु त्या गोष्टीमधुन आपल्याला शिकण्यासारखे खूप काही आहे... 


👉 मित्रांनो, आपण नेहमी लहान लहान गोष्टीकडे पाहत नाही. किंवा लहान गोष्टीकडे लक्ष देत नाही. आणि त्याचं लहान गोष्टी काही दिवसाने आपल्या सवयी होऊन जातात आणि आपल्या कळत पण नाही... 


जसे की, 

1) काम समोर ढकलणे 

2) थोडा वेळ मोबाईल पाहतो नंतर अभ्यास करतो. 

3) थोडं खोटं बोलणं असेल 

4) चहा पिल्यावर कप जागीच ठेवणे. 

5) ऑफिसमधुन घरी आल्यानंतर  पायातल्या बुट चपला कुठे ही काढणे. 

6) मोबाईलची चार्जिंग फुल  झाल्यावर मोबाईल काढुन चार्जिंगचे बटन सुरूच ठेवणे.

7) आळशी पणा करणे

8) स्वतःसोबत खोटं बोलणे  

9) कार मधुन बाहेर पडल्यावर कार लॉक न करता बाहेर निघुन जाणे 

10) सकाळी झोपेतून उठल्यावर  परत गोधडी अंगावर घेऊन मोबाईल पाहत बसणे 

11 ) दुसऱ्याला काम सांगणे... 


उदाहरणं, तुम्ही मोबाईल पाहता आणि छोट्या भावाला किंवा बहिणीला पाणी आणायला सांगता... 😄

12) कार किंवा बाईकला लॉक न करता तशीच सोडुन जाणे

13) मिटिंगमध्ये हळूहळू बोलणे, दाताने ओठ दाबणे किंवा घडी घडी मोबाईल पाहणे. 

14) मोठ्या लोकांची रिस्पेक्ट न करणे 


👉 मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एवढेच आहे की, जेंव्हा आपण लहान लहान गोष्टीना नजरअंदाज करत असतो तेंव्हा आपण न कळता त्याच वाईट गोष्टी पुन्हा पुन्हा करत असतो... 


आपण जर एखादे काम 21 दिवस केले तर 21 दिवसानंतर त्या कामाची सवय  आपल्याला लागुन जाते. 


मित्रांनो, एक विचार करा...


 तुम्ही तुमचा मोबाईल किती वर्षापासुन वापरता...?


1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष 


 तुम्ही बिना मोबाईलचे 7 दिवस राहु शकता का? 


नाही राहु शकणार... बरोबर ना 


याचे कारण म्हणजे आपल्याला  मोबाईल वापरण्याची मोबाईल पाहण्याची सवय लागली आहे.    


मित्रांनो, मी असे काही विद्यार्थी पाहिले आहेत. त्यांना मोबाईलवर काहीच काम नसते तरी सुद्धा ते मोबाईलवर काही तरी TimePass करत बसतात... आणि हाच TimePass त्यांच्या आयुष्याचा सत्यानास करतो.. 😄


( मोबाईल वापरा परंतु चांगल्या कामासाठी वापरा... )


👉 जसे की,  धनंजय त्या बैलाला त्याच्या लहानपनापासून आपल्या पाठीवर बसुन रोज देवदर्शनसाठी आपल्याबरोबर नेत होता, त्यामुळे धनंजयला त्या बैलाचं वजन किती आहे किंवा आपण किती वजनाचा बैल उचलत आहोत हे त्याला अजिबात समजत नव्हते त्याचे कारण म्हणजे धनंजयच्या शरीराला ती एक सवय लागली होती... 


मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा 

आज आपण ज्या ज्या लहान गोष्टीकडे दुर्लक्ष करतो त्याच गोष्टी काही दिवसानंतर खूप मोठ्या प्रमाणात वाढतात आणि 

आपल्याला त्या वाईट गोष्टीची सवय लागुन जाते. तुम्हाला समजणार पण नाही तुम्ही त्या वाईट गोष्टीमध्ये किती गुंतून पडलेले आहात... 


त्यामुळे 

👉 प्रत्येक लहान लहान कामाकडे लक्ष द्या... प्रत्येक लहान काम कसे परफेक्ट होईल ते पाहा.


स्वतःचे काम स्वतः करण्याची सवय लावा...  

वेळेचा उपयोग चांगल्या कामासाठी करा... रोज रात्री To Do List बनवा आणि त्यानुसार काम करा... वेळात वेळ काढुन मेडिटेशन करा आणि वेळेचे नियोजन करायला शिका... 


आपण कोणाला Follow करतो  आपण रोज काय वाचतो, काय पाहतो ते हे सुद्धा तपासा... कारण तुम्ही जे पाहता आणि वाचता तसेच विचार तुम्हाला परत परत येतात...


जीवन खूप सुंदर आहे जीवनाला अजुन सुंदर बनवा... 🌹


मित्रांनो, आजचा लेख आवडला असेल तर नक्की फीडबॅक द्या...


*थोडं विशेष*

👉 ब्रेन डेव्हलोपमेंट या कोर्सची नवीन बॅच 14 नोव्हेंबर 2022 पासुन सुरु होत आहे. ज्या व्यक्तीला कोर्स मध्ये सहभाग घ्यायचा त्यांनी माझ्याशी संपर्क करावा अथवा व्हाट्सअप msg करावा... ब्रेन डेव्हलोपमेंट या कोर्सची सर्व माहिती तुम्हाला व्हाट्सअपला मिळेल.  


WhatsApp No. 9545441697


धन्यवाद... 🙏


✍️✍️ नरेंद्र दिपके 

( Coach of Personality Development )

☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा