तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे.??

 तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे...??

मित्रांनो, सर्वात आधी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या....

देवाने आपल्याला या जगात विनाकारण पाठवले असेल का...??? 

आपल्याला या जगात पाठवण्यामागे काय उद्देश असेल बरं???

मला वाटते तुमच्यापैकी काही लोकांचे उत्तर असेल की, देवाने आपल्या सर्वांना या जगात असच विनाकारण तर अजिबात पाठवलेले नाही... आपल्याला या जगात पाठवण्यामागे नक्की कोणता तरी उद्देश आहे...

मित्रांनो, जगात येण्याचा उद्देश प्रत्येक व्यक्तीला आधीच समजला असता तर जगात अशी कोणतीही व्यक्ती उरणार नाही जी कोणत्याही उद्देशाशिवाय जीवन जगत असेल....

मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या आजुबाजूला बघितले तर तुम्हाला असे खूप लोकं सापडतील जे कोणतेही ध्येय नसताना जीवन जगत आहेत...

दिवसभर टीव्ही पाहतात... रात्री जेवण करतात आणि मस्त झोपतात...😅

👉 मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की...

जे लोकं यशस्वी होतात त्यांना या जगात येण्यामागचा हेतू माहिती असेल का???

माझ्या मते तर अजिबात नाही... त्या लोकांना माहिती नसते देवाने त्यांना कोणत्या हेतूसाठी या जगात पाठवले आहे....

👉 आता सर्वात मोठा प्रश्न असा येतो की, जर यशस्वी लोकांना इथे येण्याचा उद्देश माहिती नसेल तर ते कोणत्या उद्देशाने यशस्वी होतात...???

मित्रांनो, या जगात असा एक पण व्यक्ती नाही, ज्याला माहिती असेल तो या जगात का आणि कशासाठी आला आहे...

आता तुम्हाला परत प्रश्न पडला असेल की, सर यशस्वी माणसांना या जगात येण्यामागचा उद्देश कोण सांगतो...??

👉 मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, यशस्वी लोकांना या जगात येण्याचे उद्दिष्ट तर माहिती नसते परंतु या जगात आल्यानंतर ते स्वतःचे ध्येय स्वतः ठरवतात...आणि ते प्राप्त करतात... 

ते स्वतः स्वतःच्या जीवनाचे ध्येय ठरवतात... 

या जगात राहून कोणत्या चांगल्या गोष्टी प्राप्त करायच्या आहेत हे आधीच ठरवतात...

मित्रांनो, या जगात जेवढे पण यशस्वी लोकं आहेत त्यांनी जगात आल्यानंतर स्वतःचे ध्येय स्वतःचं ठरवलेले आहे...

फरक एवढाच आहे की यशस्वी लोकांनी स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा वापर केला आहे...

उदाहरणार्थ :- 

1) संदीप माहेश्वरी सर 


यांनी लोकांना प्रेरणा देण्याचा मार्ग निवडला...त्यांनी खूप सारे मोटिवेशनल व्हिडीओ बनवले जे लोकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देतात....

उद्या संदीप सर जग सोडुन गेले तरी सुद्धा त्यांचे शब्द या जगात असणाऱ्या लोकांना आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहतील.... लोकं यशस्वी होतील...

2) आचार्य चाणक्य

👉 मित्रांनो, आचार्य चाणक्य हे जग सोडुन जाण्या आधी त्यांनी आपले महान विचार लोकांपर्यत पोहचले... आज त्याच महान विचारांवर लोकं phd करत आहे...

3) महात्मा गांधीजी

👉 महात्मा गांधीजीनी आपल्याला सत्य आणि अहिंसा नावाची शस्त्रे दिली....ज्याच्या सहाय्याने आपण जग जिंकू शकतो आणि ते ही शांततेने 

4) मुकेश अंबानी यांनी या जगाला जिओ दिले...

5) बिल गेट्स यांनी या जगाला मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर दिले...

6) अलेक्झाडर ग्राहम बेल यांनी या जगाला टेलिफोन दिला...

7) चार्ल्स बॅबेजने या जगाला कॉम्पुटर दिले....

8) APJ अब्दुल कलाम सर यांनी या जगाला मिसाईल दिली....

9) थॉमस एडीसन यांनी जगाला ब्लब दिला...

10) बेंजामिन फ्रँकलिन यांनी जगाला वीज दिली... 

11) विंटन सर्फ आणि बॉब कान यांनी जगाला इंटरनेट दिले...

12) राइट ब्रदर्स यांनी जगाला विमान दिले....

मित्रांनो, जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीने या जगाला नक्कीच काही तरी चांगले दिले आहे... 

किंवा 

आपण असं म्हणू शकतो की, ज्या लोकांनी या जगाला काहीतरी दिले आहे त्यालाच यशस्वी व्यक्ती म्हणतात....👍🏻👍🏻

मित्रांनो, प्रत्येक यशस्वी माणुस हे जग सोडुन जाण्याआधी काहीतरी चांगल देऊन गेला आहे....

मित्रांनो, आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे...

तुम्ही हे जग सोडुन जाण्याआधी या जगासाठी कोणत्या चांगल्या गोष्टी देणार आहात....???

तुम्ही तुमच्या जीवनाचे ध्येय काय ठरवणार आहात...???

जगाने तुम्हाला ओळखावे यासाठी तुम्ही काय कराल...???

या प्रश्नाचे उत्तर मला नक्की सांगा...

मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा... 

👉 या जगातील कोणताच यशस्वी व्यक्ती देवाच्या घरून शिकुन आलेला नाही... तो जो काही शिकला आहे ते सर्व याच दुनियेत शिकला आहे... त्यामुळे तो व्यक्ती नशीबवान असेल असं तर अजिबात म्हणू नका....

यशस्वी होण्यासाठी नशीब नाही तर स्वतःची जिद्द पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवा... ❤

धन्यवाद... 🙏🏻🌹😇

✍️✍️ नरेंद्र दिपके 

( Coach of Personality Development )

☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट