5 बेडकाची प्रेरणादायी गोष्ट...


      5 बेडकाची प्रेरणादायी गोष्ट...

👉 मित्रांनो, 6 बेडूक एका नदीमध्ये राहत होते... नदीमध्ये राहुन राहुन ते बोर व्हायला लागतात... ते 6 बेडूक एक दिवस विचार करतात की, आपण सर्वजण जंगलात फिरायला जाऊया...आणि सर्व मिळुन ते एक दिवसी जंगलात फिरायला जातात... 😄


जंगलात फिरत असताना दुपारी त्यांना तहान लागते... ते इकडे तिकडे पाणी शोधतात, थोड्या वेळाने त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते, त्यांना एक पडकी विहिर दिसते... 


👉 सर्वजण त्या विहिरीजवळ धावत जातात आणि लगेच त्या विहिरीत उडया मारतात... पोटभर पाणी पितात, विहिरीमधले किडे वैगरे खातात आणि तेथेच मुक्कामी राहतात... 


काही दिवसानंतर त्या विहिरीतले पाणी कमी व्हायला लागते... त्यामुळे 6 ही बेडूक विहीरी बाहेर निघण्याची तयारी करतात... 


वरती येण्यासाठी 6 ही बेडूक खूप प्रयत्न करतात परंतु वरती येताना घसरण एवढी होती की, पाय घसरून ते खाली पडायचे...


वरती येण्याचा 6 ही बेडूक खूप प्रयत्न करत होते परंतु त्यांना अपयशच येत होते... 


प्रयत्न करुनसुद्धा यश मिळत नाही म्हणून 5 बेडूक विहिरीतच राहण्याचा निर्णय घेतात. आपलं काय होईल याचा निर्णय ते देवावर सोडतात...आणि दुःखी होऊन बसतात. 


6 बेडूकपैकी एक लहान बेडूक असतो तो वरती येण्याचा प्रयत्न चालूच ठेवतो.


5 बेडूक त्या छोट्याशा बेडकाला सांगतात, विहिरीतून वरती जाणे अशक्य आहे. आम्ही वरती जाऊ शकलो नाही मग तु वरती कसा जाऊ शकशील... यार 😄


तो छोटा बेडूक वरती जायचा परत खाली पडायचा. एके वेळी तो वरती जाण्याचा प्रयत्न करतो आणि लगेच यशस्वी होतो...


वरती आल्यावर तो विहिरीत पाहून खाली असणाऱ्या 5 ही बेडकाला धन्यवाद करतो...🙏


विहिरीतले 5 ही बेडूक विचारात पडतात.  

ते त्या छोट्या बेडकाला हाताने इशारा करुन विचारतात तु वरती कसा जाऊ शकला...


तेंव्हा तो लहान बेडूक जोरात सांगतो की, मी वरती जाताना तुम्ही सर्वजन जोरात काही तरी सांगायचे,  मला वाटलं तुम्ही मला प्रोत्साहीत करत आहात... मी तुमचं बोलणं ऐकु शकत नव्हतो कारण मी बहिरा आहे. तुमच्या सर्वांमुळे मी विहिरीच्या बाहेर येऊ शकलो...त्यासाठी धन्यवाद 🙏


आशा प्रकारे एका छोट्या बेडकाने आपला जीव वाचवला...


👉 मित्रांनो, या प्रेरणादायी गोष्टीचे तात्पर्य असे आहे की, आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर, आपल्याला थोडं बहिरं व्हावं लागेल.... 


बहिरं व्हा म्हणजे कानाचा पडदा फाडुन टाकायचा नाही तर... काही निगेटिव्ह गोष्टीना इग्नोर करायच आहे. 


👉 तुम्ही स्पर्धा परीक्षाची तयारी करता असाल किंवा इतर काही करत असाल तर, लोकांच्या निगेटिव्ह बोलण्याकडे लक्ष देऊ नका... त्यांच्या नकरात्मक बोलण्याकडे सकरात्मक नजरेने पाहा... 


जसे की, लहान बेडूक बाकी बेडकाचे बोलणे सकरात्मकतेने पाहत होता तसेच आपण करायला हवे... 


लोकं जेंव्हा पण आपल्याबद्दल काही निगेटिव्ह गोष्टी बोलतील तेंव्हा असं समजा की, ते तुम्हाला प्रोत्साहीत करत आहेत.


लोकं आपल्याला निगेटिव्ह गोष्टी बोलतात, तुझ्याकडून MPSC परीक्षा पास होणार नाही, तु जीवनात कधी यशस्वी होऊ शकत नाही... वैगरे वैगरे वैगरे 


आशा निगेटिव्ह लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा... 


👉 जेंव्हा पण निगेटिव्ह लोकं तुम्हाला काही बोलतील, सांगतील तेंव्हा त्यांना Thank You म्हणा...निगेटिव्ह लोकांचे बोलणे मनावर घेऊ नका.. ❤😄


लोकं तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचे नाही... परंतु तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे फार महत्वाचे आहे... त्यामुळे नेहमी सकरात्मक विचार करा आणि सकरात्मक रहा...


मित्रांनो, आजची प्रेरणादायी गोष्ट दोन तीन वेळा वाचा आणि गोष्ट आवडली असेल तर नक्की फीडबॅक द्या... ❤


धन्यवाद... 🙏🌹


✍️✍️ नरेंद्र दिपके 

( Coach of Personality Development )

☎️☎️ 9545441697


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट