पोस्ट्स

जुलै, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Motivation आणि Discipline यशाचा खरा मंत्र

इमेज
 Motivation आणि Discipline  यशाचा खरा मंत्र विद्यार्थी जीवन हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे पर्व असते. याच काळात घडलेले संस्कार, सवयी आणि निर्णय भविष्यातील यश किंवा अपयश ठरवतात.  आज अनेक विद्यार्थी यशस्वी होण्याचे स्वप्न पाहतात, मोठी ध्येये ठरवतात, पण त्यापैकी काहीच विद्यार्थी त्या ध्येयांपर्यंत पोहोचतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे Motivation आणि Discipline यांच्यातील फरक समजून न घेणे. 👉🏻 आपल्याला अनेकदा एखादे प्रेरणादायी भाषण ऐकून किंवा एखादा यशस्वी व्यक्तीचा व्हिडिओ पाहून खूप उत्साह येतो. त्या क्षणी वाटते की आता आपण खूप मेहनत करू, वेळ वाया घालवणार नाही आणि आयुष्यात काहीतरी मोठे करून दाखवू. पण काही दिवसांनी तो उत्साह कमी होतो आणि पुन्हा जुन्याच सवयी सुरू होतात. यालाच Motivation म्हणतात. 👉🏻 Motivation म्हणजे एखादे काम करण्यासाठी मिळणारी प्रेरणा. ती आपल्याला सुरुवात करायला मदत करते. पण Motivation कायम टिकत नाही. ती हवामानासारखी बदलत राहते. कधी ती खूप असते तर कधी अजिबात नसते. 📌 याउलट Discipline म्हणजे स्वतःला दिलेले वचन पाळणे. मन नसतानाही योग्य काम करणे. अ...

जीवनाचा नियम Welcome आणि Goodbye.

इमेज
 जीवनाचा नियम Welcome आणि Goodbye. मित्रांनो, जीवनाचा एक अटळ नियम आहे, तो म्हणजे परिवर्तन... या जगात कोणतीही गोष्ट  कायमची नसते. ऋतू बदलतात, वेळ बदलते, परिस्थिती बदलते आणि माणसेही बदलतात...  आपल्या आयुष्यात काही लोक अचानक येतात, काही वर्षानुवर्षे सोबत राहतात, तर काही कोणतेही कारण न सांगता आपल्या आयुष्यातुन निघून जातात... 👉🏻 अनेकदा आपण निघून गेलेल्या लोकांमध्ये इतके अडकून पडतो की, आपल्या आयुष्यात येणाऱ्या नवीन आणि चांगल्या लोकांकडे पाहायलाच विसरतो. पण जीवन आपल्याला एक सुंदर धडा शिकवते, जे येतात त्यांचे मनापासून स्वागत करा आणि जे जातात त्यांना हसत-हसत निरोप द्या...🦋 👉🏻 कोणीतरी आपल्याला सोडून गेले म्हणून आपले जीवन संपत नाही. उलट, प्रत्येक निरोपानंतर जीवन आपल्यासाठी नवीन संधी, नवीन नाती आणि नवीन अनुभव घेऊन येत असते... काही लोक आपल्या आयुष्यात आनंद देण्यासाठी येतात. काही लोक आपल्याला अनुभव देतात. काही लोक प्रेम शिकवतात, तर काही लोक विश्वासघात करून सावध राहायला शिकवतात... प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जाते. त्यामुळे कोणीही विनाकारण आपल्या आयुष्यात येत नाही...

आपल्या आयुष्याचा खरा रिमोट कंट्रोल

इमेज
 आपल्या आयुष्याचा खरा रिमोट कंट्रोल मित्रांनो, जीवनात काय घडेल यावर आपले नियंत्रण नसते पण घटना घडणाऱ्यानंतर आपण काय विचार करतो आणि कशी प्रतिक्रिया देतो यावर मात्र 100% आपलेच नियंत्रण असते... आजच्या काळात प्रत्येक तरुणाच्या आयुष्यात अनेक आव्हाने आहेत. शिक्षण, करिअर, स्पर्धा परीक्षा, नोकरी, व्यवसाय, आर्थिक अडचणी, नातेसंबंध, सोशल मीडिया आणि भविष्याची चिंता... या सर्व गोष्टींमुळे मनावर सतत ताण येत असतो. अनेक वेळा आपण म्हणतो,  📌 आज खूप वाईट वाटत आहे..  📌 मला खूप राग आला आहे  📌 मला भीती वाटते  📌 मी निराश झालो आहे.  पण आपण कधी विचार केला आहे का की आपल्याला नेमके काय होतय....?? याच ठिकाणी इमोशन (Emotion) आणि फीलिंग (Feeling) यांचा फरक समजून घेणे आवश्यक आहे... अनेक लोक या दोन्ही शब्दांचा एकच अर्थ काढतात. परंतु मानसशास्त्राच्या दृष्टीने या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.  हा फरक समजला तर आपण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो, चुकीचे निर्णय टाळू शकतो आणि जीवनात अधिक शांत व यशस्वी होऊ शकतो... 📌इमोशन म्हणजे काय..?? 👉🏻 इमोशन म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर आपल...

प्रेम आणि आकर्षण यातील फरक प्रत्येकाने का समजून घ्यावा..??

इमेज
 प्रेम आणि आकर्षण यातील फरक प्रत्येकाने का समजून घ्यावा..?? आयुष्यात कधीतरी प्रत्येकाला एखादी व्यक्ती आवडते. तिचं हसणं, बोलणं, स्वभाव, व्यक्तिमत्त्व किंवा तिची एखादी खास गोष्ट आपल्याला आकर्षित करते.  अशा वेळी खूप जणांना असं वाटतं की, हेच प्रेम असावं. पण प्रत्येक वेळी तसं असतंच असं नाही... Love (प्रेम) आणि Attraction (आकर्षण) या दोन्ही भावना नैसर्गिक आहेत, पण त्या सारख्या नाहीत... या दोन्हीमधला तुम्हाला फरक समजला तर अनेक गैरसमज, चुकीचे निर्णय आणि नंतर होणारा त्रास टाळता येऊ शकतो... 📌 Attraction म्हणजे काय...??  Attraction म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे वाटणारे आकर्षण.  हे आकर्षण तिच्या चेहऱ्यामुळे, सौंदर्यामुळे, बोलण्याच्या शैलीमुळे, आत्मविश्वासामुळे, यशामुळे किंवा तिच्या व्यक्तिमत्त्वामुळे निर्माण होऊ शकते...आकर्षण अनेकदा अचानक निर्माण होतं.  एखाद्याला पहिल्यांदा पाहिल्यावरही ते वाटू शकतं. पण प्रत्येक आकर्षणाचं रूपांतर प्रेमात होतंच असं नाही... आकर्षण ही भावना असते, पण ती अनेकदा बाह्य गोष्टींवर आधारित असते... वेळ, परिस्थिती किंवा व्यक्ती बदलली की ही भावना कमीही होऊ ...