प्रेम आणि आकर्षण यातील फरक प्रत्येकाने का समजून घ्यावा..??
प्रेम आणि आकर्षण यातील फरक प्रत्येकाने का समजून घ्यावा..?? आयुष्यात कधीतरी प्रत्येकाला एखादी व्यक्ती आवडते. तिचं हसणं, बोलणं, स्वभाव, व्यक्तिमत्त्व किंवा तिची एखादी खास गोष्ट आपल्याला आकर्षित करते. अशा वेळी खूप जणांना असं वाटतं की, हेच प्रेम असावं. पण प्रत्येक वेळी तसं असतंच असं नाही... Love (प्रेम) आणि Attraction (आकर्षण) या दोन्ही भावना नैसर्गिक आहेत, पण त्या सारख्या नाहीत... या दोन्हीमधला तुम्हाला फरक समजला तर अनेक गैरसमज, चुकीचे निर्णय आणि नंतर होणारा त्रास टाळता येऊ शकतो... 📌 Attraction म्हणजे काय...?? Attraction म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे वाटणारे आकर्षण. हे आकर्षण तिच्या चेहऱ्यामुळे, सौंदर्यामुळे, बोलण्याच्या शैलीमुळे, आत्मविश्वासामुळे, यशामुळे किंवा तिच्या व्यक्तिमत्त्वामुळे निर्माण होऊ शकते...आकर्षण अनेकदा अचानक निर्माण होतं. एखाद्याला पहिल्यांदा पाहिल्यावरही ते वाटू शकतं. पण प्रत्येक आकर्षणाचं रूपांतर प्रेमात होतंच असं नाही... आकर्षण ही भावना असते, पण ती अनेकदा बाह्य गोष्टींवर आधारित असते... वेळ, परिस्थिती किंवा व्यक्ती बदलली की ही भावना कमीही होऊ ...