2023 वर्षाचे संकल्प...



मित्रांनो, नवीन वर्षाच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 

2023 हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंद,  प्रेम, उत्साह घेऊन येवो, आणि वर्षाचे 365 दिवस मजेदार जावोत नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा... 🌹🌹🌹💐💐💐🎂🎂🎂  


मित्रांनो, आज स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा 

*2022 वर्षामध्ये तुम्ही स्वतःला बदलण्यासाठी कोण कोणते प्रयत्न केले आहेत...??* असा प्रश्न स्वतःला नक्की विचारा 


मित्रांनो, तुम्हाला तुमचे जीवन खरोखर बदलायचे असेल तर सर्वात प्रथम वेळेचा सदुपयोग करायला शिका... आणि स्वतःला प्रॉमिस करा... मी 31 डिसेंबर 2023 पर्यंत मी ठरवलेले सर्व संकल्प पूर्ण करेल...🤝 


मित्रांनो, आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला काही संकल्प सांगणार आहे... ते संकल्प वाचा आणि जे संकल्प तुम्हाला आवडतील ते संकल्प पूर्ण करण्यासाठी आजपासुन  कामाला लागा. 


1) स्वतःवर प्रेम करा...


👉 मित्रांनो, 2023 या नवीन वर्षामध्ये ठरवा मी माझ्या स्वतःवर खूप प्रेम करेल... 

मित्रांनो, समजा मी तुम्हाला 5 करोड रुपये दिले आणि म्हटलं   तुमचे दोन्ही हात कापून मला द्या... 

तुम्ही तुमचे दोन्ही हात मला द्याल का?  


नाही देणार... बरोबर ना 

बर आता मी जर  10 करोड रुपये तुम्हाला दिले आणि म्हटलं   तुम्ही तुमचे दोन्ही डोळे मला द्या 

तुम्ही तुमचे डोळे काढुन मला द्याल का.?  

अजिबात नाही देणार... बरोबर ना  

मित्रांनो, आपले शरीर आपल्यासाठी खुप अनमोल आहे.  जगातील प्रत्येक वस्तुचे पार्ट विकत मिळतात परंतु शरीराचे अवयव परत मिळत नाहीत त्यामुळे मोटारसायकल चालवताना, कार चालवताना  गाडीची स्पीड कमी ठेवा... 

मी आशा खुप लोकांना पाहिले ज्यांचे Accident मध्ये दोन्ही हात गेले आहेत... 

मित्रांनो, 2023 या नवीन वर्षामध्ये संकल्प करा की, तुम्ही मोटारसायकल, कार हळु चालवाल, आणि स्वतःवर प्रेम कराल, स्वतःची काळजी घ्याल... 


2) पैसाची बचत करा... & पैसाचे नियोजन करा 


👉 मित्रांनो, फालतु गोष्टीसाठी अजिबात पैसे खर्च करू नका, ज्या गोष्टी खुप महत्वाच्या आहेत अशाच गोष्टीसाठी पैसे खर्च करा...

पैसाची बचत करा... पैसाचे नियोजन करा... तुम्ही जर रोजचे 100 रुपयाची बचत केली तर एका महिन्यात 3000 रुपये तुमच्याकडे जमा होतील आणि वर्षाचे 36000 हजार रुपये तुमच्याकडे शिल्लक राहतील.

👉 मित्रांनो, माझा एक मित्र आहे त्याला एक वाईट सवय होती... त्याच्या दुकानात जो पण ग्राहक येईल त्याला तो फुकट चहा पाजायचा... ग्राहक नवीन असो किंवा जुना चहा फुकट मिळायचा... 

त्याच्या या सवयीमुळे  आजूबाजूच्या मित्रांना फुकट चहा पिण्याची सवय लागुन गेली होती... ते रोज चहा प्यायला येत असायचे. 

शंकरच्या दुकानात 4, 5 वाजता  खूप मित्रमंडळी जमा व्हायची... फक्त चहा पिण्यासाठी 😄

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शंकरला चहा अजिबात आवडत नाही. 

एक दिवस दुपारच्या वेळेला, मी शंकरला भेटायला गेलो

शंकरभाऊ परेशान होते कारण त्याला 2, 4 दिवसात दुकानाचे भाडे द्यायचे होते. शंकरसोबत थोडी चर्चा केल्यावर माझ्या लक्षात आले कि, शंकर दिवसभरात 150 रुपये चहावर खर्च करायचा... 

त्याला मी म्हटलं, तु चहावर खर्च कमी केला तर तुझ्याकडे खूप पैसे जमा होतील...

 मित्राना आठवड्यामधुन एकदा चहा पाजत जा... जेंव्हा पण मित्र येतील तेंव्हा त्यांना चहा बद्दल विचारूच नको... कारण ते तुझ्याकडे फक्त चहा घेण्यासाठी येतात... तु त्यांना चहा बद्दल विचारले तर ते होच म्हणतील 😄

मी जे सांगितलं ते त्याने ऐकलं आणि सांगितल्याप्रमाणे तो कामाला लागला... थोड्याच दिवसात त्याला Result यायला लागला.

एक तर त्याच्या पैसाची बचत होत होती... आणि दुसरी गोष्टम्हणजे त्याच्या दुकानात मित्रांची गर्दी कमी व्हायची आणि कटिंग दाढीसाठी ग्राहक जास्त यायचे... आता शंकर खूप आनंदी आहे. आता जेंव्हा पण शंकर मला भेटतो तेंव्हा मला धन्यवाद म्हणतो...


शंकरचा एक दिवसाचा खर्च 150  रुपये होता. 


150 रुपये × 30 दिवस = 4500 रुपये महिना. 

शंकरभाऊ महिन्याला 4500 रुपये नुकसान करून घ्यायचा... 

मित्रांनो, या छोट्याशा गोष्टीमधुन तुमच्या लक्षात आले असेल कि पैसाची बचत करून आपण खूप पैसे जमा करु शकतो... 

मित्रांनो, पैसे खर्च करण्याआधी स्वतःला प्रश्न करा. ही वस्तु माझ्यासाठी उपयोगी आहे किंवा नाही. उपयोगी असेल तेंव्हाच पैसे खर्च करा... 👍

तुमच्याकडे जास्त पैसे असतील तर त्याला चांगल्या कामामध्ये इन्व्हेस्ट करा... इन्व्हेस्ट केलेल्या पैशाचा परतावा जास्त मिळत असतो... 


3) व्यसनांपासुन दुर रहा... 

👉 मित्रांनो, 2023 मध्ये स्वतःला प्रॉमिस करा की, तुम्ही तुमचे सर्व वाईट व्यसन सोडुन द्याल...  आणि व्यसनांपासून दुर राहाल, वाईट मित्रांसोबत जास्त राहु नका... पुस्तके वाचणाऱ्या मित्रांसोबत मैत्री करा... 👬

गुटखा खाणे, तंबाखू खाणे, पुढ्या खाणे, किंवा जास्त मोबाईल वापरणे आशा डेंजर सवयीपासुन दुर रहा... 


4) चांगल्या सवयी लावा... 


👉 मित्रांनो, माणसाच्या सवयीच माणसाला घडवत असतात, त्यामुळे स्वतःला चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करा...

जसे की, रोज सकाळी लवकर उठणे, रोज व्यायाम करणे, रोज पुस्तके वाचणे, वेळेचे नियोजन करणे... ह्या सर्व सवयी स्वतःला लावा... 

5) वडीलधाऱ्या लोकांचा आदर करा.


👉 मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीसोबत प्रेमाने वाघा... आणि प्रेमाने बोलण्याची सवय स्वतःला लावा...  वडीलधाऱ्या माणसांना मान द्या, त्यांच्याशी मोठ्या आवाजात बोलु नका... प्रत्येक मोठ्या व्यक्तीचा आदर करा, त्यांची मदत करा... 

2023 या नवीन वर्षात संकल्प करा कि तुम्ही प्रत्येक व्यक्तीसोबत प्रमाणे वाघाल आणि प्रत्येक व्यक्तीची रिस्पेक्ट कराल. 

6) ध्येय ठरवा... 


👉 2023 या नवीन वर्षात तुम्हाला कोण कोणत्या गोष्टी प्राप्त करायच्या त्या गोष्टीची यादी तयार करा... 

एक निश्चित ध्येय ठरवा आणि त्या ध्येयानुसार काम करा... 


7) रोज मेडिटेशन करा...


👉 रोज सकाळी आणि संध्याकाळी मेडिटेशन करण्याची सवय लावा... 

शांत रूममध्ये जा, डोळे लावा आणि दहा मिनिटे शांत बसा... 

मेडिटेशन करण्याच्या सवयीमुळे  तुमचे मन शांत होईल, तुम्हाला कोणत्याच कामात चिडचिड पणा वाटणार नाही... 

2023 या नवीन वर्षी मेडिटेशन करण्याची सवय स्वतःला लावा. 


8) पुस्तके वाचा...


👉  नवीन वर्षामध्ये तुम्ही पुस्तके वाचण्याचा संकल्प करु शकता. 

स्वतःला घडवण्यासाठी पुस्तके वाचणे खुप आवश्यक आहे... 

या जगात जेवढे पण श्रीमंत लोक आहेत ते सुद्धा रोज पुस्तके वाचतात... पुस्तके वाचल्यामुळेच ती मंडळी श्रीमंत झालेली आहे...  

मित्रांनो या नवीन वर्षात पुस्तके वाचण्याचा संकल्प नक्की करा... 


9) सकाळी लवकर उठा... 


👉 मित्रांनो, सकाळी लवकर उठणे,  व्यायाम करणे, मेडिटेशन करणे या साऱ्या गोष्टीची सवय स्वतःला लावा... 

जसे जेवण शरीरासाठी आवश्यक आहे तसेच व्यायाम करणे सुद्धा खुप खुप आवश्यक आहे... 

तुम्हाला निरोगी जीवन जगायचं असेल तर रोज सकाळी 5 वाजता उठा...⏰


10) वेळेचे नियोजन करा... 


👉 मित्रांनो, नवीन वर्षांमध्ये तुम्ही केलेल्या संकल्पना तेंव्हाच नक्की होतील जेंव्हा तुम्ही 24 तासाचे नियोजन कराल... 

मित्रांनो, कोणत्या कामासाठी किती वेळ द्यायचा हे अगोदर ठरवा आणि त्यानुसार वेळेचे नियोजन करा... आणि 24 तासाचा भरपूर उपयोग करा... आणि सोशल मीडियाचा वापर कमी करा, कारण आपला किंमती वेळ सर्वात जास्त सोशल मीडियामध्ये जातो... 👍

मित्रांनो, वरील सर्व संकल्प वाचा आणि तुम्हाला जो संकल्प आवडला तो निश्चित करा आणि निश्चित केलेला संकल्प पूर्ण कसा होईल यावर काम करा... 

पुन्हा एकदा 2023 या नवीन वर्षाच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा...🌹🌹🌹💐💐💐

धन्यवाद... 🙏


✍️✍️ नरेंद्र दिपके 

( Coach of Personality Development )

☎️☎️ 9545441697


मित्रांनो, तुम्हाला Time Management Course, Brain Development, Personality Development, आशा वेगवेगळ्या कोर्सची ट्रैनिंग तुम्हाला घ्यायची असेल तर आमचे Workshop नक्की जॉईन करा. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा अथवा व्हाट्सअप Msg करा... 

WhatsApp No :- 9545441697

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट