नेहमी Gratitude स्टेजमध्ये रहा...

नेहमी Gratitude स्टेजमध्ये रहा...

👉 मित्रांनो, एक वडील आणि त्यांचा 15 वर्षाचा मुलगा एका रेल्वे मध्ये बसलेले असतात. थोडयावेळाने रेल्वे सुरु होते. 

मुलगा खिडकी बाहेर पाहतो आणि वडिलांना काही प्रश्न विचारतो. बाबा बाबा हे काय आहे. बाबा सांगतात बाळा ते झाडे आहेत...🌳

पुन्हा थोड्या वेळाने मुलगा प्रश्न विचारतो, बाबा बाबा हे काय आहे... बाबा म्हणतात बाळा ते पक्षी आहेत...🦜

पुन्हा थोड्या वेळाने मुलगा प्रश्न  विचारतो बाबा बाबा हे काय आहे. त्यावर वडील म्हणतात बाळा ते पर्वत आहेत...⛰️ 

मुलगा पुन्हा थोड्या वेळाने प्रश्न  विचारतो बाबा बाबा हे काय आहे. बाप मुलाला म्हणतो बाळा ते तलाव आहे...

👉 हे पाहुन समोरच्या सीटवर बसलेला व्यक्ती त्या मुलाच्या बापाला म्हणतो तुम्ही या पागल मुलाचा इलाज का करत नाही...??? 

त्यावर वडील म्हणतात माझ्या मुलाचे कालच डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे... आणि आजच तो हे नवीन जग पाहत आहे...😊

👉 मित्रांनो, एक विचार करा...

जो व्यक्ती हे जग पाहु शकत नाही... त्यांच्यासाठी हे जग कसे असेल... तो व्यक्ती देवाच्या मंदिरात गेल्यावर देवाला काय मागत असेल.??? यावर थोडा विचार करा... 

आंधळा व्यक्ती देवाच्या मंदिरात गेल्यावर देवाला एकच विनंती करेल... देवा तु बनवलेले हे सुंदर जग मला पाहायचं आहे... मला फक्त डोळे दे बाकी काहीच देऊ नको... 

ज्या व्यक्तीला हात नाही, तो सुद्धा देवाला हात शिवाय दुसरे काही मागणारच नाही... 

👉 मित्रांनो, सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की, देवाने आपल्याला पूर्ण शरीर गिफ्ट मध्ये दिले आहे... 

आपल्याला दोन डोळे आहेत. दोन हात आहेत. दोन पाय आहेत....तरी सुद्धा खूप लोक दुःखी आहेत... 

दुःखी जीवन जगत आहे...असं का??? 

मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की दुःख फक्त गरिबांना असते तर तसे काही नाही. श्रीमंत लोकांना सुद्धा दुःख असतात...

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. गरजेपेक्षा मिळालेले सुख हे दुःखाचे कारण बनतं असते...

आज तुम्ही ज्या कोणत्या पदावर असाल, सुखी असाल किंवा दुःखी असाल, तुम्ही स्वतःच्या घरात राहत असाल किंवा रूम करून राहत असाल... 

तुमच्या जवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी Gratitude राहायला शिका...

आता तुम्ही हा लेख वाचत आहात याचा अर्थ तुम्ही दोन्ही डोळ्याने बरोबर पाहु शकता... कानाने ऐकू शकता.

तुमच्या जवळ मोबाईल आहे इंटरनेट आहे. या सर्व गोष्टीसाठी देवाला धन्यवाद म्हणा... आणि स्वतःला सांगा i am lucky man 

ज्या गोष्टी तुमच्या जवळ नाहीत. त्याचा विचार करू नका. तुमच्या जवळ ज्या कोणत्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्यासाठी Gratitude रहा...

 👉 रात्री जेवन करताना जेवणाच्या ताटात जी भाजी भाकर असेल त्याच्यासाठी देवाला धन्यवाद म्हणा... 

कारण जगात असे खूप लोक आहेत, ज्यांना एक टाइमच जेवण सुद्धा मिळत नाही... तुम्हाला रोज पोटभर जेवण मिळत आहे. त्यासाठी देवाला धन्यवाद करा. 

सुंदर जग पाहण्यासाठी देवाने आपल्या सर्वांना सुंदर दोन डोळे दिले आहेत... डोळयांनी चांगल्याच गोष्टी पाहायला शिका. कानांनी चांगल्याच गोष्टी ऐका. तोंडाने चांगल्याच गोष्टी बोला.. आणि जेंव्हा तुम्ही श्रीमंत व्हाल पैसे कमवाल तेंव्हा थोडे फार  पैसे दान करायला शिका... 

तुम्ही दान केलेल्या पैसामधुन गरीब लोकांना मदत होईल. गरीब लोकांना नवीन जग पाहायला मिळेल...❣️

👉 तुमच्या जवळ ज्या ज्या गोष्टी असतील त्यासाठी Gratitude रहा, आनंदी रहा... ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही त्या गोष्टीबद्दल जास्त विचार करून दुःखी होऊ नका...

जेंव्हा तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या गोष्टीबद्दल वस्तूबद्दल Gratitude राहता तेंव्हा तुमच्याजवळ नसलेल्या गोष्टी तुमच्या जीवनात आकर्षित होतं असतात...

👉 मित्रांनो, आजचा लेख वाचल्यानंतर तुमच्याजवळ ज्या ज्या गोष्टी असतील त्याची यादी बनवा... 

तुम्ही असे पण लिहु शकता. माझे आई बाबा माझ्या सोबत आहेत. आणि ते सुखरूप आहेत. यासाठी देवा तुझे धन्यवाद. खूप लोकांना आई बाबा नसतात त्यामुळे तुम्हाला आई बाबा आहेत त्यासाठी नेहमी Gratitude रहा... 

जेंव्हा तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी Gratitude राहता. आणि आनंदी राहायला शिकता तेंव्हा तुम्हाला हव्या असणाऱ्या प्रत्येक वस्तु तुमच्याकडे आकर्षित होतं असतात. त्यामुळे नेहमी आनंदी रहा आणि प्रत्येक गोष्टीसाठी Gratitude रहा. 😊 

✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके 

( Coach of Personality Development )

☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for feedback

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

Motivation आणि Discipline यशाचा खरा मंत्र

थोडं हसायला शिका...