The Halo Effect

 The Halo Effect, Narendra Dipake,


👉 नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आशा करतो सर्वजण आनंदी आणि मजेत असाल... 

मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण Halo Effect बद्दल माहिती पाहणार आहोत...

Halo Effect म्हणजे काय हे जाणून घेण्याआधी आपण Halo इफेक्टचा इतिहास काय आहे ते पाहुयात...

Halo Effect हा Human Psychology चा एक भाग आहे...

Halo Effect ची संकल्पना सर्वात आधी अमेरिकेचे Psychologist Edward Thorndike यांनी जगासमोर मांडली... 

Halo Effect ला Error Effect सुद्धा म्हणतात.

Halo Effect म्हणजे काय हे समजण्यासाठी तुम्हाला एक उदाहरणं सांगतो... 

👉 कल्पना करा, तुम्ही एक विद्यार्थी आहात आणि नुकताच 7 व्या वर्गातुन 8 व्या वर्गात गेले आहात... 

नवीन वर्गात गेल्यावर तुम्हाला सर्वगोष्टी नवीन दिसतात...

जसे की,

नवीन वर्ग, शिकवणारे शिक्षक सुद्धा नवीन, आणि नवीन मित्र... 

शाळा सुरु झाल्यावर एक शिक्षक येतात ते आपल्याशी बोलतात, आपल्यासोबत हासिक मजाक करतात. 

सरांच्या बोलण्यावरून, त्यांच्या दिसण्यावरून, त्यांच्या कपड्यावरून त्यांच्या वागण्यावरून आपल्याला असं वाटत की, हे सर तर खूप छान आहेत...प्रेमळ आहेत, कॉमेडी करतात याचा अर्थ सर खूप चांगले आहेत.... नक्की चांगले शिकवत असतील, हुशार असतील... असा विचार करुन आपण त्या सरांना Like करायला लागतो...

👉 थोड्या वेळाने दुसरे नवीन शिक्षक वर्गात शिकवायला येतात आणि पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांवर रागवतात, आता सरांच्या बोलण्यावरून त्यांच्या दिसण्यावरून त्यांच्या वागण्यावरून आपण असा अंदाज लावतो की, हे सर खूप आगाव आहेत... नक्की खूप अभ्यास करायला लावतील... 

शाळेच्या पहिल्या दोन दिवसात आपण प्रत्येक सरांच्या दिसण्यावरून त्यांच्या वागण्यावरून आणि त्यांच्या कपड्यावरून सर लोक कसे आहेत याचा अंदाज लावत असतो...

परंतु 

👉 काही दिवसानंतर आपल्याला समजतंय की, आपण सरांबद्दल लावलेला अंदाज हा पूर्णपणे चुकीचा आहे...🤦🏻‍♂️

जे शिक्षक आधी चांगले वाटले ते तर खूप डेंजर निघाले...😂

आणि 

जे शिक्षक डेंजर वाटले ते तर खूप प्रेमळ आहेत...😁

मित्रांनो, शाळेत असताना तुम्ही ही गोष्ट नक्कीच अनुभवली असेल...

Halo Effect म्हणजे काय?

👉 मित्रांनो, एखाद्या नवीन व्यक्तीला पहिल्यांदा भेटल्यावर त्या व्यक्तीच्या पॉजिटीव्ह इम्प्रेशन पाहून त्या व्यक्तीच्या इतर निगेटिव्ह गोष्टीकडे दुर्लक्ष करणे...त्या व्यक्तीच्या एक चांगल्या गुणावरून आपण त्याला सर्वगुण संपन्न समजतो...यालाच Halo Effect म्हणतात...

थोडक्यात सांगायचं झाल्यास.. 

एखाद्या व्यक्तीच्या एका पॉजिटीव्ह इम्प्रेशनमुळे आपण त्या व्यक्तीच्या 99 निगेटिव्ह गोष्टीकडे दुर्लक्ष करायला लागतो... यालाच Halo Effect म्हणतात 

मित्रांनो, Halo Effect चं अजुन  एक उदाहरणं सांगतो...

👉 मित्रांनो, आपण सर्वजण टीव्ही पाहत असतो. टीव्ही पाहत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रॉडक्टची, Game App ची ऍड दाखवत असतात... 

आपण टीव्हीवर प्रॉडक्टची ऍड पाहतो, ऍड करणारा व्यक्ती हा हिरो किंवा हिरोईनच असते....ऍड पाहिल्यानंतर आपण मार्केटमध्ये जातो आणि टीव्हीमध्ये दाखवलेले प्रॉडक्ट विकत घेऊन घरी येतो... 

घरी आल्यावर आपण ते प्रॉडक्ट use करतो... प्रॉडक्ट Use केल्यानंतर आपल्याला समजते की, हे प्रॉडक्ट तर काहीच कामाचं नाही...🤣

टीव्हीमध्ये प्रॉडक्टचा वेगळा Result दाखवतात आणि घरी आपल्याला वेगळाच Result पाहायला मिळतो...😄

👉 मित्रांनो, टीव्हीच्या ऍडमध्ये प्रॉडक्टची फक्त आणि फक्त Beuti आणि Result लोकांना दाखवतात आणि याच गोष्टीवरून लोकं अंदाज लावतात की, हे प्रॉडक्ट खरोखर चांगलेच असेल आणि लोकं कसलाच विचार न करता ते प्रॉडक्ट विकत घेत असतात...यालाच Halo Effect म्हणतात...

Halo Effect चा सर्वात जास्त उपयोग प्रॉडक्ट मार्केटिंगमध्ये केला जातो...

एक साबण असते... त्याची ऍड एक हिरो किंवा एखादी हिरोईन करत असते...

ऍडमध्ये हिरोला पाहून सर्व लोक Halo Effect च्या प्रभावमध्ये येतात... 

लोकांना वाटतं हिरो सांगत आहे याचा अर्थ साबण नक्कीच चांगल असेल... आणि लोकं कसला ही विचार न करता ते साबण विकत घेतात... 

आजकल जेवढ्या पण Game App असतील किंवा पान सुपारी ऍड असेल, किंवा इतर प्रॉडक्ट असतील त्याची ऍड नेहमी ऍक्टर लोकं करतात कारण त्याना Follow करणारी मंडळी खूप असतात... 

Halo Effect च्या प्रभावामुळे लोकांना चांगल वाईट काही कळत नाही... लोकांना वाटतं तो करोड रुपये जिंकला मग मी पण जिंकेल आणि यामुळे तो शेती जमीन विकून क्रिकेट टीम बनवतो आणि पैसे हरतो...

मित्रांनो, मार्केटमध्ये Halo इफेक्टचे लाखो उदाहरणं पाहायला मिळतात...

मित्रांनो, Halo Effect चे जसे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेत बरं का...   

👉 मित्रांनो, कोणतेही प्रॉडक्ट विकत घेताना प्रॉडक्टची  Quality पाहा आणि नंतरच प्रॉडक्ट विकत घ्या... एखादा फालतू ऍक्टर सांगतो म्हणून  प्रॉडक्ट किंवा Game App डाउनलोड करू नका... 

प्रेमामध्ये खूप मुलं मुली फसतात याच कारण सुद्धा Halo इफेक्टच आहे...

एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या कपड्यावरून मुलीला वाटते मुलगा चांगला आहे, श्रीमंत असेल... आणि तेथेच मुलंमुली फसतात...

मित्रांनो, जीवनात Halo इफेक्टमध्ये येऊन कोणताही निर्णय घेऊ नका... निर्णय घ्यायला थोडा वेळ घ्या परंतु शांतपणे आणि विचारकरूनच निर्णय घ्या...👍

मित्रांनो, आशा करतो तुम्हाला Halo Effect म्हणजे काय हे समजलं असेलच...🙏

आजचा लेख आवडला असेल तर नक्की फीडबॅक द्या... 

धन्यवाद...🙏🌹😇

✍️✍️ नरेंद्र दिपके 

( Coach of Personality Development )

☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे.??