*पुस्तकांचे महत्त्व*
* कोणत्याही प्रकारचे पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीला लेखक म्हटले जाते. पुस्तक हे लेखकाची कल्पनाशक्ती, भावना आणि ज्ञान प्रतिबिबित करते. पुस्तकाच्या माध्यमातून लेखक ज्ञानाचा प्रकाश पसरवतात.
* पुस्तक लिहिणारे लेखक सुद्धा हे जग सोडून जातात. पण पुस्तक मात्र कायम तसच राहत. पुस्तक हे कोणत्याही लेखकाचे कार्य आणि नाव उज्ज्वल करतं.
* आजचे युग हे इंटरनेटचे युग आहे. कोणत्याही विषयाबद्दल माहिती मिळविण्यासाठी इंटरनेट वर जाऊन शोधणे ही एक सामान्य पद्धत आहे.
* इंटरनेट हा ज्ञान प्राप्त करण्याचा एक सोपा मार्ग आहे. परंतु पुस्तकांचे महत्त्व हे आजही कायम आहे. कारण आजही शाळेमध्ये पुस्तकांच्या माध्यमातून शिकवले जाते. आज कुठूनही पुस्तके खरेदी करु शकतो.
* पुस्तके ही चारित्र्य निर्माण करण्याचे एक उत्तम साधन आहे. पुस्तकातून देशातील ऐक्याचा धडा शिकवता येतो. तसेच पुस्तकाद्वारे आपल्याला नवीन प्रेरणा व दिशा मिळते. म्हणूनच पुस्तके ही ज्ञानाची वाहणारी गंगा आहे. जी कधीच थांबत नाही.
परंतु अशी काही पुस्तके आहेत जी आपल्याला चुकीच्या मार्गाने मार्गदर्शन करतात. म्हणून आपण अशी पुस्तके वाचणे टाळावे आणि नेहमी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायक पुस्तके वाचली पाहिजेत.
ज्ञान प्राप्त करणे हा एक चांगला आणि सोपा
व स्वस्त मार्ग आहे.
निष्कर्ष:
*पुस्तकांमुळे प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन बदलतो. तसेच पुस्तक वाचणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी मार्ग सापडतो.*
*पुस्तके ही आपली चांगली मित्र आहेत. म्हणून आपण सर्वानी नेहमी चांगले ज्ञान देणारी पुस्तके वाचलीच पाहिजेत.*
✍️✍️ *Narendra Dipake*
*( पब्लिक स्पीकिंग ट्रेनर & राइटर )*
Khup Chan post sir👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद... 🙏
हटवावाचन केले म्हणजे ज्ञानार्जन प्राप्त होते.
उत्तर द्याहटवापुस्तक वाचल्याने जीवनाला प्रेरणा मिळते
बरोबर आहे... 👍
हटवाफारच च्छान
उत्तर द्याहटवापुस्तकं वाचल्याने मस्तक सुधारते
उत्तर द्याहटवा