आ बैल मुझे मार...

 


आ बैल मुझे मार 

मित्रांनो, मी तुम्हाला 2 करोड रुपये देतो मला तुमचा उजवा  पाय कापून द्या.... देऊ शकता..? 

चला ठिक आहे मी तुम्हाला 4 करोड रुपये देतो, मला तुमचे दोन्ही डोळे काढुन द्या...  

6 करोड रुपये देतो मला तुमचे दोन्ही पाय आणि दोन्ही हात द्या...  तुम्ही द्याल का...? 

नाही ना...  

👉 मित्रांनो, आपले शरीर आपल्यासाठी खुप खुप महत्वाचे आहे... 

समजा आपली गाडी खराब झाली तर आपण काय करतो... गाडी ला गॅरेज वर घेऊन जातो   गाडीला सुधरवतो किंवा खराब झालेले पार्ट बदलत असतो... नंतर गाडी पुन्हा नवीन कार सारखी चालायला लागते किंवा  पाळायला लागते...  


👉 मित्रांनो, आता विचार करा जर आपला हात कापला असेल  किंवा हात तुटला असेल तर आपण नवीन हात बसु शकत नाही... पाय तुटला असेल तर आपण नवीन पाय बसु शकत नाही... त्यामुळेच आपल्याला जर कोणी किती ही पैसे दिले तरी आपण आपले हात पाय किंवा डोळे दुसऱ्याला देत नाही...    

👉 मित्रांनो, आपले शरीर खुप सुंदर आणि महाग आहे आपण आपल्या शरीराची काळजी घ्याला पाहिजे परंतु 

असे खुप लोक आहेत जे पुर्ण शरीराची रिस्क घेतात... कार चालवताना किंवा मोटर सायकल  चालवताना 80/90 च्या स्पीड ने गाडी चालवतात आणि गाडी जर कंट्रोल नाही झाली तर दुर्देवाने त्यांचा अकॅसिडेन्ट होतो,  कुणाचा मुर्त्यू होतो तर कुणाला त्याचा हात पाय कायमचा गमवावा लागतो... 

मित्रांनो, एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवा 

👉 आपण आपल्या शरीराचे पार्ट बदलु शकत नाही.... आणि बदलु शकू तरी त्याला खुप खर्च येतो त्यामुळे मोटारसायकल  चालवताना किंवा कार चालवताना स्पीड कमी ठेवावी आणि  गाडी आरामसीर चालवावी... 

मला एका गोष्टीचे खुप वाईट वाटते.... 

👉 खुप मुलं मुलींना पाहुन गाडी जोरात चालवतात किंवा मुलींना पाहुन जोरात हॉर्न वाजतात... 

त्या मुलांना एक सांगतो कि तुम्ही अशा फालतु गोष्टी करून त्या मुलीला इंप्रेस तर करू शकत नाही...

परंतु

त्या मुलीच्या नजरेत तुमची इज्जत शून्य होईल... आणि जर का तुमची गाडी कुठे धडकली तर तुमचाच हात पाय तुटेल आणि दवाखान्याच्या जो खर्च येईल तो  वेगळा.. 😄 

मित्रांनो, प्रत्येक मुलीची रिस्पेक्ट करा, 

 मला असे वाटतं कि सुंदर जीवन जगण्यासाठी आणि सुंदर जीवन पाहण्यासाठी हात,  पाय डोळयांची खुप गरज आहे..

👉 तुम्हाला पण वाटतं असेल कि हात पाय डोळे तुमच्यासाठी खुप महत्वाचे आहेत तर आज पासुन कार, मोटारसायकल कमी वेगाने चालवा... 👍

आ बैल मुझे मार.. अशी परिस्थिती स्वतःवर आणू नका... 

जीवन खुप सुंदर आहे, त्याला अजुन सुंदर बनवा...🌹

✍️✍️ नरेंद्र दिपके 

( Coach of Personality Development )

☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for feedback

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट