सुख दुःख... म्हणजे काय...?
मित्रांनो, या जगातल्या प्रत्येक वस्तुंना दोन बाजु असतात...
जसे कि,
सुख × दुःख, किंवा दुःख × सुख
मित्रांनो, सुख दुःखाची कन्सेप्ट समजण्यासाठी मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल...
👉 मित्रांनो, जेंव्हा आपण एखादी नवीन Bike विकत घेतो तेंव्हा आपल्याला खुप आनंद होते... परंतु तीच मोटर सायकल काही दिवसाने खराब झाली किंवा जुनी झाली तर अपल्याला खुप दुःख होते...😞
👉 जेंव्हा आपण एखाद्या मुलीच्या प्रेमात पडतो, त्या मुलीवर प्रेम करतो तेंव्हा आपल्याला खुप आनंद होते परंतु काही दिवसाने किंवा काही कारणामुळे अपल्याला आपली प्रेमिका सोडुन गेली किंवा ब्रेकअप झाले तर आपल्याला खुप खुप दुःख होते....
👉 त्याचप्रमाणे आपल्या जवळ पैसे असले कि आपण आनंदी होतो परंतु पैसे खर्च झाल्यावर आपल्याला दुःख होते...
मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा...
प्रत्येक खुशी नंतर दुःख येते तर प्रत्येक दुःखा नंतर खुशी येत असते...
👉 मित्रांनो, आज तुम्हाला पुस्तके वाचायला खुप कंटाळा येत असेल... पुस्तक वाचुन तुम्हाला दुःख होत असेल तर... हे दुःख तुमच्यासाठी चांगलेच आहे... कारण आजचे दुःख उद्या तुम्हाला ख़ुशी देईल, तुम्हाला आनंद देईल, सोबतच तुम्हाला गव्हर्नमेंट नोकरीं सुद्धा देईल.... परंतु त्यासाठी आज तुम्हाला दुःखाचे दिवस पाहावे लागणार आहेत... रात्र उशीरापर्यंत अभ्यास करावा लागेल... सकाळी लवकर उठावे लागेल... फेसबुक, इंस्टाग्राम, Youtube चा वापर कमी करावा लागेल...
मित्रांनो, आज तुमचे खुप सारे मित्र मंडळ गर्लफ्रेंड सोबत फिरायला जात असतील किंवा पार्ट्या करत असतील किंवा वेळेचा वाईट उपयोग करत असतील, तर त्यांना पाहुन तुम्ही अजिबात दुःखी होऊ नका....
कारण तेच मित्र काही दिवसाने तुमच्या हाता खाली कामाला राहतील.... जेंव्हा तुमचे सुखाचे दिवस सुरु होतील तेंव्हा त्यांचे दुःखाचे दिवस सुरु होतील...
मित्रांनो, प्रत्येक दिवस आणि प्रत्येक तास आपल्यासाठी नवीन असतो... प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या...
( देवाने तुम्हाला या जगात पाठवले आहे, तर नक्कीच तुमच्या अंगात काही तरी skills असतील म्हणुनच देवाने तुम्हाला माणसाचा स्वरूपात पृथ्वीवर पाठवले आहे... )
👉 मित्रांनो, स्वतःचे जीवन कसे जगायचे ते आपण आपले ठरवायचं आहे... आणि तुम्ही पाहिलेले स्वप्न तुम्हालाच पुर्ण करावे लागणार आहेत.... त्यामुळे दुसऱ्यावर अवलंबून राहु नका... अजुन सुद्धा वेळ आहे तुमचे स्वप्न पुर्ण करून दाखवण्यासाठी.... त्यामुळे आताच कामाला लागा... 😊
✍️✍️ नरेंद्र दिपके
(Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback