कामामध्ये एकाग्रता कशी ठेवावी.??
मित्रांनो, अजय नावाचा एक मुलगा असतो. अजय हा शाळेपासूनच खूप हुशार विद्यार्थी होता...
अजय कॉलेज पूर्ण करतो नंतर डिग्री घेतो... जॉबसाठी अप्लिकेशन करतो... काही दिवसाने अजयला एका चांगल्या ऑफिसमध्ये जॉब मिळतो...
👉 अजय रोज ऑफिसला जात होता... ऑफिसमध्ये इतर लोकं सुद्धा अजय सोबत काम करायचे...
इतर लोकं नेहमी रिकाम्या गोष्टीबद्दल चर्चा करायचे...काम सोडुन कॉमेडी करत बसायचे...
ह्या सर्व गोष्टीमुळे अजय खूप परेशान व्हायचा... त्याला कामात डिस्टरब व्हायचं, त्याचं मन कामात लागतं नसायचं...
यामुळे अजयला ते ऑफिस आणि नोकरी नकोशी वाटायला लागली होती...
👉 एके दिवसी अजय बॉसच्या केबिनमध्ये जातो आणि बॉसला नोकरी सोडण्याचा अर्ज देतो
अर्ज पाहून... बॉस अजयला विचारतात... अजय नोकरी का सोडत आहे.??🙄
तेंव्हा, अजय सांगतो
👉 सर, माझ्यासोबत काम करणारे इतर मंडळी वाईट विचारांचे आहेत. ते काम सोडुन रिकाम्या गोष्टी करत बसतात. जोक्स कॉमेडी करण्यात वेळ वाया घालवतात... त्यांच्यामुळे मला काम करण्यात डिस्टरब होते
त्यांच्या आशा वाईट वागण्यामुळे मला ही नोकरी नकोशी झाली आहे. म्हणूनच मी ही नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला...😞
बॉस... अजयला म्हणतात
तुला जॉब सोडायचा असेल तर सोडु शकतोस परंतु त्या आधी माझं एक छोटंसं काम करशील का???
अजय म्हणतो, हा करेल सर
👉🏻 बॉस म्हणतात, हा ग्लास पाण्याने गच्च भरलेला आहे... हा ग्लास घे आणि ऑफिसच्या तीन चकरा मार... आणि लक्षात ठेव... चकरा मारत असताना ग्लास मधले पाणी सांडायला नको...
अजय पाण्याने भरलेला ग्लास घेतो आणि ऑफिसच्या तीन चकरा मारायला सुरुवात करतो...
तीन चकरा मारल्यानंतर अजय बॉसच्या कॅबिनमध्ये जातो आणि म्हणतो... सर मी ऑफिसच्या तीन चकरा मारल्या आणि ग्लासमधले पाणी सुद्धा सांडले नाही...
तेंव्हा, बॉस अजयला विचारतात... हे कस शक्य झालं?
तेंव्हा अजय म्हणतो, सर मी माझं पूर्ण लक्ष रस्त्यावर आणि माझ्या हातामधल्या ग्लासवर दिले... त्यामुळे मला हे शक्य झाले...
हे ऐकून बॉस एक प्रश्न अजुन अजयला विचारतात...
अजय ऑफिसमध्ये तीन चकरा मारत असताना, इतर लोकं काय करत होते हे तु बघितले का...?? त्यांच्या आवाजामुळे तुला डिस्टरब झालं का???
अजय म्हणतो, नाही सर
👉 माझं पूर्ण लक्ष ग्लासकडे होते त्यामुळे मी इतर लोकांना बघितले नाही...आणि त्यांचा आवाज पण मला ऐकु आला नाही... कदाचित आज सर्वजण त्यांच्या कामात व्यस्त असतील...
अजयचे उत्तर ऐकून बॉस हसतात 😄 आणि म्हणतात... अजय हे लोकं काल जसे होते तसेच आज आहे...
ऑफिसच्या 3 चकरा मारत असताना तु तुझं पूर्ण लक्ष ग्लासकडे दिले म्हणून तुला इतर लोकांच्या बोलण्याचा काहीच त्रास झाला नाही...
तु रोज ऑफिसला येऊन तु तुझ्या कामात लक्ष दिले तर तुला इतर लोकांचा त्रास होणार नाही.
अजयला त्याची चुक लक्षात येते... आणि तो बॉसला धन्यवाद म्हणतो आणि लिहिलेला अर्ज फाडुन फेकून देतो...
मित्रांनो, जगातील 98% लोकांना अपयश मिळते कारण ते लोकं स्वतःचे काम सोडुन आजु बाजुच्या लोकांकडे आणि त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देतात...आणि स्वतःला दुःखी करतात.
काही लोकं इतर लोकांचे बोलणे ऐकतात आणि स्वतःचे निर्णय बदलतात...🤦🏻♂️
मित्रांनो, जो पर्यंत तुम्ही तुमच्या कामात लक्ष देणार नाही, स्वतःच्या कामात व्यस्त राहणार नाही तो पर्यंत तुम्हाला यश मिळूच शकणार नाही...
त्यामुळे इतर लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या...असे केल्याने तुम्हाला इतर लोकांचा असण्याचा किंवा त्यांच्या बोलण्याचा त्रास होणार नाही.
मित्रांनो, वेळ खूप अनमोल आहे... गेलेला वेळ तुम्ही परत कधीच आणू शकत नाही... त्यामुळे वेळेचे परफेक्ट नियोजन करा. तुमचा वेळ फालतू गोष्टीमध्ये खर्च करू नका...🙏
तुमची स्पर्धा लोकांसोबत नाही... तुमची स्पर्धा तुमच्या स्वतःसोबत आहे... स्वतःला वेळ द्या.. ध्येयावर फोकस ठेवा...
आणि तुम्ही तुमचे काम पूर्ण इमानदारीने करत रहा... यश तुम्हाला मिळेलच...❤
👉 गरुड पक्षी आभाळातूनच जमिनीवर असणाऱ्या सापाला आणि माशाला पाहतो... आभाळातूनच ध्येय ठरवतो... गरुडपक्षी आभाळात इकडे तिकडे उडतो परंतु त्याने ठरवलेल्या ध्येयाकडे तो कधीच दुर्लक्ष करत नाही...
योग्य वेळेची वाट पाहतो आणि योग्य वेळ आल्यावर तो जमिनीवर येतो आणि शिकार पंज्यात घेऊन चालल्या जातो....
सांगण्याच तात्पर्य असे आहे की, गरुड पक्षासारखे तुम्ही तुमच्या ध्येयावर फोकस ठेवा... लोकांचं ऐकून तुम्ही तुमचे ध्येय अजिबात बदलु नका
मित्रांनो, आजचा लेख दोन तीन वेळा वाचा आणि आजपासून तुम्ही तुमच्या कामात व्यस्त रहा. निगेटिव्ह लोकांना आणि त्यांच्या बोलण्याला इग्नोर करा
लेख आवडला असेल तर नक्की फीडबॅक द्या.
धन्यवाद...🙏🌹😇
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback