थोडं हसायला शिका...

 


मित्रांनो, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या....

तुम्ही दिवसभरात किती वेळा हसता...??

बघा, आपण जेव्हा लहान होतो तेंव्हा दिवसभर हसत-खेळत वेळ घालवायचो... 

मग हळूहळू आपण मोठे होऊ लागलो... मग शाळेत जायाला लागलो, नंतर कॉलेजमध्ये जायाला लागलो....

स्वतःला चांगली नोकरी मिळवायची होती... स्वतःला घडवायचे होते... ह्या सर्व गोष्टी आपण हसत खेळत करत होतो...

आता ऑफिस मध्ये काम करायला लागलो, जीवन जगताना आपण सिरीयस होऊन जीवन जगायला लागलो....आणि यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे गोड हास्य कुठेतरी हरवून गेले आहे...

👉 आता लोक नेसर्गिक हसण्यापेक्षा Whatsapp आणि Facebook इंस्टाग्रामवर इमोजी पाठवून हसत असल्याच दाखवत आहेत....ते सुद्धा खोटं हसणे...


मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का 

✳️ हसणे का महत्त्वाचे आहे...???

👉 मित्रांनो, तुम्ही जर स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्यात खूप गुंतलेले असाल तर तुम्हाला हसण्याची, चेहऱ्यावर गोड हास्य कायम ठेवण्याचा आणि विनोदी बनण्याचा सराव करणे खूप आवश्यक आहे...

जेणेकरून तुम्ही दुःख, तणाव, नैराश्य, चिंता, राग इत्यादींवर सहज मात करू शकाल....एवढंच नाही तर स्वतःमध्ये चमत्कारिक बदल सुद्धा घडवून आणू शकाल.... 

हसणारी आणि हसवणारी माणसं सर्वांना आवडतात..

मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल परंतु आजकल खूप साऱ्या भारतीय कंपन्या आणि बाहेर देशातील कंपन्यामध्ये असेच लोक नोकरीसाठी निवडले जातात... 


जे ऑफिसमध्ये हसतं - खेळतं वातावरण ठेवु शकतील... कामाच्या ठिकाणी विनोदाला चालना देऊ शकतील... कंपन्यांनी यासाठी ह्युमर कन्सल्टंटचे स्थान निर्माण केले आहे...

👉 कारण त्यांचा असा विश्वास आहे की, ऑफिस मध्ये आनंदी हास्य वातावरण असेल तर... व्यक्ती दुप्पट वेगाने काम करू शकतो... एवढंच नाही तर ऑफिसमध्ये बॉसशी आणि इतर लोकांशी उत्तम संवाद करू शकते....हास्यमय वातावरणामध्ये व्यक्ती जास्त सक्रिय आणि आनंदी राहतो...आणि हे 100% खरं आहे... आनंदी व्यक्ती कमी वेळात जास्त काम करू शकतो...

मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या जीवनात खूप Serious असाल तर आजपासून थोडासा Serious पणा सोडुन द्या... आणि थोडं फ्री रहा...

मनमोकळे हसा, लोकांशी गप्पा गोष्टी करा...❤

हास्य ही अशी गोष्ट आहे जी आपण प्रत्येकाला देऊ शकतो....

👉 तुम्ही जर स्वतःला आनंदी ठेवण्याची सवय लावली असेल आणि त्यात हसणे आणि हसवणे हा तुमच्या जीवनाचा भाग बनला असेल तर तुम्ही तुमच्या जीवनात खूप पुढे जात राहाल...

तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुम्ही कुठेही असाल, तुमच्या हसण्याने, आनंदी राहिल्याने तुम्ही लोकांना तुमच्याकडे आकर्षित कराल. तुम्ही लोकांशी कनेक्ट व्हाल आणि लोक तुमच्याशी ऑटोमॅटिक जोडले जातील....ह्या सर्व गोष्टी फक्त हसल्याने घडतात...❤

👉 मित्रांनो, तुम्ही जर हसत नसाल तर तुम्ही चुकीचे जीवन जगात आहात....हे लक्षात ठेवा...

एकीकडे तुम्ही तुमचे आयुष्य चांगले बनवण्याच्या प्रयत्नात रात्र-दिवस मेहनत करत आहात आणि दुसरीकडे तुमचीच मेहनत तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य गायब करत आहे....🤷‍♂️ 

👉 मित्रांनो, स्वतःच्या जीवनात संतुलन आणा....जीवनात पुढे जाणे खूप महत्वाचे आहे परंतु हसत हसत... हसल्याशिवाय समोर जाऊन काय फायदा....

तुम्ही जर हसण्याचे विसरून गेले असाल तर सर्वात आधी एका जागेवर शांत बसा...आणि आपल्या जीवनात डोकावून बघा...


तुम्ही जे काही काम करत आहात... त्या कामामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य गायब होतं असेल तर तुम्हाला काही गोष्टी बदलण्याची खूप गरज आहे....

मित्रांनो, हसणे जीवनाचा भाग बनवा कारण हसल्याने आपल्याला खूप फायदे होतात...

📌 खराब मुड हसल्याने ठीक होतो...

📌 हसल्याने माणुस रिफ्रेश होतो...

📌 रोज हसल्याने माणसाचा चेहरा चमकतो... 

📌 हसल्याने माणसाचे आयुष्य वाढते...

📌 जीवनात जितके जास्त हसाल तितके जास्त तुमचे हृदय निरोगी आणि तंदरुस्त राहील...

📌 खलखळून हसण्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो. ज्यामुळे शरीर आणि मन ताजेतवाणे राहते...

📌 हसण्याने बीपी, मधुमेह यासारख्या गंभीर आजरावर मात करता येते....

📌 हसण्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते...

एक गोष्ट लक्षात ठेवा...

👉 ज्या गोष्टी तुम्ही इतरांना देता, त्याच गोष्टी लोक तुम्हाला परत मिळतं असतात.... तुम्ही जर प्रत्येक व्यक्तीला हसत आणि प्रेमाने बोलतं असाल तर समोरचा व्यक्ती पण तुमच्याशी प्रेमाने आणि हसत बोलेल....

तुम्हाला जर तुमच्या आवतीभोवतीचे वातावरण पॉजिटीव्ह अथवा आनंदी ठेवायचे असेल तर यावर एकच उपाय आहे तुम्ही हसा आणि इतरांना पण हसु द्या... 👍🏻👍🏻

मित्रांनो, आजपासून रोज सकाळी आणि संध्याकाळी मिनिमम 5 मिनिटे मनमोकळे हसत जा...हसल्यामुळे तुमचे आयुष्यमान नक्की वाढेल...

धन्यवाद... 🙏🏻🌹😇

✍️✍️ नरेंद्र दिपके 

( Coach of Personality Development )

☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे.??