रविवारची सुट्टी...
रविवारची सुट्टी
नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, रविवारच्या सुट्टीचे महत्व काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का ?
या प्रश्नाचे उत्तर सर्वांचे वेगवेगळे असतील... कोणी सांगेन रविवारी पार्टी करणे , किंवा रविवारच्या दिवसी दिवसभर झोप घेणे, यासारख्या गोष्टीसाठी रविवारचा दिवस असतो.
नोकरी करणारा माणुस सांगेन कि रविवारचा दिवस हा ७ दिवसांमधून एक वेळेस येतो आणि या पण दिवसी काम कसे करावे...? रविवारचा दिवस हा तर पार्टी किंवा बाहेर जाऊन फिरून येण्यासाठी असतो मग मी हा रविवारचा दिवस कसा वाया घालू....
मित्रांनो, हे खर आहे कि रविवारचा दिवस हा खुशीचा आणि एंजॉय करण्याचा दिवस असतो. परंतु आपण रविवारचा दिवस एंजॉय करत असताना आपण सर्वात महत्वचे काम विसरून जात आहे... १५ वर्ष अगोदरचा जो काळ होता त्या काळामध्ये माणुस जास्त Busy नव्हता, आणि सर्व काम हे २४ तास मध्ये पूर्ण करायचा परंतु आजचा जो काळ आहे, हा धावपळीचा काळ आहे आणि आजच्या माणसाला वेळ मिळत नाही, त्याचे सर्व काम पूर्ण करण्यासाठी....
एक माणसाचा कामाचा वेळ आणि त्याचे रोजचा दिवस जर पाहिला तर आपल्याला समजेल आजचे जीवन किती धावपळीचे आहे...
एक व्यक्ती सकाळी ५ वाजता उठतो.. सकाळी १० ची बस किंवा ट्रेन पकडतो जॉबला जातो... सायंकाळी ५ वाजता ऑफिस मधुन घराकडे निघतो घराकडे येताना परत त्याला ट्रेन किंवा बस पकडुन घरी यावे लागते. घरी येताना त्याला २ ते ३ तास लागतात. म्हणजे रात्रीचे ८ किंवा ८. ३० वाजतात. घरी आल्यानंतर जेवण करतच असतो कि, १० वाजतात आणि तो थकलेला व्यक्ती घरच्या कोणत्या हि व्यक्तीला न बोलता झोपून जातो.
मित्रांनो, आजच्या जगात सर्व माणसे हे पैशाच्या मागे धावत आहेत.. आणि धावत असताना ते त्यांच्या परिवारापासून आणि त्याच्या मित्रांपासून किती दुर धावत आले हे मात्र विसरून गेलेले आहेत....
७ दिवसामधुन १ वेळेस येणारा रविवार हा खूप महत्वाचा आहे तुमच्यासाठी आणि सर्वांसाठी आपण ६ दिवस नोकरी करतो. सर्वजण वेगवेगळ्या पद्दतीने जॉब करतात, स्वतःच्या परिवारासाठी मेहनत करतात परंतु आपण आपल्या आईला किंवा वडिलांना पाहिजे तसा वेळ देतो का.... ?
तुम्हाला आठवते का तुम्ही तुमच्या आई बाबा भाऊ बहीण या सर्वांसोबत एका जागेवर बसुन जेवण कधी केले होते.. कदाचित १ महिना अगोदर किंवा ७ दिवसा अगोदर
मित्रांनो, आपल्या सर्वांना यशस्वी व्हायचं आहे, मोठे व्यक्ती बनायचे आहे आणि सर्वांचे काही न काही स्वप्न असतात ते सुद्धा पूर्ण करायचे परंतु हे सर्व कामे करत असताना आपण आपला वेळ आपल्या परिवारा सोबत नक्की घालवायला पाहिजे.
रविवार हा दिवस आपण पार्टी मध्ये किंवा बाहेर फिरायला जाऊन वाया घालवतो.... बरोबर ना
रविवार हा दिवस आपण कसा एन्जॉय करावा ?
मित्रांनो रविवार दिवसी आपण आपल्या आई बाबा सोबत गपागोष्टी करू शकतो....किंवा आपण आपल्या बायको सोबत शॉपिंग करायला जाऊ शकतो.... किंवा तुम्ही तुमच्या मुलांसोबत खेळू शकता...... किंवा तुम्ही एखादा मराठी चित्रपट सर्व परिवारा सोबत पाहु शकता.... किंवा तुम्ही तुमच्या आवडीचे एखादे पुस्तक वाचु शकता.... मेडिटेशन करू शकता...
मित्रांनो, रविवारची सुटी ही का आहे तर याचे उत्तर असे आहे कि, तुम्ही तुमचा वेळ हा परिवारा सोबत घालावा जेणेकरून नोकरीचे बाकी ६ दिवस तुमचे आनंदी जावे या करीता आपल्या सर्वांना रविवारची सुट्टी मिळत असते....हे लक्षात ठेवा
मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती असं म्हणतो कि, देव जर मला भेटला तर मी देवाची खुप खुप सेवा करीन... देव हा एकटा असल्यामुळे सर्वांच्या घरी तर जाऊ शकत नाही.... यासाठी देवाने एक रूप धारण केले आणि आपल्याला दिले ते म्हणजे आपले आई बाबा....रविवारचा दिवस हा आई बाबा च्या सेवेसाठी द्याला हवा असे मला वाटते.....
मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती असं म्हणतो कि, देव जर मला भेटला तर मी देवाची खुप खुप सेवा करीन... देव हा एकटा असल्यामुळे सर्वांच्या घरी तर जाऊ शकत नाही.... यासाठी देवाने एक रूप धारण केले आणि आपल्याला दिले ते म्हणजे आपले आई बाबा....रविवारचा दिवस हा आई बाबा च्या सेवेसाठी द्याला हवा असे मला वाटते.....
मित्रांनो, इंटरनेट मुळे घरातला प्रत्येक व्यक्ती Busy झालेला आहे... त्याला काम असो अथवा नसो तरी सुद्धा तो दिवस भर मोबाईल मध्ये पाहत बसतो आणि कोणाला एक शब्द बोलत नाही.... आणि स्वतःचा वेळ वाया घालवतो मोबाईल वर आणि नंतर अपयशी होतो.....
मित्रांनो, तुम्ही थोडा बदल केला तर तुम्ही यशस्वी होऊ शकता... त्यामुळे बदल करणे आवश्यक आहे...
मित्रांनो, आज रविवार आहे.... आज मोबाईल दुर ठेवा आणि आई बाबा सोबत किंवा तुमच्या आजी आजोबा सोबत गप्पा गोष्टी करा.... तुम्हाला आणि तुमच्या आईबाबांना सुद्धा खुप आनंद मिळेल तुमच्याशी गप्पा गोष्टी करून.... 😊
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
Nice
उत्तर द्याहटवाNice thought 🙏🙏
उत्तर द्याहटवा