Motivation आणि Discipline यशाचा खरा मंत्र
Motivation आणि Discipline यशाचा खरा मंत्र
विद्यार्थी जीवन हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे पर्व असते. याच काळात घडलेले संस्कार, सवयी आणि निर्णय भविष्यातील यश किंवा अपयश ठरवतात.
आज अनेक विद्यार्थी यशस्वी होण्याचे स्वप्न पाहतात, मोठी ध्येये ठरवतात, पण त्यापैकी काहीच विद्यार्थी त्या ध्येयांपर्यंत पोहोचतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे Motivation आणि Discipline यांच्यातील फरक समजून न घेणे.
👉🏻 आपल्याला अनेकदा एखादे प्रेरणादायी भाषण ऐकून किंवा एखादा यशस्वी व्यक्तीचा व्हिडिओ पाहून खूप उत्साह येतो. त्या क्षणी वाटते की आता आपण खूप मेहनत करू, वेळ वाया घालवणार नाही आणि आयुष्यात काहीतरी मोठे करून दाखवू. पण काही दिवसांनी तो उत्साह कमी होतो आणि पुन्हा जुन्याच सवयी सुरू होतात. यालाच Motivation म्हणतात.
👉🏻 Motivation म्हणजे एखादे काम करण्यासाठी मिळणारी प्रेरणा. ती आपल्याला सुरुवात करायला मदत करते. पण Motivation कायम टिकत नाही. ती हवामानासारखी बदलत राहते. कधी ती खूप असते तर कधी अजिबात नसते.
📌 याउलट Discipline म्हणजे स्वतःला दिलेले वचन पाळणे. मन नसतानाही योग्य काम करणे. अभ्यास करण्याची इच्छा नसली तरी ठरलेल्या वेळेला अभ्यासाला बसणे, मोबाईल वापरायची इच्छा झाली तरी स्वतःला नियंत्रणात ठेवणे, सकाळी उठायला कंटाळा आला तरी वेळेवर उठणे म्हणजे Discipline.
यशस्वी लोक Motivation वर नाही तर Discipline वर विश्वास ठेवतात. कारण Motivation आपल्याला सुरुवात करून देते, पण Discipline आपल्याला ध्येयापर्यंत घेऊन जाते.
उदाहरणार्थ,
👉🏻 एखादा विद्यार्थी नवीन वर्षाच्या सुरुवातीला ठरवतो की तो दररोज 5 तास अभ्यास करणार. सुरुवातीचे काही दिवस तो खूप उत्साहाने अभ्यास करतो. पण नंतर मित्रांचे फोन, सोशल मीडिया, क्रिकेट सामने किंवा इतर गोष्टींमुळे त्याचा उत्साह कमी होतो.
जर तो फक्त Motivation वर अवलंबून असेल तर तो अभ्यास सोडून देईल. पण जर त्याच्याकडे Discipline असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत आपले वेळापत्रक पाळेल.
विद्यार्थ्यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की यश एका दिवसात मिळत नाही. प्रत्येक मोठ्या यशामागे हजारो छोट्या सवयी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न असतात.
दररोज थोडा थोडा अभ्यास करणे, वेळेचे व्यवस्थापन करणे, नियमित वाचन करणे आणि स्वतःला सुधारत राहणे या गोष्टी यशाचा पाया तयार करतात.
आजच्या काळात विद्यार्थ्यांसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे मोबाईल आणि सोशल मीडिया. अनेक विद्यार्थी तासन्तास रील्स पाहण्यात, गेम खेळण्यात किंवा निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ घालवतात. त्यांना वाटते की अजून खूप वेळ आहे. पण वेळ एकदा निघून गेली की ती परत येत नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःला विचारले पाहिजे की मी माझा वेळ माझ्या भविष्यावर खर्च करतोय की फक्त मनोरंजनावर?
👉🏻 Discipline विकसित करण्यासाठी काही सोप्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे.
सर्वप्रथम, दररोजचे वेळापत्रक तयार करा. कोणत्या वेळेला अभ्यास करायचा, विश्रांती घ्यायची, व्यायाम करायचा आणि झोपायचे हे निश्चित करा.
👉🏻 दुसरे म्हणजे, लहान ध्येये ठरवा. मोठे ध्येय एकदम पूर्ण करण्याऐवजी त्याचे छोटे भाग करा. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि प्रगती दिसू लागते.
तिसरे म्हणजे, सातत्य ठेवा. एखादा दिवस खराब गेला तरी निराश होऊ नका. दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने सुरुवात करा.
चौथे म्हणजे, सकारात्मक लोकांच्या सहवासात रहा. ज्या लोकांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठे करायचे आहे अशा लोकांबरोबर राहिल्यास आपलीही प्रगती होते.
पाचवे म्हणजे, स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. आपली स्पर्धा फक्त कालच्या स्वतःशी असावी.
इतिहासातील आणि वर्तमानातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात Discipline ला विशेष महत्त्व होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद आणि इतर अनेक महान व्यक्तींनी कठोर परिश्रम, सातत्य आणि शिस्त यांच्यामुळे यश मिळवले.
👉🏻 विद्यार्थ्यांनी हे समजून घेतले पाहिजे की Motivation ही ठिणगी आहे, पण Discipline हे इंधन आहे. ठिणगी काही क्षणांसाठी पेटते, पण इंधनामुळेच आग सतत जळत राहते. त्यामुळे फक्त प्रेरणा शोधण्यात वेळ घालवू नका. स्वतःमध्ये शिस्त निर्माण करा.
👉🏻 आज तुम्ही घेतलेले छोटे छोटे निर्णयच उद्याचे तुमचे भविष्य घडवणार आहेत.
दररोज एक तास जास्त अभ्यास, एक तास कमी मोबाईल, एक चांगले पुस्तक आणि एक सकारात्मक विचार तुमचे आयुष्य बदलू शकतो.
लक्षात ठेवा, यशस्वी विद्यार्थी ते नसतात ज्यांच्याकडे सर्वात जास्त बुद्धिमत्ता असते यशस्वी विद्यार्थी ते असतात ज्यांच्याकडे सर्वात जास्त Discipline असते.
👉🏻 म्हणूनच आजपासून स्वतःला एक वचन द्या 🤝
मी Motivation ची वाट पाहणार नाही. मी Discipline ला माझी सवय बनवेन. कारण माझे भविष्य माझ्या आजच्या सवयींवर अवलंबून आहे.
👉🏻 तुमची स्वप्ने मोठी ठेवा, ध्येय स्पष्ट ठेवा आणि शिस्तीला तुमचा सर्वात जवळचा मित्र बनवा. यश तुमच्या पावलांशी नक्कीच येईल...💫
धन्यवाद... 🙏🏻🌹😇
✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️9545441697


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback