नियोजन जीवनाचे
👉 1 जानेवारी 2021 ला तुम्ही स्वतःला बदलण्यासाठी खुप खुप plan बनवले असतील, स्वतःचे स्वप्न आपण कसे पुर्ण करू याबद्दल पण तुम्ही खुप नियोजन केले असतील.
तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही प्रत्येक दिवसाचा टाइम टेबल ठरवला असेल...
जगातला प्रत्येक व्यक्ती 1 जानेवारी ला नवीन नवीन योजना बनवतो, चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न सुद्धा करतो...
1 जानेवारीला केलेले नियोजन, नवीन सकंल्प खुप लोक Follw सुद्धा करतात, परंतु 15 दिवसांनी त्यांच्या तो उत्साह एकदम गायब होते, आणि आजचे काम उद्यावर ढकलण्याची त्यांना सवय लागते...
आणि हि सवय माणसाला बरबाद करते
👉 मित्रांनो, आजपासुन जुन महिना सुरु होत आहे, याचा अर्थ असा आहे, की 2021 वर्षाचे 5 महिने संपले, या 5 महिन्यात खुप लोकांनी अभ्यास केला असेल, खुप लोकांनी पुस्तके वाचले असतील.
परंतु
काही लोकांनी या 5 महिन्यात फक्त आणि फक्त Time Pass केला असेल.
👉 मित्रांनो, वेळ कुणासाठी थांबत नाही, आणि जो थांबतो तो संपतो.
मित्रांनो, आज पर्यंत तुम्ही, जो काही Time Pass केला असेल, youtube वर वेळ वाया घालवला असेल, किंवा फेसबुक इंस्टाग्राम वर वेळ वाया घालवला असेल ते सर्व काल पर्यंत ठिक आहे..
परंतु आजपासुन बंद करा
👉 तुम्हाला जर जीवनात काही तरी करायच असेल किंवा जीवनात यश प्राप्त करायच असेल, काही तरी बनायचं असेल तर आताच वेळेचे नियोजन करायला हवं...
*(वेळेचे नियोजन कसे करावे हे माहिती नसेल तर Time Management कोर्स करा )*
कारण जगातली सर्वात किंमती वस्तु म्हणजे वेळ
1 जुन 2021 पासुन नवीन योजना करा, आणि स्वतःला वेळ द्या, पुस्तके वाचायला वेळ काढा,
To Do List तयार करा...
मला खुप लोकांचे प्रश्न येतात, सर मला माझे जीवन बदलायचे तर काय करू??
या जगातला कोणताही व्यक्ती स्वतःचे जीवन बदलु शकतो, मग तो गरीब असेल किंवा श्रीमंत
जीवन बदलण्याची सुरुवात एका गोष्टीने करा, रोज पुस्तकाचे 50
page वाचा...
मित्रांनो, 1 जुन ते 31 डिसेंबर पर्यंत पुस्तकाला मित्र करा..
2022 वर्ष तुम्ही असे जगाल ज्याच्या तुम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल...
जीवन बदलु शकते तेंव्हा, जेंव्हा तुम्ही स्वतःला ओळखाल
✍️✍️ *नरेंद्र दिपके*
_( Coach of Personality Development )_
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback