Birthday Party...




 मित्रांनो, मी कधी कुणाच्या बर्थडे पार्टीला सहजा सहजी जात नाही,  परंतु या वर्षी दोन तीन मित्राच्या बर्थडे ला हजर होतो, आणि तिथे मी काही गोष्टी पाहिल्या त्या सर्व गोष्टी तुमच्याशी Share करणार आहे...

👉 मित्रांनो, वाढदिवस म्हणजेच  जन्मदिवस बर का

परंतु वाढदिवस म्हटलं की थोडा जास्तच आनंद होतो आपल्याला...

मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का जन्मदिवस साजरा करण्याची एक नवीन पद्धत आली आहे, ती म्हणजे जन्मदिवसाला cake आणून वाया घालवण्याची पद्धत...



👉 ज्या व्यक्तीचा जन्मदिवस असतो तो उभा असतो आणि त्याचा समोर Cake ठेवलेला असतो, Birthday song सुरु होते आणि केक कापला जातो... आता इथ पर्यंत सर्व ठिक आहे...

परंतु 

👉 त्या पार्टी मध्ये असे पण काही मित्र असतात ते केक कापल्या कापल्या पुर्ण केक जन्मदिवस असणाऱ्या व्यक्तीच्या तोंडाला लावण्यात व्यस्त होतात  आणि तेंव्हा कुठे तरी त्यांचा Happy वाला Birthday साजरा होतो...

👉 आणि जर का त्यांचा Birthaday boy पैसेवाला असेल तर केक कमी आणि फुलाचे गुच्छ जास्त प्रमाणात आणले जातात... सर्व जण त्या birthday boy ला फुलाचे  गुच्छ आणि शुभेच्छा देतात त्याच्या सोबत फोटो काढतात आणि नंतर दोन किंवा तीन दिवसानंतर पाहुण्यानी दिलेले सर्व फुलाचे गुच्छ काचऱ्याचा गाडीत टाकल्या जातात...

 मित्रांनो, तुम्ही किती ही  प्रेमाने लाडाने तो फुलाचा गुच्छ विकत आणला असेल भले ही त्या फुलाच्या गुच्छाची किंमत 150 असेल किंवा 300 होऊ शकते त्याची किंमत 500 पेक्षा ही महाग असेल तरी शेवटी त्याचा शेवट  कचऱ्यातच होतो...

मित्रांनो, वरील सर्व पद्धती खुप जुन्या आणि वेस्टिंग झालेल्या आहेत, आणि या पद्धतीत काही तरी बदल करायला हवा असं मला वाटतं...

मित्रांनो, एक विचार करा आपण आपल्या मित्राला 150 किंवा 200 च गिफ्ट देतो ते तसेपण वाया जाते...

आपण जर फुलाच्या गुच्छाचा  जागी एखादे झाडाचे रोपटं दिले  तर...

मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या मित्राला झाडाचे रोपटं भेट म्हणुन दिली तर ते झाड किमान 50- 100 वर्ष तरी कचऱ्यात जाणार नाही...

आणि प्रत्येकाने जर एक एक झाडाचे रोपटं  दिल तर तेवढीच वृक्ष लागवड होईल...

मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी माझा  एक प्रश्न आहे...

👉 तुम्ही तुमच्या मित्राला आज  पर्यंत जे कोणते गिफ्ट दिल असेल त्या गिफ्ट मुळे तुमच्या मित्राच जीवनात काही बदल झाला का....? 

थोडं थांबा आणि विचार करा आज पर्यंत तुम्ही तुमच्या मित्राला काय काय गिफ्ट दिल्या...

👉 ज्या व्यक्तीला गर्लफ्रेंड असेल त्याने सुद्धा आज विचार करायचा आहे... की आज पर्यंत आपण आपल्या प्रियसीला कोण कोणत्या भेट वस्तु दिल्या... मला माहिती आहे तुम्ही सर्व भेटवस्तु घरच्याचा  लपून दिल्या असतील तरी सुद्धा विचार करा... 😄

जेंव्हा तुम्ही विचार करसाल तेंव्हा तुमच्या लक्षात येईल की, तुम्ही दिलेल्या खुप भेट वस्तु दुसऱ्याच दिवसी कचऱ्यात जमा झाल्या असतील...

मित्रांनो, मला या लेख मध्ये एवढेच सांगयच आहे, की तुम्ही तुमच्या मित्राला आशा वस्तु भेट म्हणुन द्या त्या वापरल्याने त्याच जीवन थोडं फार तरी बदलेल...

👉 तुम्ही तुमच्या मित्राला, एक चांगल पुस्तक गिफ्ट देऊ शकता, जगातलं सर्वात महाग  गिफ्ट म्हणजे पुस्तकच आहे, कारण खुप कमी लोक पुस्तक खरेदी करून दुसऱ्याला भेट देतात...



मित्रांनो, तुम्ही जर एक पुस्तक वाचलं तर त्याच ज्ञान तुम्ही संपे पर्यंत तुमच्याजवळ राहते 

तुम्ही तुमच्या मित्राला एखादा पेन आणि note book भेट म्हणुन द्या, आणि त्याला सांगा तुझ्या सर्व इच्छा यावर लिहीत जा,

👉 जर  तुम्हाला तुमच्या मित्राला भेट वस्तु विकत घ्यायला पैसेच नसतील तर किमान 7 दिवसातून 5 मिनिट वेळ काढा आणि तो वेळ मित्राला द्या.... मित्राला कॉल करा आणि 5 मिनिट गप्पा गोष्टी करा... 😊

✍️✍️ नरेंद्र दिपके

(Coach of Personality Development )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

Motivation आणि Discipline यशाचा खरा मंत्र

थोडं हसायला शिका...