दुःखातून बाहेर कसे यावे...?
मित्रांनो, एक विचार करा
पावसाळ्याचे दिवस आहेत. तुम्ही नवीन कपडे घालुन ऑफिसला जात आहात. ऑफिसला जाताना अचानक तुमचा पाय घसरतो आणि तुम्ही एका पाण्याचा गटारात पडता... 😄
मित्रांनो, आता माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या...
तुम्ही पाण्याचा गटारात पडल्या नंतर काय कराल...?
तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे..
तुम्ही गटारातून उठशाल... घरी जाशाल, घरी गेल्यानंतर अंघोळ कराल, नवीन कपडे घालाल आणि पुन्हा ऑफिससाठी घराच्या बाहेर निघाल... 👍
👉 मित्रांनो, सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की आपण आपल्या एकाच समस्या मध्ये नेहमी पडून राहतो...
एक उदाहरणं सांगतो, जनेकरून तुमच्या लक्षात लवकर येईल...
👉 मित्रांनो, एक विद्यार्थी आहे... तो रोज अभ्यास करत असतो...
एके दिवसी त्याच्या घरी पाहुणे येतात. घरी पाहुणे आल्यामुळे त्याच्या अभ्यासा मध्ये 5, 6 दिवसाचा अंतर पडतो.
काही दिवसानंतर पाहुणे परत जातात आणि हा पुन्हा अभ्यासला बसतो... परंतु अभ्यास करत असताना त्याला खूप समस्या जाणवू लागतात... जसे की अभ्यासा मध्ये मन न लागणे..
अभ्यासाचा कंटाळा येणे...
👉 हे पाहा, जेंव्हा आपले मन अभ्यासा मध्ये लागत नाही. आपल्याला अभ्यासाचा जेंव्हा कंटाळा येतो तेंव्हा आपण घरी आलेल्या पाहुण्यांना दोष देतो...
👉 मस्त अभ्यास करत होतो. अभ्यास करण्याची सवय लागली होती मधेच हे पाहुणे आले आणि माझी सवय मोडली... असे आपण स्वतःशी बोलत असतो
असो...
जसे की मी सांगितले गटारात पडल्यावर आपण उभे राहतो. घरी जातो, अंघोळ करतो आणि पुन्हा आपल्या कामावर निघुन जातो..
त्याच प्रमाणे घरी आलेले पाहुणे जो पर्यंत आहे तो पर्यंत तुम्ही स्वतःला सांगु शकता... 5, 6 दिवस मस्त एन्जॉय करू नंतर पुन्हा अभ्यासवर फोकस करू अभ्यास करू
Actul मला खूप लोकांचे msg येतात,
सर, माझी गर्लफ्रेंड मला सोडुन गेली, माझं जेंव्हापासुन ब्रेकअप झालं तेंव्हा पासुन माझं मन कशातच लागत नाही सर मी काय करू
किंवा
सर, मी एका परीक्षेसाठी खूप तयारी केली होती परंतु मी त्या परीक्षेत Fail झाले...
समजा, तुमचे ब्रेकअप झाले आशा वेळेस काय कराल...
आशा वेळेस तुम्ही एक गोष्ट करू शकता... ज्याच्या सोबत ब्रेकअप झालं त्याला शेवटच good bye लेटर पाठवा...आणि दुसऱ्यादिवसापासून तुम्ही तुमच्या goal वर फोकस करा अभ्यास सुरु करा...
किंवा
दिवसामधुन 3 तास स्वतःला द्या, अभ्यास करा आणि नंतर ब्रेकअप झालं म्हणून दिवसभर रडत बसा. 😄
मित्रांनो, प्रॉब्लेम कोणता ही असो प्रत्येक प्रॉब्लेमच सोल्युशन नेहमी असते.
मी तर म्हणेल प्रत्येक प्रॉब्लेमच सोल्युशन आपल्या जवळ असते.
आपण उगाच आपल्या प्रॉब्लेमच सोल्युशन दुसरीकडे शोधत बसतो आणि आपला वेळ फुकट वाया घालवत असतो...
मित्रांनो, निगेटिव्ह गोष्टीना तुम्ही पॉजिटीव्ह कसे बनवता हे फार महत्वाचं आहे...
तुमचे मन अभ्यासामध्ये लागत नसेल किंवा अभ्यास करताना कंटाळा येत असेल तेंव्हा खाली दिलेल्या टिप्स वापरा...
1) आवडीचे गाणे ऐका...
👉 मित्रांनो, तुम्ही अभ्यास करून बोर झाले असाल किंवा अभ्यास करण्याचा कंटाळा येत असेल तेंव्हा Youtube सुरु करा आणि तुमच्या आवडीचे गाणे ऐका आणि त्या गाण्यासोबत गाणे म्हणा... असं केल्याने तुमचा मुड फ्रेश होईल आणि पुन्हा तुम्ही अभ्यास करण्यासाठी बसु शकता...👍
2) आवडीच्या व्यक्तीसोबत/ मित्रांसोबत 2 मिनिट गप्पा करा...👉 जेंव्हा मी पुस्तक वाचुन खूप बोर होतो, किंवा मला पुस्तक वाचण्याचा खूप कंटाळा येतो तेंव्हा मी स्नेहा ताईला फोन करतो ताई सोबत थोडा वेळ गप्पा करतो... स्नेहा ताई ह्या एक psychologist आहे... त्यांच्याशी दोन मिनिट बोलुन मला खूप खूप पॉजिटीव्ह एनर्जी मिळते...
सांगण्याचे तात्पर्य असे आहे की, तुम्ही खूप बोर होत असाल तेंव्हा तुम्ही तुमच्या आवडीच्या मित्रांसोबत थोडा वेळ गप्पा मारू शकता... 👍
3) कुठे तरी बाहेर फिरायला जा...
👉 अभ्यास करण्याचा कंटाळा येत असेल तेंव्हा स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी तुम्ही गार्डन मध्ये जाऊ शकता... कंटाळा आला तेंव्हा थोडा वेळ बाहेर फिरायला जा.. 👍
4) थोडा वेळ विश्रांती घ्या...
👉 समजा, तुम्ही पुस्तक वाचुन वाचुन खूप कंटाळून गेले आहात... आशा वेळेस पुस्तक बंद करा आणि थोडा वेळ मस्त झोप घ्या... किंवा मस्त नदीच्या किनाऱ्यावर जाऊन बसा आणि वाहते पाणी पाहा...
5) तुमच्या आवडीचा खेळ खेळा...
👉 स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी हा पॉईंट खूप महत्वाचा आहे...
मित्रांनो, जेंव्हा तुम्ही खूप बोर व्हाल तेंव्हा स्वतःचा आवडीचा खेळ खेळा... आपल्या आवडीचा खेळ खेळताना आपल्याला आनंद मिळतो, आणि जेंव्हा तुम्ही अभ्यास करण्यासाठी बसाल तेंव्हा अभ्यास मध्ये सुद्धा तुम्हाला आनंद मिळेल. 👍
मित्रांनो, आजचा लेख दोन वेळा वाचा, आणि सांगितलेल्या टिप्स स्वतःच्या जीवनात लागु करा...
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback