प्रत्येक समस्याचे सोलुशन
Narendra Dipake:
नमस्कार मित्रांनो, कसे आहात
आशा करतो की सर्वजण आनंदी असाल खुश असाल....
👉 मित्रांनो, आजचा लेख खास तुमच्यासाठी आहे. कारण आपल्या ग्रुपमधुन खूप मित्रांचे मला प्रश्न आलेत.
प्रश्न असे होते की,
सर, माझ्या जीवनात प्रॉब्लेम सुरु आहेत. मी काय करायला हवं
सर, मी परीक्षा मध्ये नापास झाले/झालो. मी काय करायला पाहिजे.
सर, अभ्यास कसा करावा.?
सर, अभ्यासमध्ये मन लागत नाही. मी काय करायला पाहिजे.
मित्रांनो, तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या लेखामध्ये मिळणार आहे.
मित्रांनो, एका माणसाला रात्री पार्टीला जायचं असतं त्यामुळे तो पूर्ण तयारी करतो. कारची चाबी हातामध्ये फिरवत फिरवत तो बाहेर येतो तेवढ्यात त्याच्या हातामधली चाबी पडून जाते आणि घरामधली लाईट चालल्या जाते. घरात सर्वत्र अंधार होतो.
👉 तो माणुस त्याच्या कारची चाबी त्या अंधारात पाहतो
परंतु त्याला चाबी दिसत नाही. तो माणुस घराच्या बाहेर पाहतो. घराच्या बाहेर एका लाईटचा खंबा असतो तिथे एक लाईट सुरु असतो. त्यामुळे तो व्यक्ती घराच्या बाहेर येतो आणि त्या खंब्याखाली चाबी पाहायला लागतो....
तेवढ्यात त्या व्यक्तीचा शेजारी तेथे येतो..तो त्या माणसाला विचारतो तुम्ही काय करत आहात. काय शोधत आहात
तेंव्हा तो व्यक्ती म्हणतो माझ्या कारची चाबी हरवली आहे. ती शोधत आहे...
शेजारचा व्यक्ती विचारतो तुमची चाबी कुठे हरवली आहे.
तेंव्हा तो व्यक्ती म्हणतो माझी चाबी घरामध्ये हरवली आहे. परंतु घरामध्ये खूप अंधार आहे. बाहेर उजेड दिसला त्यामुळे बाहेर चाबी शोधत आहे... 😄
मित्रांनो, तुम्हाला गोष्ट समजली असेल तर नक्की तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल...
मित्रांनो, सांगण्याचे तात्पर्य असे आहे की आपण नेहमी आपल्या प्रॉब्लेमच सोलुशन बाहेर पाहत असतो. खरं तर आपल्या प्रत्येक प्रॉब्लेमच सोलुशन हे आपल्या जवळच असते.
गरज असते फक्त स्वतःला प्रश्न विचारण्याची...
समजा, तुम्ही एका परीक्षेत Fail झाले आहात.
आशा वेळेस काय करायला हवं
सर्वात प्रथम आपण Fail झालो हे स्वीकारा... नंतर स्वतःला प्रश्न विचारा की मी Fail का झालो...
जेंव्हा तुम्ही स्वतःला खूप खूप वेळा प्रश्न विचाराल तेंव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळत. 👍
मित्रांनो तुम्हाला काही टिप्स सांगतो त्या टिप्स स्वतःच्या जीवनात लागु करा...
1) स्वीकार करा
👉मित्रांनो, मी असे खूप लोक पाहिले ते स्वतःच्या चुका कधीच स्वीकार करत नाहीत. ते असं कधी बोलणार नाही. हो माझ्याकडून चुक झाली. मी माझी चुक मान्य करतो आणि चुक सुधारतो.
मित्रांनो, जेंव्हा पण तुमच्याकडून एखादी चुक होईल तेंव्हा ती चुक स्वीकार करा.
होत काय जेंव्हा आपण चुका करतो त्या स्वीकार करतो तेंव्हाच आपल्याला समजतं की आपण कुठे आणि किती चुका करत आहोत.
चुका स्वीकार करा चुकांमधून नवीन धडा शिका आणि आपल्याकडुन का चुक झाली याचे कारण शोधा... एकच चुक पुन्हा पुन्हा करू नका.
2) थोडा वेळ स्वतःला द्या
👉 मित्रांनो, तुमच्या जीवनात खूप अडचण सुरु असेल. किंवा तुम्ही एखाद्या विषयात Fail झाले असाल.
तुम्ही तुमच्या जीवनात आनंदी नसाल आशा वेळेस काय करायला पाहिजे.
आशा वेळेस तुम्ही सर्वात प्रथम स्वतःला शांत करायला हवा...
नंतर एक पेन आणि वही घ्या त्यावर तुमचे goal लिहा
नंतर एका कोऱ्या कागदाचे दोन भाग करा.
एका भागात तुम्हाला आता पर्यंत मिळालेले अपयश किंवा ज्या गोष्टी तुम्हाला नको वाटतात त्या गोष्टी लिहा... नंतर तो कागद गोळा मोळा करा आणि कचऱ्याचा पेटीत फेकून द्या...
दुसऱ्या भागात तुम्हाला तुमच्या जीवनात कोणकोणत्या गोष्टी हव्या त्या लिहा. आणि त्यानुसार रोज काम करा.
3) आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.
👉 मित्रांनो, काही लोक खरोखर खूप दुःखी असतात. आणि काही लोक बिनाकारण दुःखी असतात.
दुःखी असणारे लोक रहातात वर्तमानमध्ये परंतु विचार करतात भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टीचा त्यामुळे त्यांना नेहमी दुःख येते...
मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आजचा दिवस उद्याचे भविष्य आहे.
तुम्ही आज दुःखी असाल तर उद्याचा दिवस सुद्धा तुमच्यासाठी दुःख घेऊन येईल...
त्यामुळे रोज आनंदी राहण्याचा प्रयत्न करा...
4) रोज सकाळी आणि रात्री 15 मिनिट मेडिटेशन करा. मेडिटेशन करण्याची सवय नसेल तर आजपासून सवय लावा. 👍
5) जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी बद्दल आणि तुमच्याजवळ असलेल्या प्रत्येक वस्तूबद्दल नेहमी Gratitude राहा.
मित्रांनो, आजचा लेख आवडला असेल तर नक्की फीडबॅक द्या.
👉 मित्रांनो, 20 दिवसाचे Workshop आयोजित केलेले आहे. या Workshop
मध्ये तुम्हाला 1)Time Management Skills, 2)Self Management Skills, 3)Communication Skills, 4)Decision Making Skills, 5)Self - Motivation Skills
वरील सर्व कोर्स तुम्हाला एकाच कोर्स मध्ये शिकायला मिळणार आहेत.
( Workshop Free नाही... )
ज्या व्यक्तीला कोर्स शिकायचे आहेत. त्यांनीच माझ्याशी संपर्क अथवा व्हाट्सअँप msg करावा...
धन्यवाद... 🙏
👉 नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback