स्वतःला बदला
हॅलो मित्रांनो, कसे आहात? आशा करतो तुम्ही सर्वजण मजेत आनंदी आणि निरोगी असालच..
मित्रांनो, तुम्ही एखादा क्रिकेट सामना पाहिला आहे का..?
क्रिकेट मॅच वेगवेगळ्या फॉरमॅट मध्ये खेळले जाते. जसे कि,
टेस्ट मॅच, वनडे मॅच, T20 मॅच
मित्रांनो, माझा तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे...
तुम्ही टीव्हीवर एखादा क्रिकेट सामना पाहिला आहे का.??
नक्कीच पाहिला असेल... हो ना
कालची मॅच तर नक्कीच पाहिली असेल
india vs South Africa
असो,
👉 मित्रांनो, क्रिकेट या खेळामधुन तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकु शकता... बॅटिंग कशी करायची किंवा बॉलिंग कशी करायची एवढंच नाही तर या व्यतिरिक्त तुम्ही खूप काही शिकु शकता.
फक्त तुम्हाला शिकता आले पाहिजे.
एक उदाहरणं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
वनडे मॅच ही 50 ओव्हरची मॅच असते. म्हणजे 300 बॉल
टॉस जिंकणारी टीम एक तर बॅटिंग करेल किंवा बॉलिंग करेल.
समजा, A टीमने टॉस जिंकून बॅटिंग निवडली आहे..
मॅच सुरु झाली आणि सुरुवातीच्या 5, 6 ओव्हर मध्ये एक दोन विकेट पडल्या. विकेट पडल्यावर पीचवर नवीन बॅट्समन येतात.. ते आल्या आल्या Four, Six मारत नाहीत. तर ते फक्त एक दोन रन काढुन स्कोर बोर्ड चालवतात..
40 ओव्हर पर्यंत टुकटुक खेळतात.. जेंव्हा शेवटचे 10 ओव्हर असतात. त्या ओव्हर मध्ये सर्वात वेगाने धावा काढतात .. त्याचं कारण म्हणजे स्कोर वाढायला पाहिजे आणि डॉट बॉलचे रन सुद्धा वसूल झाले पाहिजे...जो स्कोर 40 ओव्हर पर्यंत 180 असतो तोच स्कोर 10 ओव्हर नंतर 295 च्या जवळपास गेलेला दिसतो... 🏏
B टीम जेंव्हा चेस करायला उतरेल तेंव्हा ती टीम सुद्धा 40 ओव्हर पर्यंत आरामशीर खेळेल नंतरच्या 10 ओव्हर मध्ये जोरात खेळेल... जी टीम चांगली खेळेल ती शेवटच्या ओव्हर मध्ये नक्कीच जिंकते... या मध्ये काही doubt नाही... ही झाली क्रिकेट स्ट्रॅटेजि
मित्रांनो, आता हा क्रिकेटचा सामना आपल्या चालु वर्षा मध्ये लागु करून पाहा... आणि काय जाणवते ते पाहा...
👉 मित्रांनो, उद्या ऑक्टोबर महिना सुरु होत आहे. म्हणजे 2022 वर्ष संपायला आता फक्त आणि फक्त 3 महिने बाकी आहेत... 92 दिवस बाकी आहेत....
92 दिवसा नंत्तर पुन्हा नवीन वर्ष 2023 सुरु होईल...
मित्रांनो, 1 जानेवारी 2022 ला तुम्ही जे जे संकल्प घेतले होते ते पूर्ण केले आहेत का.??
स्वतःला बदलण्याचे संकल्प असतील किंवा रोज सकाळी लवकर उठण्याचा संकल्प असेल...
तुम्ही ठरवलेले सकंल्प पूर्ण केले नसतील तर तुम्ही कधी पूर्ण करणार आहात.??
तुम्ही आता जसे आहात तसाच फालतु वेळ खर्च कराल तर येणारे 3 महिने चालता बोलता सहज निघुन जातील... तुमचे पूर्ण वर्ष असेच चालल्या जाईल... नंतर पुन्हा नवीन वर्ष येईल... नंतर पुन्हा नवीन संकल्प कराल. नंतर पुन्हा जैसे ते वैसे... याला काय अर्थ आहे.?
मित्रांनो, 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर पर्यंत म्हणजे आज पर्यत तुम्ही रोज 1 तास अभ्यास केला असेल... एखादा सण आला तर अभ्यासाला सुट्या सुद्धा पडल्या असतीलच ... मुड झाला अभ्यास करा. कंटाळा आला आज Movie पाहा...पूर्ण 9 महिने असं करत आले असाल... बरोबर ना
मित्रांनो, आता पर्यंत तुम्ही अभ्यास केला असेल किंवा नसेल केला काही हरकत नाही.. परंतु 2022 वर्षाचे शेवटचे 3 महिन्या मध्ये फोर सिक्स मारण्याची वेळ आलेली आहे...
ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर
तीन महिने स्वतःला द्या...
एक गोष्ट लक्षात ठेवा... जग तुम्हाला ज्ञान देईल परंतु जगण्यासाठी पैसे लागतात. त्यामुळे पैसे कमवायचे कसे ते पाहा आणि पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग तयार करा... एकाच गोष्टीवर अवलंबून राहु नका...
मित्रांनो, माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या.
1 जानेवारी 2022 ला तुम्ही जसे होता तसेच आज आहात का.??
स्वतःमध्ये काही बदल झाला कि नाही झाला.
स्वतःमध्ये बदल केला नाही तर स्वतःला कधी बदलणार आहात.? बदल तुम्हा स्वतःलाच करावा लागणार आहे.. कोणीच येणार नाही तुम्हाला बदलायला...
👉 तुम्ही गरीब आहात कि श्रीमंत मला माहिती नाही परंतु मला एक गोष्ट 100% माहिती आहे... तुमच्या मध्ये अशी एक ताकद आहे.. ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करू शकता... स्वतःला ओळखा
तुम्ही लहानपणी शक्तिमान सिरीयल पाहिली असेलच... त्या सिरीयल मध्ये एखाद्या व्यक्तीने तीन वेळेस शक्तिमान शक्तिमान शक्तिमान ओरडले कि शक्तिमान वाचवायला येत होता.
तुम्हाला असं वाटतं असेल कि सिरीयल सारखा एखादा व्यक्ती आपल्या जीवनात येईल आणि आपले पूर्ण जीवन बदलून टाकेल... असं तुम्हाला वाटतं असेल तर बॉस तुम्ही अजुन सुद्धा झोपलेले आहात...
मित्रांनो, तुमचे वय 23, 24 असेल तर हिच वेळ आहे स्वतःला बदलण्याची आणि काही तरी करून दाखवण्याची...
येणारे 3 महिन्याचे नियोजन करा... व्हाट्सअप, इंस्टाग्राम, Youtube वर फालतु व्हिडीओ पाहु नका. वेळेची बचत करा... आणि तो वेळ अभ्यासाठी खर्च करा...
मित्रांनो, तुम्ही आता जसे आहात हिच तुमची खरी परिस्थिती आहे... परिस्थितीपासुन पळू नका...
आता तुम्ही जसे आहात त्याला कारणीभूत तुमचा भूतकाळ आहे... आता तुमची जी परिस्थिती आहे त्याला स्वीकारा आणि परिस्थिती बदलायला सुरुवात करा...
येणारे 3 महिने तुम्ही सिरीयसली अभ्यास करायला लागा.
रोज व्यायाम केला तर जानेवारी महिन्यात तुम्हाला खूप छान Result पाहायला मिळेल...
3 महिने कोणाचे व्हाट्सअप स्टेटस पाहु नका... काही फरक पडत नाही. तुम्ही लगेच स्टेटस पाहता समोरच्याला वाटतं तुम्ही रिकामे बसलेले आहात...
👉 तुमचा एखादा मित्र असेल तर त्याला पण 3 महिने भेटु नका. तुम्हाला वाटतं असेल कि माझा मित्र खरा आहे तर... एक दिवस त्याने ठेवलेले व्हाट्सअप स्टेटस पाहु नका... नंतर पाहा तो सुद्धा तुमचे व्हाट्सअप स्टेटस पाहणार नाही... 😄
दिवसभर व्हाट्सअपवर स्टेटस ठेवण्यात आणि पाहण्यात स्वतःचा वेळ वाया घालु नका... 3 महिने स्वतःला द्या... चांगल्या सवयी स्वतःला लावा... मग पाहा तुमचे जीवन कसे बदलते...
👉 लोक बोलतात म्हणून त्यांच ऐकु नका... तुम्हाला जे आवडते तेच करा.. कारण आवडीचे काम केल्यानेच लवकर यश मिळत असते... त्यामुळे लोक काय बोलतात काय म्हणतात यावर जास्त लक्ष देऊ नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि लागा कामाला
मित्रांनो, सध्या मी एक पुस्तक लिहीत आहे ते पुस्तक तुम्हाला 25 ऑक्टोबर 2022 ला Ebook च्या स्वरूपात वाचायला मिळेल... 📚
धन्यवाद.. 🙏
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach Of Personality Development )
☎️☎️ 9545441697
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback