छोट्या छोट्या सवयीचे मोठे फायदे...🧘‍♂️


छोट्या छोट्या सवयीचे मोठे फायदे...🧘‍♂️


मित्रांनो, निसर्ग आपल्याला रोज नवीन दिवस आणि नवीन 24 तास देतो....

24 तासाचा उपयोग कसा करायचा... हे आपलं आपल्यावर अवलंबून असते....

मित्रांनो, 24 तासाचा उपयोग तुम्ही टीव्ही, इंस्टाग्राम, झोप घेण्यात घालवू शकता...किंवा नवीन गोष्टी शिकण्यासाठी वेळेचा उपयोग करू शकता....निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे...

मित्रांनो, आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला काही छोट्या छोट्या सवयीबद्दल माहिती देणार आहे....आजचा लेख वाचा आणि लेखात सांगितलेल्या टिप्स स्वतःच्या जीवनात लागू करा...👇👇

1) पैसे खर्च करण्याआधी कमवायला शिका...
👉 मित्रांनो, पैसे खर्च करण्यापूर्वी आधी पैसे कमवायला शिका....

आई बाबा म्हटल्या म्हटल्या आपल्याला पैसे देतात... आई बाबांनी दिलेले पैसे रिकाम्या गोष्टीमध्ये खर्च करू नका...

मित्रांनो, खूप विद्यार्थी असे आहेत की ते जॉब करून रात्री अभ्यास करतात...वेळेचे योग्य नियोजन केलं तर प्रत्येक गोष्टीसाठी माणसाला वेळ मिळते....

शिक्षण घेता घेता पैसे कमवण्याचे स्किल्स पण शिका...

2 ) समोरच्या व्यक्तीच म्हणणं ऐकायला शिका...
👉 मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला काही ही बोलण्याआधी समोरच्या व्यक्तीचं मत ऐकायला शिका...

कधी कधी आपण गाढवासारखं वागतो.... समोरच्या व्यक्तीची चूक आहे की नाही... हे न पाहता...

आपण समोरच्या व्यक्तीवर चिडतो त्याच्यावर रागावतो.....नंतर सत्य माहिती झाल्यावर आपल्यालाच आपल्या वागणुकीची लाज वाटायला लागते...🤦🏻‍♂️

त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.... बोलण्याआधी नेहमी ऐकायला शिका...

3) बोलण्याआधी आणि काही लिहिण्याआधी थोडा विचार करा...
👉 मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की लहान मुलं नेहमी काही ना काही चुका करत राहतात...

मुलं चुका करतात कारण चुका झाल्यानंतर होणाऱ्या परिणामाबद्दल त्यांना काहीच माहिती नसते....त्यामुळे ते चुका करतात... आणि आई बाबाचा हातचा मार खातात...😄

मित्रांनो, आता आपण लहान मुलं राहिलो नाही.... त्यामुळे कोणतीही चूक करण्याआधी थोडा विचार करा....

कोणाला काही बोलण्याआधी थोडा विचार करा आणि नंतर बोला...

आपण काय बोलतो यावर पण तुमचं कंट्रोल असायला हव.... जोशमध्ये येऊन काही ही बोलु नका.... नाही तर... समोर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो...

मित्रांनो, तुम्ही लेखक असाल तर लेख लिहिताना नेहमी थोडी काळजी घ्या... लेखाच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीच्या मनाला ठेच लागणार नाही... याची काळजी घ्या...

4) स्वतःवर विश्वास ठेवा....
👉 मित्रांनो, तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवावर नेहमी विश्वास ठेवा.... देवाला प्रार्थना करत असताना तुम्ही जी प्रार्थना करता त्या प्रार्थनावर आणि स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा.....

जो पर्यंत तुम्ही तुमच्या प्रार्थनावर विश्वास ठेवणार नाही तो पर्यंत तुमची कोणतीच प्रार्थना देवापर्यंत पोहचणार नाही....

देवाच्या मंदिरात गेल्यावर स्वतःसाठी जेवढं मागाल त्यापेक्षा जास्त इतरांसाठी मागा....देव तुम्हाला सर्व काही देईल...👍🏻

5) हार मानण्यापेक्षा थोडा अधिक प्रयत्न करा...
👉 मित्रांनो, विचार करा, तुमच्या जीवनात अपयश आलंच नाही तर काय होईल...??

तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकणार नाही...

अपयशाची चव तुम्हाला कधीच समजणार नाही....

मित्रांनो, जगात जेवढे पण यशस्वी लोक होऊन गेले आणि जे लोक आज यशस्वी आहेत... त्यांची तुम्ही बायोग्राफी वाचली तर तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट कळेल की, *प्रत्येक व्यक्ती यशस्वी होण्याआधी हजारो वेळा तो अपयशी झालेला असतो...*

त्यामुळे तुम्हाला कधी अपयश आलं असेल तर टेन्शन घेऊ नका तुम्ही काही जगा वेगळे नाही आहात...

तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने मेहनत करत असाल आणि अपयश आलं असेल तर जास्त दुःखी होऊ नका....कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते....

आपण लहान असताना दोन पायावर चालण्यासाठी आपण खूप वेळा खाली पडलो आहे....नंतरच आपण दोन पायावर चालायला शिकलो आहे...

त्यामुळे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा....

अपयश आलं म्हणून आत्महत्या करू नका....पुन्हा एकदा प्रयत्न करा... प्रयत्न करायच सोडुन देऊ नका....🙏🏻

6) नेहमी Gratitude रहा...
👉 मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का...??

जगात असे खूप लोक आहेत ज्यांना दोन टाईमच जेवण सुद्धा मिळत नाही.....

आपल्याला दोन टाईमचं जेवण मिळते, राहायला घर आहे, आई बाबा आहेत...सर्व गोष्टी आहेत...

हा लेख वाचायला तुमच्याकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे... सर्व गोष्टी तुमच्याजवळ आहेत... या सर्व गोष्टीबद्दल नेहमी Gratitude रहा....देवाचे आभार माना.... ❤

मित्रांनो, जेंव्हा तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या गोष्टीबद्दल Gratitude राहता.... आनंदी राहता... तेंव्हा तुमच्याकडे अजून चांगल्या गोष्टी आकर्षित होतं असतात...

7 ) मरण्याआधी चांगल जीवन जगा...
👉 मित्रांनो, आजकल कधी काय होईल याचं काहीच सांगता येत नाही....लोक ऍक्सिडेंट, फाशी, घेऊन स्वतःचे आयुष्य संपवत आहे...

मित्रांनो, तुमच्या जीवनात किती ही प्रॉब्लेम असुद्या... तुम्ही तुमच्या जीवनाला कधीही आणि केंव्हा ही सुंदर आकारमान देऊ शकता....स्वतःला व्यवस्थित करून तुम्ही तुमच्या जीवनाला पाहिजे तसे चेंज करू शकता....

निसर्गचा खूप साधा आणि सोपा नियम आहे....

निसर्ग तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी द्यायला तयार आहे, त्याबदल्यात तुम्हाला पण निसर्गाला काही तरी द्यावं लागतं....

तुम्ही सकाळी 8 वाजेपर्यंत झोप घेऊन स्वतःला कधीच बदलू शकणार नाही....

तुम्हाला बदलायचे असेल तर तुम्हाला काही गोष्टीचा त्याग करावा लागेलच....

I known सकाळी 8 वाजेपर्यंत झोप घेण्याची मज्जा खूप येते परंतु हिच मज्जा समोर जाऊन तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पण घेऊन जाऊ शकते....🤷‍♂️

मित्रांनो, आपल शरीर हे निसर्गाने आपल्याला काही वेळासाठी दिलेले एक गिफ्ट आहे....हे लक्षात ठेवा...

तुम्ही जर तुमचे शरीर व्यवस्थित ठेवले नाही तर निसर्ग तुमचं शरीर परत घेऊ शकतो.... 😄

जीवनात प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्यासाठी शरीर तंदरुस्त असणे खूप गरजेचं असते...तुमच्याकडे भरपूर पैसा असेल आणि शरीरमध्ये काही बिघाड असेल तर तुम्ही जीवनाचा आनंद घेऊच शकणार नाही... त्यामुळे रोज सकाळी व्यायाम करण्यासाठी वेळ काढा...

शरीर तुमचं आहे, त्यामुळे शरीराला तंदरुस्त ठेवण्याची जबाबदारी पूर्णपणे तुमची आहे...

शरीराची काळजी घ्या... शरीराला सकरात्मक विचाराने आतुन धुवून टाका....तुमचे जीवन ऑटोमॅटिक सुंदर व्हायला सुरुवात होईल...💫

मित्रांनो, आजचा लेख दोन तीन वेळा वाचा आणि लेखात सांगितलेल्या सर्व सवयी स्वतःच्या जीवनात लागू करा...तुम्हाला छान Result पाहायला मिळेल....

मित्रांनो, आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की फीडबॅक द्या... ❤

धन्यवाद... 🙏🏻🌹😇

✍️✍️ नरेंद्र दिपके 
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट