Mercedes कंपनीची प्रेरणादायी कहाणी

मित्रांनो, दोन मित्र असतात... दोघेही अविष्कारक असतात... नवनवीन गोष्टीचा शोध लावण्यामध्ये ते आपला वेळ घालवत असे...


एके दिवसी एक मित्र घोडागाडी पाहतो आणि त्याच्या डोकयात कल्पना येते कि आपण बिन घोड्याची गाडी बनवु... अशी गाडी बनवु ज्याला घोडा बांधायचे कामच पडणार नाही... ही गाडी लोकांना पण खूप आवडेल...🥰

काही महिन्यात तो मित्र नवीन चारचाकी गाडी बनवतो आणि त्याच्या मित्राला सहज विचारतो...

👉 मी अशी गाडी तयार केली आहे, ज्याला घोड्याची काहीच आवश्यकता नसेल...लोकं ती चारचाकी गाडी स्वतःहून चालवतील...कुठेही नेतील...

तुला काय वाटतं मित्रा, माझी बिन घोड्याची चारचाकी गाडी लोकांना आवडेल का...??🙄

तेंव्हा त्याचा मित्र म्हणतो...
👉 लोकांना घोडागाडी मध्ये फिरण्याची सवय आहे... तुझी ही गाडी लोकांना आवडणार नाही...लोकं घोडा कुठे बांधतील...


त्या मित्रांचे हे वाक्य ऐकुन त्याचा मित्र खूप दुःखी होतो आणि त्याने बनवलेली गाडी एका गॅरेजमध्ये बंद करून ठेवतो...त्याला वाटतं खरंच लोकांना माझी ही कल्पना आवडणार नाही...

👉 खूप वर्षे ती गाडी गॅरेजमध्ये पडुन असते, एके दिवसी त्या माणसाच्या बायकोला... माहेरी जायचं असते... तेंव्हा माहेरी जाताना ती त्याच बिन घोड्याचा गाडीमध्ये बसून जाते....

जसी ती गाडी शहरात जाते, त्या गाडीला पाहायला शहरातील सर्व लोकांची गर्दी होते...

सर्व लोकांना ती गाडी हवी होती...सर्व लोकं मार्केटला विचारपुस करत परंतु तेंव्हा ते एकच मॉडेल बनवले होते...

👉 लोकांची डिमांड पाहता त्या मित्राने नवीन चारचाकी गाडी बनवायला सुरुवात केली आणि ती गाडी आजच्या तारखेला जगातील सर्वात महाग गाडी आहे...त्या गाडीचे नाव आहे...mercedes




कार्ल बेंज यांनी आपल्या मुलीचे नाव त्या गाडीला दिले आणि नाव ट्रेडमार्क केले...

👉 मित्रांनो, एक विचार करा... कार्ल बेंज यांनी जर नवीन गाडीबद्दल त्याच्या मित्राला विचारलं नसतं तर दोन तीन वर्षाआधीच ते करोडपती झाले असते...बरोबर ना

परंतु त्यांनी त्यांच्या मित्राला गाडी बद्दल विचारले आणि त्या मित्राने
कार्ल बेंजला निगेटिव्ह फीडबॅक दिला... निगेटिव्ह फीडबॅक मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खचून गेला आणि स्वतः बनवलेली गाडी त्यांनी गॅरेजमध्ये लपवून ठेवली.....

मित्रांनो, या सुंदर आणि सत्य कहाणी वरून आपल्याला खूप मोठी गोष्ट शिकायला मिळते....

स्वतःवर एवढा विश्वास ठेवा कि बाकी लोकं तुमच्या बद्दल काय बोलतात याने तुमचा आत्मविश्वास कमी होता कामा नये...

जगातील प्रत्येक व्यक्ती हा पॉजिटीव्ह अटीट्युडवाला नसतो... खूप कमी लोकं असतात जे तुमच्या कामाला पॉजिटीव्ह फीडबॅक देत असतात... बाकी लोकं तर तुम्हाला कसे मागे आणता येईल याचाच विचार करत असतात...

जेंव्हा पण तुम्ही नवीन काम कराल तेंव्हा, एक गोष्ट लक्षात ठेवा, विरोध हा सर्वात आधी मिळणारा पुरस्कार असतो...

लोकं आधी विरोध करतात नंतर स्वीकार करतात....

👉 भारतातच नाही तर प्रत्येक देशात स्पर्धा खूप आहे. तुमच्या डोक्यात जर नवीन बिजनेसची आयडिया असेल किंवा नवीन कल्पना असेल तर त्या कल्पनेवर काम करायला सुरुवात करा...

लोकांचे सल्ले घेणे, जास्त विचार करने, किंवा चार लोकं काय म्हणतील याचा विचार करत बसू नका...

सल्ले पण अशाच माणसाकडून घ्या, जो दोन्ही साईडने विचार करून तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल... 👍🏻

मित्रांनो, आजची प्रेरणादायी कहाणी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच फीडबॅक द्या...

धन्यवाद... 🙏🏻🌹😇

✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट