यश मिळवण्याचा सुंदर मार्ग कोणता...?

                                    ** यश मिळवण्याचा सुंदर मार्ग **
मित्रानो,
           यश हा एक असा शब्द आहे त्याला  मनामध्ये  Positive Energy निर्माण होते. या जगातील कोणता ही व्यक्ती हा शब्द  जेंव्हा एकतो किंवा वाचतो तेंव्हा त्यांच्या मनामध्ये एक नविन इच्छा निर्माण होते. ती  इच्छा म्हणजे यश मिळवण्याची व यश प्राप्त करण्याची. या जगातला प्रत्येक व्यक्ती त्याचा आयुष्यामध्ये कधी न कधी यश कशे भेटेल किंवा यश कसे प्राप्त होईल असा विचार नक्की करत असतो, परंतु विचार करत असताना या जगातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होतो की,
 ** जीवनामध्ये आपल्याला यश कसे भेटेल / कशे प्राप्त होईल .?
या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी काही व्यक्ती प्रेरणादायक पुस्तके वाचतात, तर कोणी प्रेरणादायक ब्लॉग      किंवा website वर सर्च करतात, तर कोणी Motivational Seminar joint करतात. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असतात. Books , Blogs आणि   Seminar हे  काही ठिकाण आहे. येथे या प्रश्नाचे उत्तर जर शोधले तर येथे उत्तर मिळुन जाईल, परंतु या   प्रश्नांचे  उत्तर जाणुन घेण्यासाठी सर्वात सोपा  आणि सरळ मार्ग म्हणजे Motivational Blog  वाचने.
मित्रानो,
           या सर्व गोष्टी ध्यानात ठेवुन आज मी तुम्हा सर्वाना यश मिळवण्याचा सुंदर मार्ग सांगणार आणि हा मार्ग  यशस्वी झालेले व्यक्ती हा मार्ग जास्तीत जास्त उपयोग करतात.
कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये यश कसे भेटेल अशा प्रश्न येतो, तेंव्हा या प्रश्नाचे उत्तर जाणुन घेण्यासाठी त्यांचा जवळ दोन मार्ग असतात
* पहिला मार्ग :- जी व्यक्ती यशस्वी झालेली आहे त्यांना Follow करने  व  त्यानी जो मार्गाचा उपयोग केला त्या        मार्गाचा उपयोग आपण करने  
* दुसरा मार्ग :-  दुसरा मार्ग म्हणजे जी व्यक्ती अयशस्वी झालेली आहे. आशा व्यक्तीकडून शिकणे व त्या व्यक्तीने कोणते मार्ग निवडले म्हणुन त्याला अपयश आले. व त्यानी केलेल्या चुकांकडुन नविन काहीतरी शिकणे.
या जगातील प्रत्येक व्यक्ती यश मिळवण्यासाठी पहिला मार्ग निवडतात आणि पहिल्या मार्गाचा उपयोग करतात परंतु माझ्या विचाराने तुम्ही जर दुसऱ्या मार्गाचा उपयोग केला तर तुम्हाला यश लवकर आणि नक्की भेटेल

मित्रानो,
     आपले जीवन खुप मोठे नाही, की आपन अगोदर चुका करू आणि नंतर या चुकांकडुन शिकु व स्वताला सुधारण्याचा प्रयत्न करू आपन आपल्या चुकांकडून खुप कमी शिकत असतो परंतु दुसऱ्याचा चुकांमधून आपन खुप काही शिकु शकतो.जीवनामध्ये मोठे यश प्राप्त करायचे असेल किंवा जीवनामध्ये प्रत्येक कामात यश प्राप्त करायचे असेल तर  दुसऱ्याचा चुकांकडुन  शिका.    अयशस्वी झालेल्या व्यक्तीने जो मार्ग निवडला होता यश प्राप्त करण्यासाठी त्या मार्गावर तुम्ही कधी जावु नका  नंतर तुमच्याजवळ जो मार्ग राहिल जो तुम्हाला  यशाकडे घेऊन जाईल-

मित्रानो, शेवटी मी तुम्हाला एवढेच सांगेन की, दुसऱ्यांचा चुकांकडून शिका.


                                                                                                                                 लेख 
                                                                                                                             नरेंद्र दिपके 
                                                                                                                  (Motivational  Speaker )
    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट