यक्तिमत्व विकास कसा करायचा?

 यक्तिमत्व विकास कसा करायचा? तुमच्या फायद्याच्या टिप्स


1. एखादी व्यक्ती आपला फोन उचलत नसेल तर त्या व्यक्तीला दोन वेळेच्यावरती परत फोन करू नका, कदाचित त्या व्यक्तीला त्यावेळेस तुमच्या फोनपेक्षा महत्त्वाचे काम असेल.


2. तुम्ही एखाद्याकडून उधार घेतलेले पैसे त्याने परत मागण्या अगोदर परत करा, तीच गोष्ट छत्री आणि पेनबाबत.


3. एखादा तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला नेतो तेव्हा मेन्यूतील महागडा पदार्थ ऑर्डर करू नका, शक्य असल्यास देणाऱ्यालाच ऑर्डर करायला सांगा.


4. तुझ अजून लग्न झालं नाही? तू अजून घर बांधलं नाहीस? असे समोरच्याला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारू नका कारण ती तुमची अडचण नाही.


5. नेहमी आपल्या पाठून येणाऱ्या व्यक्तीसाठी दरवाजा उघडा, मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरूष; कारण कुणाला चांगली वागणूक दिल्याने तुम्हाला कमीपणा येत नाही.


7. तुम्ही मित्राबरोबर टॅक्सी शेअर केलीत आणि त्याच भाडे त्याने दिले, तर पुढच्या वेळेस तुम्ही भाडे द्या.


7. सगळ्या राजकीय मतांचा आदर करा.


8. कधीच कोणाच संभाषण मध्येच खंडीत करू नका.


9. जर तुम्ही कोणाची मस्करी करत असाल आणि त्या व्यक्तीला त्याचा त्रास होत असल्यास ती मस्करी ताबडतोब थांबवा.


10. जो मदत करतो त्याला धन्यवाद द्या.


11. एखाद्याची स्तुती सगळ्यांसमोर करा पण त्याचे दोष त्यालाच सांगा.


आजपासूनच दिलेल्या सर्व टिप्स आपल्या जीवनात लागु करा... धन्यवाद 🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट