मोबाईल आणि यश...
मोबाईल आणि यश
👉 तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर वेळेचे सुत्र लक्ष्यात घ्या कारण यश आणि वेळ याचं खुप जवळच नातं आहे...
जगात असा कोणताच श्रीमंत व्यक्ती नाही जो गेलेला वेळ परत आणू शकेल, आणि जगात असा कोणताच गरीब व्यक्ती नाही ज्याला वेळ मिळत नाही...
मित्रांनो, तुम्ही श्रीमंत असाल किंवा गरीब तुम्हाला दिवसाचे 24 तासच मिळतात, ना कुणाला जास्त ना कुणाला कमी सर्वांना वेळ सारखाच मिळतो...
आता प्रश्न असा येतो की, जर सर्वांना सारखाच वेळ मिळतो तर सर्वजन यशस्वी का होत नाही ...
👉 याचं उत्तर खुप सोफे आहे, जगात जेवढे महान लोक होऊन गेले आणि जे महान लोक सध्या आहेत, त्यांच्यात आणि आपल्यात फक्त एक गोष्टीचा फरक आहे तो म्हणजेच- *Time Management* चा
👉 यशस्वी लोक 24 तासाचे नियोजन करतात, कोणत्या गोष्टीमध्ये Time Invest करायचा, कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यायचा किंवा कोणती गोष्ट कशी करायची याचे प्रिंसिपल त्यांना माहिती आहेत...
👉 जगातील सर्वात गरीब व्यक्ती असेल किंवा श्रीमंत, तुम्ही विद्यार्थी असाल किंवा बिजनेस मॅन, तुम्ही सध्या जे कोणी असाल त्यांना एक गोष्ट सांगु इच्छितो, देवाने तुमच्या मध्ये एक अशी शक्ती दिलेली आहे, अशी कला तुमच्या अंगात आहे, ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमचे स्वप्न तुमचे जीवन बदलु शकता...
मी Time management कोर्स शिकवतो, त्या मध्ये प्रत्येक विद्यार्थांचा एक प्रश्न असतो तो म्हणजे - आम्ही सर्व plan तयार करतो आमच्या goal नुसार परंतु मोबाईलचे व्यसन मुळे आम्ही ते task goal पुर्ण नाही करू शकत...
खरं तर आजची तरुण मंडळी मोबाईल मध्ये एवढी गुंतलेली आहे, की त्यांना हे माहिती नाही की सध्या सकाळ सुरु आहे की रात्र
👉 मित्रांनो बदल हा निसर्गाचा नियम आहे, परंतु असा पण एक नियम आहे की कोणत्याही गोष्टीचा अति वापर केला तर ती गोष्ट आपल्यासाठी विष बनते....
तुम्हाला जर सिगरेटच व्यसन असेल तर तुमचे फक्त फुफुस खराब होईल परंतु मोबाईल चे व्यसन असेल तर तुमचे पुर्ण जीवन बरबाद होईल त्यामुळे आता वेळ आली आपल्या सवयी बदलण्याची आणि यश प्राप्त करण्याची...
आता इथे एक प्रश्न सर्वांना पडला असेल, मोबाईलची सवय कशी मोडायची
👉 जगातील कोणतीच सवय आपण मोडु शकत नाही परंतु ती सवय आपण बदलु शकतो,
त्या अगोदर एक काम करायच
तुमचे goal काय आहे ते अगोदर ठरवा,
कारण नेमक तुम्हाला कुठे जायचं हे तुम्हाला स्पष्ट माहिती पाहिजे
मोबाईलचा उपयोग करून यश प्राप्त करता येते... कसे ते पाहुयात
👉 आजकाल मुलांना time pass करण्यासाठी खुप app आहेत.
Facebook, Whatsapp, Instagram, स्नॅपचॅट, Youtube, वेगवेगळे game असेल,
या सर्व app मध्ये मुलं त्याचा time waste करतात....
👉 सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून या सर्व App डिलीट कराव्या लागतील किंवा तुम्हाला तुमचा time manage करायला शिकल पाहिजे...
मोबाईल मधून फालतू App डिलीट केल्यानंतर त्या जागी अशा App डाउनलोड करा ज्या तुम्हाला तुमच्या टार्गेट कडे नेईल..
मोबाईल मध्ये तुम्ही E-book डाउनलोड करू शकता, जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा तुम्ही पुस्तके वाचु शकता...
मोटिवेशनल App डाउनलोड करा त्याचा उपयोग तेंव्हा करा जेंव्हा तुम्हाला रिकामा वेळ मिळेल...
Youtube ला मोटिवेशनल व्हिडिओ पहा...
मोबाईलचा उपयोग करून वेगवेगळे स्किल्स डेव्हलोप करा...
थोडक्यात मोबाईलचा उपयोग चांगल्या कामासाठी करा आणि वेळेचा चांगला उपयोग करा तुम्हाला यश नक्की मिळेल...
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि जगातील सर्व महान व्यक्ती चा विचार करा त्याना पण तुमच्या सारखेच दिवसाचे 24 तास मिळायचे आता वेळ तुमची आहे
_आता तुम्ही ठरवा वेळेचा उपयोग करून यश प्राप्त करायच की मोबाईल वर time pass करून स्वतःची life खराब करायची_
तुमचा वेळ चांगल्या कामात invest करा, आणि त्याचे प्रॉफिट life time मिळवा...
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback