जीवनाचा नियम Welcome आणि Goodbye.

 जीवनाचा नियम Welcome आणि Goodbye.


मित्रांनो, जीवनाचा एक अटळ नियम आहे, तो म्हणजे परिवर्तन...

या जगात कोणतीही गोष्ट  कायमची नसते. ऋतू बदलतात, वेळ बदलते, परिस्थिती बदलते आणि माणसेही बदलतात... 

आपल्या आयुष्यात काही लोक अचानक येतात, काही वर्षानुवर्षे सोबत राहतात, तर काही कोणतेही कारण न सांगता आपल्या आयुष्यातुन निघून जातात...

👉🏻 अनेकदा आपण निघून गेलेल्या लोकांमध्ये इतके अडकून पडतो की, आपल्या आयुष्यात येणाऱ्या नवीन आणि चांगल्या लोकांकडे पाहायलाच विसरतो. पण जीवन आपल्याला एक सुंदर धडा शिकवते, जे येतात त्यांचे मनापासून स्वागत करा आणि जे जातात त्यांना हसत-हसत निरोप द्या...🦋

👉🏻 कोणीतरी आपल्याला सोडून गेले म्हणून आपले जीवन संपत नाही.

उलट, प्रत्येक निरोपानंतर जीवन आपल्यासाठी नवीन संधी, नवीन नाती आणि नवीन अनुभव घेऊन येत असते...

काही लोक आपल्या आयुष्यात आनंद देण्यासाठी येतात. काही लोक आपल्याला अनुभव देतात. काही लोक प्रेम शिकवतात, तर काही लोक विश्वासघात करून सावध राहायला शिकवतात...

प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जाते. त्यामुळे कोणीही विनाकारण आपल्या आयुष्यात येत नाही...

👉🏻 माणसे बदलली म्हणून त्यांच्यावर राग धरत बसण्यात काही अर्थ नसतो. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवास वेगळा असतो. 

काही लोकांचा आपल्यासोबतचा प्रवास एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच असतो. त्यानंतर त्यांचे आणि आपले रस्ते वेगळे होतात. हे तुम्हाला स्वीकारावेच लागेल...

👉🏻 काही लोक निघून गेल्यानंतर आपण स्वतःलाच दोष देतो. माझ्याकडून काय चूक झाली..?? हा प्रश्न सतत मनात फिरत राहतो. पण प्रत्येक वेळी चूक आपलीच असते असे नाही. 

कधी वेळ बदलते, कधी प्राधान्यक्रम बदलतात, तर कधी नाती बदलतात. प्रत्येक गोष्टीचे उत्तर शोधत बसण्यापेक्षा वास्तव स्वीकारणे जास्त महत्त्वाचे असते...

👉🏻 जे नवीन लोक आपल्या आयुष्यात येतात त्यांच्याकडे सकारात्मक नजरेने पाहा. कदाचित ते तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन आलेले असतील. कदाचित ते तुमच्या यशाचा भाग बनतील. कदाचित ते तुमच्यातील सुप्त क्षमता जागवतील. म्हणून नवीन लोकांना संधी द्या, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि नवीन नात्यांना फुलू द्या...


भूतकाळातील आठवणी जपायला हरकत नाही, पण त्यात अडकून राहणे योग्य नाही. 

कारण गाडी चालवताना चालक समोरच्या रस्त्याकडे जास्त पाहतो, आरशात कमी. जर तो सतत मागेच पाहत राहिला तर अपघात होण्याची शक्यता वाढते. जीवनातही हेच लागू होते...

👉🏻 आपल्याला सोडून गेलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मनात कटुता ठेवण्याची गरज नाही. त्यांनी दिलेल्या चांगल्या आठवणी मनात ठेवा आणि मनापासून त्यांना शुभेच्छा द्या. कारण मनात राग ठेवला तर त्याचा त्रास सर्वात जास्त स्वतःलाच होत असतो...

👉🏻 परिवर्तन म्हणजे शेवट नाही, तर नवीन सुरुवात असते. नवीन माणसे, नवीन संधी, नवीन स्वप्ने आणि नवीन ध्येय तुमची वाट पाहत असतात. त्यासाठी मन मोकळे ठेवावे लागते.

लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती कायमची सोबत राहण्यासाठी येत नाही. काही जण फक्त एक अध्याय असतात, संपूर्ण पुस्तक नाहीत. 

पुस्तकातील एखादे पान संपले म्हणून पुस्तक संपत नाही. पुढील पानांमध्ये अजून सुंदर कथा लिहिलेली असते...💞

आयुष्यातील प्रत्येक निरोप तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतो. प्रत्येक नवीन भेट तुम्हाला नवीन आशा देत असते. म्हणून बदलाला घाबरू नका. बदल हा जीवनाचा श्वास आहे.

👉🏻 आज जर कोणी तुमच्यापासून दूर गेले असेल, तर त्यांच्यासाठी दार उघडे ठेवून आयुष्य थांबवू नका. त्याऐवजी नवीन संधींसाठी, नवीन लोकांसाठी आणि नवीन आनंदासाठी मनाची दारे उघडा.

👉🏻 एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्य कोणासाठीही थांबत नाही. काळ पुढे जातो, जीवन पुढे सरकते आणि आपणही पुढे चालत राहिले पाहिजे. भूतकाळाला धन्यवाद द्या, वर्तमानाचा आनंद घ्या आणि भविष्याचे स्वागत करा...💫

आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की फीडबॅक द्या...

धन्यवाद... 🙏🏻🌹😇

✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके 

( Coach of Personality Development )

☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे.??

छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या