स्वतःला अपडेट करा...
मित्रांनो, काल एका व्यक्तीने मला एक प्रश्न विचारला होता...
प्रश्न असा होता कि,
1) सर, मी मेहनत करतो, अभ्यास करतो, तरी सुद्धा मी मागेच राहतो... माझ्या सोबतचे बाकी मित्र माझ्यासमोर निघुन जातात... मी मात्र जागच्या जागीच राहतो...
मित्रांनो, वरील प्रश्न तुम्हाला सुद्धा कधी ना कधी पडला असेलच...
वरील प्रश्नाचे उत्तर देण्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचे उत्तर द्या...
समजा, तुम्हाला एक नवीन Bike विकत घ्यायची आहे... तुमच्या समोर दोन बाईक आहेत.
👉 A बाईकचा मायलेज एका लिटरला 30 किलोमीटर आहे
तर
👉 B बाईकचा मायलेज एका लिटरला 80 किलोमीटर आहे
माझा प्रश्न असा आहे कि, तुम्ही कोणती बाईक घ्याल..?
प्रत्येक व्यक्तीचे उत्तर नक्कीच B असेल... बरोबर ना
मित्रांनो, आजच्या जगात ज्या व्यक्तीकडे Skills आहेत त्याच लोकांना इतर लोकांपेक्षा खूप लवकर जॉब मिळतो...
मित्रांनो, आपण इतरांपेक्षा कमी असु तर आपल्याला पाहिजे तसा परिणाम मिळणार नाही... त्यासाठी स्वतःला अपडेट करत राहणे आणि शिकत राहणे खूप गरजेचे आहे...
👉 सांगण्याचं तात्पर्य एवढेच आहे. तुम्ही जसे आहात त्यामध्ये थोडा बद्दल करा... जग बदलत आहे.. तुम्ही सुद्धा स्वतःमध्ये थोडा बदल करा...
👉 मित्रांनो, 10 व्यक्ती एका कंपनीमध्ये इंटरव्हिव्हला जातात...
9 व्यक्तींजवळ कॉलेज डिग्री असतात प्रत्येकाला 80% + टक्केवारी असतात...
तरी सुद्धा त्या कंपनीमध्ये फक्त आणि एकच व्यक्ती सिलेक्ट होतो... काय कारण असेल बर... थोडा विचार करा..
👉 त्यामागे कारण असे होते कि तो एक व्यक्ती 50 लोकांसमोर प्रभावी संवाद करून स्वतःचे विचार मांडू शकत होता... लोकांना मार्गदर्शन करू शकत होता... वेगवेगळ्या Skills त्या व्यक्तीमध्ये होत्या.
बाकी 9 व्यक्तीजवळ एक सारखे ज्ञान होते परंतु Skills कोणत्याच नव्हत्या..
ज्या लोकांकडे Skills आहे.. त्याच लोकांना आजच्या जगात खूप डिमांड आहे... हे लक्षात घ्या...
एक उदाहरणं सांगतो, म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल.
👉 आपल्या भारतात दिवाळीपासुन 5 G नेटवर्क येणार आहे...
तुम्ही जर 5G च्या काळात 2 G सिमकार्ड विकत असाल तर किती लोक तुमचे सिमकार्ड विकत घेतील.
मित्रांनो, तुम्ही जर स्वतःला अपडेट केले नाही. नवीन Skills शिकलेच नाही. तर समोर तुम्हाला सुद्धा कोणीच ओळखणार... स्वतःला अपडेट् करणे खूप गरजेचे आहे...
स्वतःला बदलण्यासाठी तुम्हाला काही टिप्स देतो... टिप्स वाचा आणि स्वतःच्या जीवनात लागु करा
1) नवीन Skills शिका..
👉 मित्रांनो, प्रत्येक रविवारला थोडा वेळ काढुन नवीन गोष्टी शिका... प्रत्येक गोष्ट फुकट मिळेल ही आशा सोडुन द्या... थोडे पैसे खर्च करा आणि नवीन गोष्टी शिकण्याची सवय स्वतःला लावा... वेगवेगळे नवीन पुस्तके वाचा...
2) जग कसे बदलत आहे ते पाहा...
👉 20 वर्षा आधी कॉइन बॉक्स टेलिफोन खूप चालत होते. प्रत्येक व्यक्ती त्या टेलिफोनवरून आपल्या नातेवाईकांना बोलत होता... मजेशीर गोष्ट म्हणजे एका रुपयांमध्ये 60 सेकंद मिळत होते बोलायला...
कॉइन बॉक्स टेलिफोनचा एक दौर होता... आता मात्र प्रत्येक व्यक्तीजवळ स्वतःचा अँड्रॉइड मोबाईल आला... त्यामुळे कॉइन बॉक्स ऑटोमॅटिक बंद पडले...
एक विचार करा
2022 मध्ये जर एखाद्या व्यक्तीने कॉइन बॉक्स टेलिफोनचे दोन दुकान टाकले तर त्याचे दुकान मस्त चालेल कि बंद पडेल... 😄
थोडक्यात सांगायचं म्हणजे रोज जागरूक रहा... मोबाईल इंटरनेटच्या बाहेर सुद्धा एक जग आहे हे लक्षात ठेवा. बातम्या पाहा...
बातम्या पाहण्यासाठी खूप news चॅनेल आहेत परंतु तुम्ही सह्याद्री/ दूरदर्शन वाहिनीवर रोज रात्री 7 वाजता बातम्या लागतात. त्याच बातम्या पाहा...
3) सकाळी लवकर उठा..
👉 तुम्हाला तुमचे जीवन खरोखर बदलायचे असेल तर रोज सकाळी किमान 5 वाजता उठण्याची सवय लावा... सकाळी लवकर उठण्याचा फायदा असा आहे कि तुम्हाला एक तास शिल्लक मिळतो... त्या एका तासात तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करू शकता... सकाळी उठुन मेडिटेशन करणे.. व्यायाम करणे... पुस्तके वाचणे... ह्या तीन सवयी जगातील प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे तरी सुद्धा जगातील 3% लोक ह्या सवयीचे नियमित पालन करतात...
तुम्हाला तुमचे जीवन बदलाचे असेल तर वरील सर्व टिप्स लक्षात ठेवा आणि स्वतःला बदलण्यासाठी थोडी मेहनत घ्या...
मित्रांनो, आज गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे... गणेश चतुर्थीनिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा... 🌹🌹🌹
👉 खूप लोकांना Personality Development चा कोर्स माझ्याकडून शिकायचा होता. परंतु माझ्या कोर्सची फी इतरांपेक्षा थोडी जास्त असते... त्यामागे कारण सुद्धा खूप आहेत...
मित्रांनो, जो व्यक्ती Live Course शिकु शकत नाही त्यांच्या करिता मी व्हाट्सअप कोर्स तयार केला आहे...
Basic Personality Development Course + Time Management Course
दोन्ही कोर्सची Fee 700 रुपये आहे... परंतु
👉 श्री गणेश उत्सव निमित्त पहिल्या 20 व्यक्तीना कोर्सची फी फक्त 300 रुपये राहील...
नवीन Batch 1 सप्टेंबर 2022 पासुन सुरु होत आहे... आणि दुसरी Batch 3 सप्टेंबर 2022 पासुन सुरु होणार आहे
पूर्ण कोर्स 20 ते 25 दिवस चालेल
ज्या व्यक्तीला कोर्समध्ये सहभाग घ्यायचा त्यांनीच मला व्हाट्सअप msg करावा...
WhatsApp No. 9545441697
धन्यवाद... 🙏
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach Of Personality Development )
☎️☎️ 9545441697
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback