Self Attitude









Self Attitude असणं चांगली गोष्ट आहे. प्रत्येक मुक्या  प्राण्यांना सुद्धा स्वतःचा अटीट्युड असतो... 

👉 एखांद्या गार्डन मध्ये आपल्याला लहानसा ससा दिसला की लगेच आपण त्या ससाकडे पळत जातो... किती Cute आहे हा ससा असं म्हणतो. त्या ससा सोबत फोटो काढतो...त्या ससाला जवळ घेतो, त्याची पप्पी घेतो... बरोबर ना 


( ससा हा प्राणी खूप गरीब असतो आणि त्याला कसलाच अटीट्युड नसतो... )


विचार करा 

👉 एखाद्या गार्डन मध्ये आपल्याला साप दिसला तर आपण त्या सापाकडे  ससासारखे पळत पळत जातो का...? 


हा साप किती Cute आहे... 😄आपण त्या सापाची पप्पी घेतो का.?? 

त्या सापाला जवळ घेऊन त्याच्या सोबत सेल्फी काढु शकतो का. ?? 😄


अजिबात नाही 


तुम्ही जर सापाची पप्पी घ्याल गेले तर साप पण तुम्हाला Kiss करेल... 😁


👉 साप विषारी आहे की बिनविषारी तो नंतरचा विषय आहे... सापाचा अटीट्युड एवढा भारी असतो की त्याला पाहूनच आपण दुर पळुन जातो...😁 


( त्याचप्रमाणे वाघाला आणि सिंहाला पाहुन सुद्धा लोक घाबरून पळुन जातात... त्याच्या मागचे कारण असे आहे की हे दोन्ही प्राण्याचा अटीट्युड खूप डेंजर असतो... हे दोन्ही प्राणी कोणताही विचार न करता समोरच्या जनावरावर झडप घालतात आणि त्याची शिकार करतात... ) 


मित्रांनो, आपण माणुस आहोत... जसे प्रत्येक गोष्टीचे दोन प्रकार असतात तसेच अटीट्युडचे पण दोन प्रकार आहेत... 


पॉजिटीव्ह अटीट्युड आणि निगेटिव्ह अटीट्युड


👉 98% लोक दुसऱ्या लोकांना, आजूबाजूच्या लोकांना, मित्रमंडळाना अटीट्युड दाखवतात परंतु त्यांचा अटीट्युड हा निगेटिव्ह अटीट्युड असतो... 


आणि जो निगेटिव्ह अटीट्युड दाखवतो तो कधीच टिकत नाही... 😄


👉 ज्या प्रमाणे एका सापाला पाहुन लोक दुर पळतात त्याच प्रमाणे निगेटिव्ह अटीट्युड असणाऱ्या लोकांन पासुन लोक दुर राहतात. 


फालतु अटीट्युड दाखवणाऱ्या लोकांसोबत कोणीच मैत्री करत नाही... अटीट्युड दाखवणारा व्यक्ती एका सापासारखा नेहमी एकटाच राहतो. 😄


मित्रांनो, तुम्हाला नवीन मित्र बनवायचे असतील. तर आजपासून निगेटिव्ह अटीट्युड सोडुन द्या... मनमोकळे जगा.. स्वतःवर प्रेम करा, लोकांवर प्रेम, समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐका आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा... 


तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत मिळत असते. 


तुम्ही लोकांना प्रेम द्याल तर लोक सुद्धा तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील... ❤


मित्रांनो, जीवन खूप सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवा... 😊


✍️✍️ नरेंद्र दिपके

( Coach Of Personality Development )

☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट