आत्मविश्वास
आत्मविश्वास...
👉 मित्रांनो, आत्मविश्वास म्हणजे स्वतःचा स्वतःवर असणारा विश्वास म्हणजे आत्मविश्वास
जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो. त्याचे सर्वकाम पूर्ण होतात... कारण त्याचा स्वतःचा आत्मविश्वास पक्का असतो
मित्रांनो, माणसाचा आत्मविश्वास कमी असेल तर माणुस करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये भीती वाटायला लागते... माझ्याकडून काही चुकणार तर नाही ना या विचारात तो काम करत राहतो...
मित्रांनो, माणसामधला आत्मविश्वास हा मोबाईलच्या बॅटरीसारखा असतो. तो कमी जास्त होतच राहतो त्यामुळे त्याला नेहमी चार्जिंग करावी लागते.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि,
सर, स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे.??
या प्रश्नाचे उत्तर देण्या अगोदर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो...
1) समजा, मी तुम्हाला तुमचे नाव मुंबई शहरात विचारले तर तुम्ही तुमचे नाव सांगताना तुम्हाला भीती वाटेल का.?
अजिबात भीती वाटणार नाही. उलट तुम्ही तुमचे नाव पूर्ण आत्मविश्वासाने सांगाल.... बरोबर ना
2) समजा, मी तुम्हाला तुमचे नाव नागपूर शहरात विचारले तर तुम्हाला नाव सांगताना भीती वाटेल का.??
अजिबात भीती नाही वाटणार. उलट तुम्ही तुमचे नाव पूर्ण आत्मविश्वासाने सांगाल... बरोबर ना
3 ) समजा, एका मोठ्या इमारतीच्यावर आपण उभे आहोत... तेथे तुम्हाला तुमचे नाव विचारले तर तुम्हाला नाव सांगताना भीती / घाबरट वाटेल का.???
भीती वैगरे अजिबात वाटणार नाही... याचे कारण म्हणजे तुम्हाला तुमचे नाव 100% माहिती आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे नाव पूर्ण आत्मविश्वासाने नाव सांगु शकता...
परंतु
👉 आता तुम्हाला एका मोठ्या इमारतीवर नेले डोळ्याला पट्टी बांधून 2 मिनिट गोल गोल फिरवले आणि नंतर तुम्हाला विचारले कि, दक्षिण दिशा कोणीकडे आहे.. तुमचे उत्तर चुकलं तर तुम्हाला याच इमारतीवरून खाली फेकून देण्यात येईल...
आता, सांगा विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता...?
अजिबात देऊ शकणार नाही...
कारण...
👉 तुम्ही कोणत्या दिशेने उभे आहात हेच तुम्हाला निश्चित माहित नाही. त्यामुळे तुम्ही या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाही...
मित्रांनो, वरील उदाहरणं वरून तुम्हाला समजले असेल कि आत्मविश्वास कसा कमी होतो आणि कसा वाढतो...
आपल्याला एखाद्या गोष्टीचे ज्ञान नसले कि माणसाचा आत्मविश्वास कमी होतो. माणुस घाबरून जातो. ज्ञान असले कि माणसाचा आत्मविश्वास वाढतो...
मित्रांनो, एक गोष्ट स्पष्ट लक्षात ठेवा...
👉 तुम्ही जे कोणते काम करत आहात त्यामध्ये परफेक्ट व्हा... जेंव्हा आपण आपल्या कामामध्ये परफेक्ट नसतो तेंव्हा आपल्याला काम करताना भीती वाटते, एखाद्या व्यक्तीला बोलताना आणि बोलण्यामध्ये आत्मविश्वास नसतो... आत्मविश्वास नसल्यामुळे आपण नेहमी दुःखी राहतो...
स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सर्वात आधी आपण काय काम करत आहोत ते पाहा...
आपण करत असलेल्या कामामध्ये आपण किती परफेक्ट आहोत ते पाहा... ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला भीती वाटते त्यावर काम करा... रोज 1% स्वतः मध्ये सुधारणा करा. रोज 1% तुमच्या क्षेत्रातल्या कामाचे ज्ञान घेत जा..
जेंव्हा तुम्ही तुमच्या कामात एक्स्पर्ट होता तेंव्हा तुम्हाला कसलीच भीती वाटणार नाही... तुम्ही प्रत्येक ठिकाणी आत्मविश्वासाने जाऊ शकता...आत्मविश्वासाने मोबाईलवर बोलु शकता.
आत्मविश्वासाचा हा सोपा फंडा आहे...
शून्य ज्ञान = शून्य आत्मविश्वास.
कमी ज्ञान = कमी आत्मविश्वास.
जास्त ज्ञान = जास्त आत्मविश्वास.
मित्रांनो, जेंव्हा तुम्ही नवीन नवीन मोटरसायकल शिकत होते तेंव्हा तुम्हाला किती भीती वाटतं होती... चालत्या मोटारसायकलवरून आपण खाली तर पडणार नाही ना.?
आपल्या समोर अचानक एखादी गाडी तर येणार नाही ना... वैगरे वैगरे
परंतु
आता मोटरसायकल चालवताना आपल्याला अजिबात कसलीच भीती वाटत नाही...
याचे कारण म्हणजे स्वतःवरचा आत्मविश्वास...
मित्रांनो, आजचा लेख दोनदा वाचा आणि त्यानुसार कामाला लागा... लेख तुमच्या उपयोगी वाटतं नसेल तर लेखाकडे दुर्लक्ष करू शकता... OK
लेख आवडला असेल तर नक्की फीडबॅक द्या...
तसेच
ज्या व्यक्तीला Personality Development (Soft Skills ) चे क्लास जॉईन करायचे आहेत. ते जॉईन करू शकता... सध्या प्रत्येक कोर्स वर ऑफर सुरु आहे... कोर्स तुम्ही व्हाट्सअप किंवा Live सुद्धा शिकु शकता...
अधिक माहितीसाठी संपर्क करा अथवा व्हाट्सअप msg करू शकता...
WhatsApp No. 9545441697
धन्यवाद... 🙏
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach Of Personality Development )
☎️☎️ 9545441697
Thank You Sir This is Very Informative. Thanks
उत्तर द्याहटवा