आपल्या आयुष्याचा खरा रिमोट कंट्रोल
आपल्या आयुष्याचा खरा रिमोट कंट्रोल
मित्रांनो, जीवनात काय घडेल यावर आपले नियंत्रण नसते पण घटना घडणाऱ्यानंतर आपण काय विचार करतो आणि कशी प्रतिक्रिया देतो यावर मात्र 100% आपलेच नियंत्रण असते...
आजच्या काळात प्रत्येक तरुणाच्या आयुष्यात अनेक आव्हाने आहेत.
शिक्षण, करिअर, स्पर्धा परीक्षा, नोकरी, व्यवसाय, आर्थिक अडचणी, नातेसंबंध, सोशल मीडिया आणि भविष्याची चिंता...
या सर्व गोष्टींमुळे मनावर सतत ताण येत असतो. अनेक वेळा आपण म्हणतो,
📌 आज खूप वाईट वाटत आहे..
📌 मला खूप राग आला आहे
📌 मला भीती वाटते
📌 मी निराश झालो आहे.
पण आपण कधी विचार केला आहे का की आपल्याला नेमके काय होतय....??
याच ठिकाणी इमोशन (Emotion) आणि फीलिंग (Feeling) यांचा फरक समजून घेणे आवश्यक आहे...
अनेक लोक या दोन्ही शब्दांचा एकच अर्थ काढतात. परंतु मानसशास्त्राच्या दृष्टीने या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
हा फरक समजला तर आपण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो, चुकीचे निर्णय टाळू शकतो आणि जीवनात अधिक शांत व यशस्वी होऊ शकतो...
📌इमोशन म्हणजे काय..??
👉🏻 इमोशन म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर आपल्या शरीरात आणि मेंदूमध्ये निर्माण होणारी तात्काळ प्रतिक्रिया.
ही प्रतिक्रिया नैसर्गिक असते. त्यासाठी विचार करण्याची गरज नसते...
आनंद, राग, भीती, दुःख, आश्चर्य अशा भावना काही क्षणात निर्माण होतात. त्या काही सेकंद किंवा काही मिनिटे टिकतात.
याचा अर्थ, इमोशन येणे चुकीचे नाही. प्रत्येक माणसाला इमोशन्स येतात. कोणालाही राग येऊ शकतो, दुःख होऊ शकते किंवा भीती वाटू शकते. कारण इमोशन्स हा आपल्या मानवी स्वभावाचा भाग आहे.
📌 फीलिंग म्हणजे काय..??
👉🏻 इमोशननंतर आपण त्या घटनेबद्दल जो विचार करतो, त्या घटनेचा जो अर्थ लावतो आणि जी भावना मनात जास्त काळ टिकते, तिला फीलिंग म्हणतात.
म्हणजेच इमोशन हा पहिला टप्पा असतो, तर फीलिंग हा दुसरा टप्पा असतो.
एक गोष्ट लक्षात ठेवा
इमोशन आपोआप येते, पण फीलिंग आपल्या विचारांमधून तयार होते. म्हणूनच एकच घटना दोन वेगवेगळ्या व्यक्तींना घडली तरी त्यांचे आयुष्य वेगळे घडते...
एक उदाहरण सांगतो जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात येईल...
समजा, रोहित नावाच्या एका तरुणाने एका नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी मुलाखत दिली.
त्याने अनेक दिवस अभ्यास केला, कौशल्य वाढवले आणि पूर्ण आत्मविश्वासाने मुलाखत दिली. त्याला खात्री होती की यावेळी नक्की निवड होईल. काही दिवसांनी कंपनीचा निकाल लागला. रोहितने ई-मेल उघडला आणि त्यात लिहिले होते की त्याची निवड झालेली नाही...तो काही क्षण शांत बसला. त्याला वाईट वाटले. मन निराश झाले. छातीत जडपणा जाणवला. ही त्याची इमोशन होती. अशी भावना कोणालाही येऊ शकते. यात काहीही चुकीचे नाही...
पण खरी गोष्ट आता सुरू होते.*
रोहितने मनात विचार सुरू केले...तो स्वतःला म्हणाला, मी अपयशी आहे. माझ्यात क्षमता नाही. माझे मित्र पुढे जात आहेत आणि मी मागे पडत आहे. माझ्याकडून कधीच काही होणार नाही...
हे विचार रोज त्याच्या मनात फिरू लागले. त्याचा आत्मविश्वास कमी झाला. त्याने नवीन नोकरीसाठी अर्ज करणे बंद केले. नवीन मुलाखतींची भीती वाटू लागली. हळूहळू त्याला स्वतःबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली. आणि हीच त्याची फीलिंग बनली.
आता दुसरी बाजू पाहूया
जर रोहितने त्या दिवशी स्वतःला असे सांगितले असते, या वेळेस माझी निवड झाली नाही, पण याचा अर्थ मी कायमचा अपयशी नाही. कदाचित माझ्या तयारीत काही कमतरता असेल. मी माझ्या चुका शोधेन, नवीन कौशल्य शिकेन आणि पुन्हा प्रयत्न करेन...
या विचारामुळे त्याने स्वतःवर काम सुरू ठेवले. काही महिन्यांनी दुसऱ्या कंपनीमध्ये मुलाखत दिली आणि यावेळी त्याची निवड झाली.
लक्षात घ्या
दोन्ही ठिकाणी सुरुवातीची इमोशन एकच होती निराशा... फरक फक्त विचारांमध्ये होता.
👉🏻 त्या विचारांमुळे फीलिंग बदलली आणि फीलिंगमुळे कृती बदलली. कृती बदलली म्हणून परिणामही बदलला...
👉🏻 घटना आपल्या आयुष्याचा निर्णय घेत नाहीत, तर त्या घडलेल्या घटनेनंतर आपण केलेला विचार आपल्या आयुष्याचा निर्णय घेतो...म्हणूनच जीवनात इमोशनवर रागावण्याची गरज नाही. त्यांना समजून घेण्याची गरज आहे.
जेव्हा तुम्हाला राग येतो, तेव्हा स्वतःला विचारा मी नेमका कोणत्या गोष्टीमुळे रागावलो आहे..??
जेव्हा भीती वाटते, तेव्हा विचारा ही भीती वास्तव आहे का, की माझ्या मनाने तयार केलेली कल्पना आहे..??
जेव्हा दुःख होते, तेव्हा स्वतःला वेळ द्या. प्रत्येक दुःख कायमचे नसते.
हे प्रश्न विचारण्याची सवय लावली की मन हळूहळू स्थिर होऊ लागते.
आज अनेक तरुण एका अपयशामुळे स्वतःला कमी समजू लागतात...
एका नकारामुळे संपूर्ण आयुष्य संपल्यासारखे वाटते. पण सत्य हे आहे की अपयश हा शेवट नसतो. तो फक्त पुढच्या यशाची तयारी असतो.
👉🏻 जीवनात प्रत्येक यशस्वी व्यक्तीला अपयश आले आहे. फरक एवढाच की त्यांनी त्यांच्या इमोशन्सना त्यांचे भविष्य ठरवू दिले नाही. त्यांनी त्यांच्या विचारांवर काम केले आणि पुन्हा उभे राहण्याचा निर्णय घेतला...
👉🏻 आपल्या मनाची एक सवय असते. ते सतत विचार करत राहते. जर आपण त्याला नकारात्मक विचार दिले, तर नकारात्मक फीलिंग तयार होईल...
जर सकारात्मक आणि वास्तववादी विचार दिले, तर सकारात्मक फीलिंग तयार होईल. याचा अर्थ असा नाही की नेहमी आनंदी राहावे किंवा कधीच दुःखी होऊ नये. याचा अर्थ एवढाच की भावना स्वीकारा, पण त्यांचे गुलाम बनू नका...
👉🏻 भावना तुमच्या पाहुण्या आहेत. त्या येतील आणि जातील. पण त्यांना कायमचे घर देऊ नका...
घटना ➡️ इमोशन ➡️ विचार ➡️ फीलिंग ➡️ निर्णय ➡️ कृती ➡️ परिणाम
जर तुम्ही या साखळीतील विचार बदलले, तर पुढची प्रत्येक गोष्ट बदलू शकते.
👉🏻 म्हणून स्वतःच्या भावनांना समजून घ्या. त्यांना नाकारू नका, दाबू नका आणि त्यांच्यापासून पळू नका. त्यांना स्वीकारा, त्यांच्याकडून शिका आणि योग्य विचारांच्या मदतीने त्यांचे रूपांतर सकारात्मक कृतीमध्ये करा.
👉🏻 कारण जीवनात यशस्वी तोच होतो जो इतरांवर विजय मिळवतो म्हणून नाही, तर जो स्वतःच्या मनावर, विचारांवर आणि भावनांवर विजय मिळवतो...💫
आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की प्रतिक्रिया द्या... 💞
धन्यवाद... 🙏🏻🌹😇
✍🏻 नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback