प्रेम आणि आकर्षण यातील फरक प्रत्येकाने का समजून घ्यावा..??
प्रेम आणि आकर्षण यातील फरक प्रत्येकाने का समजून घ्यावा..??
आयुष्यात कधीतरी प्रत्येकाला एखादी व्यक्ती आवडते. तिचं हसणं, बोलणं, स्वभाव, व्यक्तिमत्त्व किंवा तिची एखादी खास गोष्ट आपल्याला आकर्षित करते.
अशा वेळी खूप जणांना असं वाटतं की, हेच प्रेम असावं. पण प्रत्येक वेळी तसं असतंच असं नाही...
Love (प्रेम) आणि Attraction (आकर्षण) या दोन्ही भावना नैसर्गिक आहेत, पण त्या सारख्या नाहीत...
या दोन्हीमधला तुम्हाला फरक समजला तर अनेक गैरसमज, चुकीचे निर्णय आणि नंतर होणारा त्रास टाळता येऊ शकतो...
📌 Attraction म्हणजे काय...??
Attraction म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे वाटणारे आकर्षण.
हे आकर्षण तिच्या चेहऱ्यामुळे, सौंदर्यामुळे, बोलण्याच्या शैलीमुळे, आत्मविश्वासामुळे, यशामुळे किंवा तिच्या व्यक्तिमत्त्वामुळे निर्माण होऊ शकते...आकर्षण अनेकदा अचानक निर्माण होतं.
एखाद्याला पहिल्यांदा पाहिल्यावरही ते वाटू शकतं. पण प्रत्येक आकर्षणाचं रूपांतर प्रेमात होतंच असं नाही...
आकर्षण ही भावना असते, पण ती अनेकदा बाह्य गोष्टींवर आधारित असते...
वेळ, परिस्थिती किंवा व्यक्ती बदलली की ही भावना कमीही होऊ शकते...
Love म्हणजे काय...??
👉🏻 Love म्हणजे फक्त एखादी व्यक्ती आवडणं नाही. प्रेम म्हणजे त्या व्यक्तीला तिच्या गुणांसह आणि दोषांसह स्वीकारणं....
तिचा आदर करणं, तिच्यावर विश्वास ठेवणं, तिच्या आनंदात आनंद मानणं आणि कठीण काळात तिच्या पाठीशी उभं राहणं...
प्रेमात फक्त भावना नसतात, तर जबाबदारीही असते. समजूतदारपणा असतो. संयम असतो. एकमेकांच्या स्वप्नांचा आणि आयुष्याचा आदर असतो.
खरं प्रेम वेळेनुसार अधिक मजबूत होतं.
Love आणि Attraction यांच्यातील फरक
Attraction पटकन निर्माण होतं. Love हळूहळू तयार होतं...
Attraction मध्ये व्यक्तीचं बाह्य सौंदर्य जास्त महत्त्वाचं वाटतं... Love मध्ये त्या व्यक्तीचा स्वभाव, विचार, मूल्यं आणि मन महत्त्वाचं वाटतं.
Attraction मध्ये आपण समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा जास्त ठेवतो. Love मध्ये तिच्या आनंदाचाही विचार केला जातो.
Attraction वेळेनुसार बदलू शकतं. पण खरं प्रेम विश्वासामुळे टिकून राहतं.
आजच्या काळातील खरी परिस्थिती...
👉🏻 मित्रांनो, आज सोशल मीडियामुळे लोक काही दिवसांच्या ओळखीला प्रेम समजू लागतात...😄
रोज चॅट करणं, फोटो लाईक करणं, सतत मेसेज करणं किंवा दिवसभर बोलणं म्हणजे प्रेम...असं नाही.
एखाद्या व्यक्तीची ऑनलाइन टाकलेला फोटो आणि तिचा खरा स्वभाव यात फरक असू शकतो. त्यामुळे कोणत्याही नात्याला वेळ देणं, समोरच्या व्यक्तीला समजून घेणं आणि घाईत निर्णय न घेणं खूप महत्त्वाचं आहे...
खरं प्रेम कसं ओळखाल..??
जर एखाद्या व्यक्तीसोबत राहून तुमच्यात सकारात्मक बदल होत असतील, तुम्ही अधिक जबाबदार होत असाल, एकमेकांचा आदर करत असाल आणि एकमेकांच्या स्वप्नांना पाठिंबा देत असाल, तर त्या नात्यात प्रेम असण्याची शक्यता जास्त असते...
पण जर त्या नात्यात सतत संशय, ताण, नियंत्रण, भीती, भांडणं किंवा एकमेकांवर मालकी गाजवण्याची भावना असेल, तर ते प्रेम नसून असुरक्षितता किंवा आकर्षण असू शकतं...
स्वतःला काही प्रश्न विचारा..
1) मला या व्यक्तीचं फक्त सौंदर्य आवडतं की तिचा स्वभावही...??
2) परिस्थिती बदलली तरी मी तिचा तितकाच आदर करेन का..??
3) मी या व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करतोय की जशी आहे तशी स्वीकारू शकतो...??
4) या नात्यामुळे माझ्या आयुष्यात शांतता वाढते की ताण..??
या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं अनेक गोष्टी स्पष्ट करतात.
एक महत्त्वाची गोष्ट
प्रेम कधीच कोणाला स्वतःचं आयुष्य, स्वप्नं किंवा स्वाभिमान सोडायला भाग पाडत नाही....
खरं प्रेम माणसाला पुढे घेऊन जातं. ते माणसाला अधिक चांगलं, समजूतदार आणि जबाबदार बनवतं...
आकर्षणात अनेकदा मला ही व्यक्ती हवी आहे. हा विचार असतो. पण प्रेमात ही व्यक्ती आनंदी राहावी ही भावना असते.
प्रेम आणि आकर्षण या दोन्ही भावना सुंदर आहेत. आकर्षणामुळे ओळख सुरू होते, पण त्या ओळखीचं प्रेमात रूपांतर होण्यासाठी विश्वास, वेळ, आदर, संयम आणि समजूतदारपणा आवश्यक असतो...
म्हणून कोणत्याही नात्याचा निर्णय घाईत घेऊ नका. व्यक्तीला समजून घ्या, वेळ द्या आणि स्वतःलाही समजून घ्या.
लक्षात ठेवा, आकर्षण डोळ्यांना दिसतं, पण प्रेम मनाला जाणवतं. आकर्षण काही क्षणांचं असू शकतं, पण खरं प्रेम आयुष्यभर साथ देण्याची ताकद ठेवते...
थोडक्यात सांगायचं झाल्यास, आकर्षण म्हणजे एखादे फुलं आवडणं आणि प्रेम म्हणजे त्या फुलाची रोज काळजी घेणं...
तुमचं प्रेम खरं आहे की फक्त आकर्षण आहे... हे एकदा नक्की तपासा...
आजचा लेख आवडला असेल तर नक्की फीडबॅक द्या...
धन्यवाद...
नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback