प्रभावी संवाद कसा करावा...?
प्रभावी संवाद कसा करावा...?
नमस्कार मित्रांनो, 🙏
Marathi Motivational Blog मध्ये तुमच्या सर्वांचे खुप खुप स्वागत आहे..
मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत चांगला संवाद कसा करावा....? लोकांसी कसे बोलावे याबद्दल सर्व माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत... 👍
मित्रांनो, माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये फक्त एका गोष्टीचा फरक असतो तो म्हणजे माणुस बोलु शकतो आणि प्राणी बोलु शकत नाही...
माणुस आपले सुख, दुःख शब्दाच्या स्वरूपाने, किंवा लेखी स्वरूपाने दुसऱ्याशी Share करत करत असतो...
मित्रांनो, एक विचार करा...
प्रत्येक व्यक्ती बोलु शकतो परंतु काही असे लोक असतात ज्यांचे बोलणे आपल्याला खुप खुप आवडते... असं वाटतं त्या समोरच्या व्यक्तीने सारखं बोलत राहावं आणि आपण त्या व्यक्तीचे ऐकत राहवं... आणि तो बोलका व्यक्ती आपल्याला आवडतो सुद्धा...
हे पहा... या जगात सर्व माणसे बोलु शकतात परंतु दुसऱ्याशी कसे बोलावे हे लोकांना अजिबात माहिती नाही...
बोलणे आणि चांगले बोलणे यामध्ये खुप फरक आहे...
जेंव्हा तुम्ही घरी राहता.. तेंव्हा तुम्ही जे काही बोलता ते बोलणे साधारण असते, रोजचे असते
परंतु
जेंव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जॉब करता, ऑफिसमध्ये तुम्ही जे बोलता ते Effective Communication असतं..
मित्रांनो, तुम्ही दूरदर्शन चॅनेलवरच्या रात्री 7 वाजताच्या बातम्या ऐकता का...?
ऐकत नसाल तर आज ऐका आणि पहा तो व्यक्ती किती छान बातम्या देत असतो...
प्रत्येक बातमी देत असताना तो व्यक्ती पूर्ण शब्द बोलतो... आणि समोरच्या व्यक्तीला समजावे असं बोलत असतो... तुम्हाला Communication शिकायचे असेल तर मी एक सोपा उपाय सांगु इच्छितो तुम्ही रोज रात्री बातम्या ऐका आणि पहा कोणता व्यक्ती कसा बोलतो...
जो व्यक्ती प्रेमळ बोलतो अशा व्यक्तीचे बोलणे सर्व जण ऐकत असतात... परंतु जे लोकं बिनकामाचे आणि फालतु बोलतात तेंव्हा त्या व्यक्तीचे कोणीच ऐकत नाही... कारण त्या व्यक्तीच्या शब्दामध्ये असे काही शब्द असतात जे समोरच्या व्यक्तीला अजिबात आवडत नसतात...
मित्रांनो, चांगले संवाद करण्याचे फायदे कोणकोणते आहे आणि त्यावर उपाय काय ते पाहुयात..
प्रभावी संवाद करण्याचे फायदे :-
1) प्रभावी संवादामुळे समोरच्या व्यक्तीला तुम्ही काय सांगत आहात ते लवकर समजेल..
2) प्रभावी संवादाचा उपयोग करून तुम्ही खुप सारे नवीन मित्र तयार करू शकता...
3) प्रभावी संवादामुळे तुम्ही तुमच्या टीमचा लीडर बनु शकता...
4) प्रभावी संवादामुळे तुमची प्रत्येक ठिकाणी रिस्पेक्ट केली जाईल... कारण कुठे कसे बोलावे याबद्दल तुम्हाला ज्ञान असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी रिस्पेक्ट मिळेल...
5) प्रभावी संवादा मुळे तुम्हाला लवकर जॉब मिळेल, आणि मिळणारा जॉब हा खुप पगार वाला असेल...
मित्रांनो, प्रभावी संवादाचे खुप सारे फायदे आहेत... तुम्हाला प्रभावी संवाद करता येत नसेल तर खाली काही टिप्स देत आहे... त्या वाचा आणि आपल्या जीवनात लागु करा... आणि रोज सराव करा...
1) Respect
👉 मित्रांनो, तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा घरी... प्रत्येक व्यक्तीची रिस्पेक्ट करायला शिका...
मी खुप ठिकाणी असे पाहिले आहे कि, जे लोकं साधे काम करतात त्यांना काही ही बोलतात... किंवा नोकर व्यक्ती असेल तर त्याच्याशी लोकं काही बोलतात...
मित्रांनो, समोरचा व्यक्ती लहान असो किंवा मोठा... सर्वात प्रथम प्रत्येकाची रिस्पेक्ट करायला शिका... सर्वजण आपआपल्या ठिकाणी योग्य असतो त्यामुळे कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला रिस्पेक्ट द्या... 👍
2) Smile Your Face
👉 मित्रांनो, जेंव्हा तुम्ही नवीन व्यक्तीला भेटायला जाशाल तेंव्हा चेहऱ्यावर एक गोड Smile ठेवा...
खुप लोकं सिरीयस चेहरा घेऊन लोकांना भेटतात याचा परिणाम असा होतो कि ते लोक ज्या कामासाठी आले ते एकपण काम पूर्ण होत नाही...
मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा...
जेंव्हा पण नवीन लोकांसी भेटायला जाशाल किंवा एखाद्या ऑफिसमध्ये जाशाल तेंव्हा चेहऱ्यावर Smile ठेवा...
उदाहरणं :- तुम्ही खुप परेशान आहात रागात आहात आणि तुम्ही जर लहान मुलाकडे पाहिले तर तो लहान मुलगा तुमच्याकडे पाहुन गोड smile करेल... त्या मुलाची गोड smile पाहुन तुम्ही तुमचे दुःख काही मिनिटासाठी विसरून जाल... आणि तुम्हाला रिफ्रेश झाल्यासारखं वाटेल...
3) बोलताना मी हा शब्द कमी वापरा...
👉 मित्रांनो, बोलत असताना मी हा शब्द जेवढा दुर ठेवता येईल तेवढा दुर ठेवा.. कारण या मी शब्दामुळे कोणत्याही गोष्टीचं श्रेय स्वतः घेणं असा होतो...
मित्रांनो, जेंव्हा एखादा व्यक्ती मी शब्द वापरतो किंवा मी नंतरच वाक्य बोलत असतो.. जसे कि, मी ते काम पूर्ण केले... मी नेहमी माझे सर्व काम पूर्ण करते...
समजा, तुम्ही एखाद्या टीमचे लीडर आहात आणि असे बोलाल कि मी हे सर्व काम पूर्ण केले आहे..
या वाक्य मधुन असे समजुन येते कि, सर्व टीमचे श्रेय तुम्ही एकटे घेत आहात... आणि असे हे कृत्य करणे योग्य नाही नसते...
मित्रांनो, एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवा...
जेंव्हा तुमची टीम चांगले काम करेल तेंव्हा श्रेय हे टीमला द्या... बोलत असताना असे बोला आज मला जे काही इनाम मिळाले त्याचे सर्व श्रेय माझ्या टीम ला जातं...
मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या टीमचा लीडर बनायचे असेल तर तुमच्या टीम मधल्या एखाद्या व्यक्तीची काही चुक झाली असेल तर त्या चुकांची जिम्मेदारी तुम्ही स्वतः घ्या.. आणि स्वीकार करा
कि, माझ्याकडून चुक झाली आहे. यामुळे तुमचा स्वभाव आणि तुमचे नेतुत्वगुण समोर येईल... तुमच्या टीमच्या चुकांची जबाबदारी घेणं यामुळे तुमचं मजबुत व्यक्तिमत्व दिसेल.
4) बोलताना तुम्ही शब्दाचा वापर करा...
👉 मित्रांनो, या जगातला सर्वात आवडता आणि सर्वांना आवडणारा आनंद देणारा शब्द म्हणजे तुम्ही..
मित्रांनो, तुम्हाला जास्त आनंद तेंव्हा होतो जेंव्हा एखादी व्यक्ती तुमच्या विषयी जास्त बोलेल..
त्यामुळे तुम्ही सुद्धा दुसऱ्या व्यक्ती सोबत बोलताना तुम्ही शब्द वापरा...
जसे कि तुम्हाला भेटुन छान वाटलं, तुमच्या आवडीचे पुस्तक कोणते... तुम्हाला कोणत्या ठिकाणी फिरायला जायाला आवडते...
मित्रांनो, जेंव्हा आपण समोरच्या व्यक्तीबद्दल विचारतो तेंव्हा त्याला असं वाटतं कि तुम्ही त्याची किती रिस्पेक्ट करता... समोरच्या व्यक्तीला स्वतःची किंमत वाढल्या सारखं फील होईल आणि तो व्यक्ती तुमचा फॅन होईल...
मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा
समोरच्या व्यक्तीसोबत बोलत असताना हमेशा तुम्ही शब्द वापरा आणि समोरच्या व्यक्तीबद्दल प्रश्न विचारा...
5) चांगल्या कामाची प्रशंसा करा.
👉 मित्रांनो, घरी किंवा ऑफिसमध्ये जो कोणी चांगले काम करेल, त्याची प्रशंसा प्रत्येका समोर करा...
आणि
कोणाची काही चुकलं असेल तर त्याची चुक प्रत्येका समोर सांगु नका... त्याची चुक त्या व्यक्तीला तेंव्हा सांगा जेंव्हा तो एकटा असेल....
मित्रांनो, वरील सर्व टिप्स दोन वेळा वाचा आणि सराव करा...
( मित्रांनो, तुम्हाला Communication Skills Develop करायची असेल तर आमचे Workshop नक्की जॉईन करा.. धन्यवाद 🙏 )
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
खुप छान लिखाण आहे
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवामस्त
उत्तर द्याहटवाKhupch mstty
उत्तर द्याहटवाखूप छान मनःपूर्वक अभिनंदन... उत्कृष्ट लेखन केल्याबद्दल
उत्तर द्याहटवा