मानसिकदृष्ट्या ( Mentally Strong )मजबूत कसे व्हावे...

 


मानसिकदृष्ट्या ( Mentally Strong )मजबूत कसे व्हावे...

👉  मित्रांनो, तुम्ही जर 100 वर्षा अगोदरचा काळ आणि आताचा काळ याबद्दल थोडा  विचार केला तर तुम्हाला समजेल कि, 100 वर्षा अगोदर आजच्या सारखे शोध लागलेले नव्हते...  त्या वेळेस गाड्या नव्हत्या, इंटरनेट नव्हते, टीव्ही नव्हत्या,  ज्या गोष्टीची गरज होती अशा गोष्टीचा कोणताच शोध तेंव्हा लागला नव्हता,  तरी सुद्धा जुने लोक एकमेकांन बद्दलची सर्व माहिती जमा करत, सर्व काम वेळेवर पूर्ण करत होते... आणि 24 तासाचा भरपूर उपयोग करत होते... आणि जुने लोक Mentally Strong सुद्धा होते... त्याना कोणत्याच गोष्टीसाठी धावपळ करावी लागतं नव्हती... 

परंतु 

👉 आजच्या काळात सर्वांन जवळ गाड्या आहेत, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, कॉम्पुटर आहे, सर्व गोष्टी उपलब्ध आहेत... आजच्या तारखेला सर्व गोष्टी आरामात आपल्याला कुठेही मिळतात... 

आधुनिक शोध लागल्यामुळे आताचे जीवन जगणे खुप सोपे झाले, कारण सर्व गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत... तरी सुद्धा कामासाठी आपली धावपळ सुरु आहे... 

प्रत्येक व्यक्ती धावपळीचे जीवन जगत आहे...धावपळीचे जीवन जगत असताना खुप साऱ्या समस्याला तोड द्यावा लागतो... जो व्यक्ती Mentally Strong असतो तो व्यक्ती सर्व प्रॉब्लेम solve करू शकतो परंतु जो व्यक्ती Mentally Strong नसतो तो अपयशी होतो आणि हार मानतो...  त्यामुळे आजच्या काळात जीवन जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला Mentally Strong बनने खुप आवश्यक आहे... 


Mentally Strong म्हणजे काय...? 

👉 मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती हा Mentally Strong असतो, परंतु रोजच्या धावपळीमुळे कामाच्या टेन्शनामुळे, कमी वेळेचे टेन्शन, आणि कामाचा लोड, आणि प्रॉब्लेम खुप वाढलेले आहे.... त्यामुळे प्रत्येक व्यक्ती Mentally Strong असुन सुद्धा दुःखी जीवन जगतात...  परेशानी मध्ये जीवन जगतात... 


जो व्यक्ती Mentally Strong असतो, तो व्यक्ती प्रत्येक परिस्थिती मध्ये शांत राहतो... किती ही टेन्शन असो, कितीही काम असो, Mentally Strong असणारे व्यक्ती स्वतःला शांत ठेवतात... आणि प्रत्येक प्रॉब्लेम Solve करतात... 


Mentally Strong असणारा व्यक्ती प्रॉब्लेम मध्ये सुद्धा संधी पाहत असतो, प्रत्येक प्रॉब्लेमला पॉजिटीव्ह नजरेने पाहतो...त्यामुळे Mentally Strong असणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात  किती ही प्रॉब्लेम आले तरी सुद्धा तो आनंदी राहतो... 


* Mentally Strong असण्याचे फायदे... *

1) Mentally Strong असणारा व्यक्ती कोणते ही प्रॉब्लेम सहज हॅन्डल करू शकतो...  

2) Mentally Strong मुळे आपण नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो... आणि आपल्याकडून कितीही चुका झाल्या तरी त्यामधुन आपण खुप काही नवीन शिकत असतो... 

3) Mentally Strong असणारा व्यक्ती self Motivate असतो... प्रत्येक गोष्टीकडे पॉजिटीव्ह नजरेने पाहतो, पॉजिटीव्ह विचार करतो... त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा परिणाम सुद्धा पॉजिटीव्हच मिळत असतो... 👍


मानसिकदृष्ट्या ( Mentally Strong )मजबूत कसे व्हावे... 

👉 मित्रांनो, तुम्हाला Mentally Strong बनायचं असेल तर काही छोट्या मोठ्या चांगल्या सवयी तुम्हाला तुमच्या जीवनात लागु कराव्या लागतील... 

आणि ह्याच चांगल्या सवयी तुमचे वाईट विचार बदलून टाकतील  आणि तुम्ही काही दिवसानंतर पॉजिटीव्ह व्यक्ती व्हाल... तुम्ही रोज पॉजिटीव्ह विचार कराल... 

चला मग पाहुयात चांगल्या सवयी कोणकोणत्या आहेत... 


1) रोज सकाळी लवकर उठा... 

👉 मित्रांनो, Mentally Strong बनण्यासाठी रोज सकाळी लवकर उठण्याची सवय लावा...  



सकाळी लवकर उठण्यासाठी तुम्ही अलार्मचा उपयोग करू शकता... 

रात्री झोपताना सकाळचा अलार्म लावा आणि ती अलार्म घडी तुमच्या बेड पासुन 15 फूट अंतरावर ठेवा... 



खुप लोक रात्री मोबाईलमध्ये अलार्म लावतात आणि मोबाईल जवळ ठेवतात.... सकाळी अलार्म वाजला कि ते लगेच अलार्म बंद करतात आणि पुन्हा झोपतात... कारण मोबाईल त्यांच्या जवळ असतो त्यामुळे रात्री अलार्म लावल्या नंतर अलार्म घडी किंवा मोबाईल तुमच्या बेड पासुन थोड्या अंतरावर ठेवा... 


सकाळी अलार्म वाजल्यानंतर जेंव्हा तुम्ही बेड पासुन थोड्या अंतरावर चालत जाशाल तेंव्हा तुमचा आळस सुद्धा कमी होईल आणि तुम्ही दिवसाची सुरुवात करायला तयार व्हाल... 👍


2) झोपेतून उठल्या उठल्या स्वतःचा बेड बरोबर करा..

👉 मित्रांनो, सकाळी अलार्म बंद केल्यानंतर सर्वात प्रथम स्वतःचे अंथरून बरोबर घडी करा... आणि बरोबर ठेवा...


मित्रांनो, Mentally Strong बनायची दुसरी पायरी म्हणजे रोज सकाळी स्वतःचे बेड बरोबर करणे... 



 स्वतःचे बेड बरोबर करण्याची सवय तुम्हाला नसेल तर रोज सकाळी लवकर उठल्यानंतर फोकस करा स्वतःचे बेड, अंथरून बरोबर करण्यासाठी...


सकाळचे पहिले टास्क ठरवा ते म्हणजे स्वतःचे बेड आणि अंथरून बरोबर करणे... 

जो पर्यंत पहिले टास्क पूर्ण करणार नाही तो पर्यंत दुसरे काम करू नका... 👍


3) रोज रात्री डायरी लिहा... 

👉 मित्रांनो, Mentally Strong बनण्यासाठी रोज डायरी लिहिणे खुप महत्वाचे आहे... रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःची डायरी लिहायची सवय लावा... 


डायरी मध्ये लिहीत असताना, आज तुम्ही ज्या ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या गोष्टी डायरी मध्ये लिहायच्या आहेत... 


तुम्ही कोणाला आर्थिक मदत केली असेल तर ती मदत सुद्धा स्वतःच्या डायरी मध्ये लिहा... 


प्रत्येक दिवसी काय केले आणि काय वाईट केले हे सुद्या त्या डायरी मध्ये लिहायचं आहे... 


स्वतःची डायरी लिहायला सुरुवात करा तुम्हाला खुप छान परिणाम मिळेल... 

डायरी लिहिण्याच्या सवयीमुळे तुम्ही प्रत्येक दिवसी चांगले काम कराल... तुमचे जे goal आहे त्यानुसार तुम्ही काम करायला सुरुवात कराल... 

डायरी लिहिण्याच्या सवयी मुळे तुम्हाला एक गोष्ट समजेल कि तुम्ही यशाच्या दिशेने जात आहात कि अपयशाच्या.... 

डायरी लिहीत असताना तुम्हाला असे वाटतं असेल कि, आपण अपयशाच्या दिशेने जात आहोत, किंवा आपण आपल्या यशाच्या दिशने काम करून नाही राहलो तर अशा वेळेस अपयशाच्या दिशेला जाण्याचे थांबवा आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने जा आणि कामाला लागा... 

हे सर्व शक्य आहे परंतु त्यासाठी तुम्हाला रोज रात्री स्वतःची डायरी लिहावी लागेल... 👍


4) पॉजिटीव्ह थिंकिंग 

👉 मित्रांनो, तुम्हाला खरोखर Mentally Strong बनायचं असेल ना पॉजिटीव्ह थिंकिंग करा... 


तुमचा एखादा शत्रू असेल तर त्यामधुन  सुद्धा चांगल्या गोष्टी शोधायचा प्रयत्न करा... 


प्रत्येक व्यक्ती मध्ये काही न काही शिकण्यासारखे असते... आणि प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा असतो...  त्यामुळे प्रत्येकाचे विचार सुद्धा वेगवेगळे असतात... 


मित्रांनो, पॉजिटीव्ह विचार करण्याची सवय तुम्हाला लावायची असेल तर प्रत्येक व्यक्ती मधुन चांगल्या गोष्टी शोधायचा प्रयत्न करा... 



पॉजिटीव्ह थिंकिंग साठी रोज पुस्तके वाचा, रोज पॉजिटीव्ह लोकांसोबत गप्पागोष्टी करा... 


जेंव्हा तुम्ही पॉजिटीव्ह लोकांशी मैत्री करता तेंव्हा तुम्हीसुद्धा ऑटोमॅटिक पॉजिटीव्ह बनत असता... 👍


5) भूतकाळात घडलेल्या गोष्टीचा विचार करू नका... 

👉 मित्रांनो, तुमच्या भूतकाळात ज्या कोणत्या वाईट गोष्टी घडल्या असतील त्याला सारखं सारखं आठवू नका... 

आणि तुम्हाला चुकून भूतकाळाची आठवण आली तरी त्या वेळेस भूतकाळात घडलेल्या चांगल्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करा... 

खुप लोक वर्तमानमध्ये भूतकाळाचा विचार करत बसतात आणि स्वतःचे वर्तमान खराब करतात... 


मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आजचा दिवस उद्याचे भविष्य असते... 


तुम्हाला Mentally Strong बनायचे असेल तर आजपासून भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टी आठवू नका आणि विचार सुद्धा करू नका... आणि हमेशा वर्तमानमध्ये जीवन जगा... 


मित्रांनो, वरील सर्व टिप्स स्वतःच्या जीवनामध्ये लागु करा... आणि स्वतःचे जीवन बदला... 


लेख आवडला असेल तर नक्की comments करा... 



✍️✍️ नरेंद्र दिपके 

( Coach of Personality Development )

☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for feedback

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट