श्रीमंत कसे व्हावे...?

 श्रीमंत कसे व्हावे...? 



मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कि श्रीमंत कसे व्हावे?  याबद्दल सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत... 

👉 नमस्कार मित्रांनो, Marathi Motivational Blog मध्ये तुमचे स्वागत आहे. 


मित्रांनो, तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे का...? 


मित्रांनो, आजच्या जगात सर्व लोक श्रीमंत होण्यासाठी धडपड करताना आपल्या दिसतात...  आणि दिवस रात्र श्रीमंत होण्यासाठी काम करतात... 


मित्रांनो, श्रीमंत होणे प्रत्येकासाठी वेगवेगळे असते 

कोणाला 50 लाख रुपये कमवुन आपण श्रीमंत झालो असे फिल होते तर कोणाला 1 करोड रुपये कमवुन श्रीमंत झाल्याचे फिल होते... 


मित्रांनो, आजकल सर्वजण श्रीमंत होण्यासाठी धावत आहे परंतु किती रुपये कमवल्यावर आपण श्रीमंत होईल असं ते कधीच ठरवत नाही... 


श्रीमंत होण्याचे फायदे... 

1) श्रीमंत झाल्यानंतर आपण कोणते ही वस्तु सहज विकत घेऊ शकतो... 

2) श्रीमंत झाल्यावर आपल्याला काम करावे लागतं नाही... 

3) आपण कोणत्याही ठिकाणी फिरायला जाऊ शकतो... 

4) आपण श्रीमंत झाल्यावर आपण दुसऱ्याशी मदत करू शकतो... 

5) आपण आनंदी जीवन जगु शकतो... 

6) श्रीमंत झाल्यावर आपण आपल्या परिवारासोबत वेळ घालु शकतो... 

7) श्रीमंत झाल्यावर आपण आपल्या आवडीचे कपडे घेऊ शकतो, आवडीच्या गोष्टी विकत घेऊ शकतो... 


मित्रांनो, श्रीमंत झाल्यावर खुप काही फायदे आहेत... सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण एक आनंदी जीवन जगतो आणि याचसाठी खुप लोक श्रीमंत होण्यासाठी धडपड करतात.... श्रीमंत होण्यासाठी रात्र दिवस काम करतात... 


हे पहा... मेहनत केल्याशिवाय तुम्हाला फळ भेटणार नाही... त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल... श्रीमंत होण्यासाठी सुद्धा तुम्हाला मेहनत करावी लागेल... पैसाची बचत करावी लागेल... तेंव्हा कुठे तुम्ही श्रीमंत व्हाल...  


मित्रांनो, तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर काही टिप्स तुम्हाला देत आहे.. त्या टिप्स तुम्ही वाचा आणि स्वतःच्या जीवनात लागु करा... 

1) तुम्हाला किती रुपये कमवायचे ते ठरवा... 

👉 मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जीवनात किती रुपये कमवाचे ते ठरवा... 

50 लाख रुपये कमवायचे कि 1 करोड... 

तुम्हाला तुमच्या जीवनात किती रुपये कमवायचे हे ठळक रक्कम ठरवा... 👍


2) किती वर्षामध्ये तुम्हाला श्रीमंत व्हायचं ते ठरवा... 

👉 मित्रांनो, तुम्हाला किती रुपये कमवायचे हे तुम्ही ठरवल्या नंतर ते पैसे किती दिवसात किंवा किती वर्षात कमवायचे हे ठरवा... 

उदाहरणं : - समजा तुम्ही 50 लाख रुपये कमवाल्या नंतर तुम्ही श्रीमंत झाले असे तुम्हाला वाटते... 

50 लाख रुपये तुम्हाला 20 वर्षात कमवायचे आहे 

50 लाख ÷ 20 वर्ष = 250000 रुपये वर्ष  

तुम्हाला एका वर्षात तुम्हाला 250000 रुपये कमवावे लागतील... 

 250000 ÷ 12 महिने = 20834 रुपये महिना 

मित्रांनो, जेंव्हा तुम्ही निश्चित करता कि तुम्हाला किती वर्षात किती रुपये कमवाचे तेंव्हा तुम्हाला हे समजेल कि किती रुपये महिण्याला कमवावे लागतील जने करून आपण ठरवेली रक्कम प्राप्त करू शकेल... 


3) Deadline 

👉 मित्रांनो, एखादी गोष्ट किती वेळेत किंवा किती दिवसात प्राप्त करायची जेंव्हा तुम्ही एक निश्चित वेळ देता त्याला Deadline म्हणतात 

उदाहरणं :- अमझोनवरती खुप प्रॉडक्ट खुप कमी वेळासाठी ऑफर मध्ये मिळतात... ती दिनांक संपली कि ती ऑफर सुद्धा बंद होते... 

मित्रांनो, तुम्हाला जी रक्कम कमवायचे असेल त्याला एक ठरवाईक वेळ द्या... 

जेंव्हा तुम्ही एक ठरवाईक वेळ देता तेंव्हा ते काम त्या वेळेच्या आधी पूर्ण होण्यासाठी धडपड करता आणि ते काम पूर्ण सुद्धा होऊ शकते जर तुम्ही त्या कामाला एक deadline दिली तर... 

मित्रांनो, तुमचे जे कोणते स्वप्न असेल त्याला एक Deadline द्या...


4) पैशाची बचत करा... 

👉 मित्रांनो, प्रत्येक महिण्याला पैसाची बचत करायला शिका... फालतु खर्च करत असाल तर आज पासुन फालतु खर्च बंद करा... 

एक सिगरेट पिणाऱ्या आणि पुढ्या खाणाऱ्या मुलाचं उदाहरणं देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बचत केल्याने श्रीमंत होता येते... 

समजा, एक व्यक्ती दिवसामधुन 3 सिगरेट घेत असेल तर तो एका दिवसात आणि एका वर्षात किती पैसे खर्च करतो याचे गणित पाहुया... 


समजा, एक सिगरेटची किंमत 10 रुपये आहे... 

3 सिगरेट × 10 = 30 रुपये 

पुढ्या 20 रुपयाच्या खात असेल 


30+20 = 50 रुपये 

एक व्यक्ती दिवसाला 50 रुपये खर्च करतो 

50 रुपये दिवस × 30 दिवस = 1500 रुपये महिना 

एक व्यक्ती सिगरेट आणि पुढ्यावर 1500 रुपये खर्च करतो तो पण एका महिन्यात 

एका वर्षात किती रुपये खर्च येतो ते पाहुयात 

1500 रुपये महिना × 12 महिने = 18000 रुपये वर्ष 


मित्रांनो,  सिगरेट आणि पुढ्या खाणारा व्यक्ती एका वर्षात 18000 रुपये खर्च करतो... 

मित्रांनो, एक विचार करा 

त्या पुढ्या खाणारा व्यक्तीने सिगरेट आणि पुढ्या न  खाता ते पैसे कुठे इन्व्हेस्टमेंट केली असते तर त्याला खुप मोठा फायदा झाला असता... 

प्रत्येक वर्षी 18000 रुपये भरून 20 वर्षानंतर त्याला सहज 10 लाख रुपये LIC प्लॅन नुसार मिळाले असते... 

मित्रांनो, तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर आज पासुन फालतू खर्च बंद करा... आणि बचत झालेले पैसे कुठे तरी इन्व्हेस्ट करा... 👍


मित्रांनो, आशा करतो कि श्रीमंत होण्यासाठी मी सांगितलेल्या टिप्स नक्की तुमच्या कामी येतील... 

मित्रांनो, पुढच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कि, Passive इनकमचे मार्ग आपण स्वतः कसे तयार करू शकतो...

मित्रांनो, Marathi Motivational Blog वर तुम्ही नवीन असाल तर या पेजला नक्की Follow करा... 

धन्यवाद.... 


✍️✍️ नरेंद्र दिपके 

( Coach of Personality Development )

☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for feedback

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट