सोशल मीडियाचा उपयोग कसा करावा...
सोशल मीडियाचा उपयोग कसा करावा...
मित्रांनो, आजच्या लेखामध्ये सोशल मीडियाचा चांगला उपयोग कसा करावा... आणि कोणत्या गोष्टीपासुन आपण सावध राहायला पाहिजे इत्यादी गोष्टी आपण पाहणार आहोत..
👉 मित्रांनो, जेंव्हापासुन आधुनिक शोध लागले तेंव्हापासुन माणसाला अवघड काम खुप सोपे झाले आहे...
माणसाच्या उपयोगात येणाऱ्या आधुनिक शोधापैकी सोशल मीडिया हा सुद्धा एक शोधच समजा...
एके काळी माणुस कॉम्म्युनिकेशन हे पत्राद्वारे करत होतो...
👉आपल्या दुर राहणाऱ्या नातेवाईकांसी जर बोलायचे असेल तर तो व्यक्ती आपला MSG पत्राद्वारे पाठवत होता...
जर आज पोस्ट ऑफिस ने पत्र पाठवले तर ते पत्र पोहचायला कमीत कमी 6 ते 7 दिवस लागत होते...
थोडक्यात म्हणजे अगोदरचा जो काळ होता तो थोडा अवघडच होता...
परंतु
👉 काही वर्षा नंतर मोबाईलचा आणि इंटरनेटचा शोध लागला... आणि आपला संदेश पत्रद्वारे पाठवणाऱ्या लोकांसी संख्याच कमी झाली... ( पत्र पाठवण्याचा जमाना गेला )
मोबाईलचा शोध लागला आणि प्रत्येक परिवारा मध्ये एक नवीन सदस्य आला तो म्हणजे मोबाईल
अगोदर एक घर एक मोबाईल होता परंतु आजच्या तारखेला एक व्यक्ती एक मोबाईल आहे...
👉 मित्रांनो, मोबाईल इंटरनेटचा उपयोग करून आपण खुप साऱ्या गोष्टी घरी बसुन शिकु शकतो... पुस्तके वाचु शकतो, News पेपर सुद्धा वाचु शकतो एवढेच काय आपण घरी बसुन ब्लॉग द्वारे पैसे सुद्धा कमवु शकतो...
मित्रांनो, जेंव्हा एक गोष्ट निर्माण होत असते तेंव्हा त्यासोबत समस्या सुद्धा निर्माण होत असतात...
आणि
मोबाईल सोबत सुद्धा खुप समस्या निर्माण झाल्या त्या म्हणजे अँप, गेम्स,
हे पहा
तुम्ही जर प्रत्येक गोष्टीचा उपयोग चांगल्या कामासाठी केला तर तुम्हाला Result सुद्धा छान मिळेल...
परंतु
एखाद्या गोष्टीचा वापर जास्त कराल तर त्या गोष्टीची सवय तुम्हाला लागुन जाईल...
👉 मित्रांनो, सोशल मीडियाचा उपयोग करून खुप लोक पैसे कमवतात तर खुप लोक सोशल मीडियाचा उपयोग करून स्वतःच्या आयुष्यचा सत्यानास झालेला तुम्ही पाहिला असेल किंवा News वाचल्या असतीलच...
मित्रांनो, आजच्या लेखामध्ये सोशल मीडियाचा चांगला उपयोग कसा करावा... आणि कोणत्या गोष्टीपासुन आपण सावध रहायला पाहिजे इत्यादी गोष्टी आपण पाहणार आहोत..
1) इंटरनेटचा उपयोग करून आपण आपले विचार दुसऱ्यासी Share करू शकतो...
2) इंटरनेटचा उपयोग करून आपण नवीन गोष्टी घरी बसुन शिकु शकतो...
3) इंटरनेटचा उपयोग करून आपण लाखो लोकांन सोबत कॉम्युनिकेशन करू शकतो...
4) इंटरनेटचा उपयोग करून आपण ब्लॉगद्वारे, Youtube द्वारे, अँप द्वारे खुप सारे पैसे कमवु शकतो...
मित्रांनो, वरील सर्व गोष्टी तुम्ही इंटरनेटचा चांगला उपयोग करून प्राप्त करू शकता..
मित्रांनो, आजकल सर्वात मोठा फ्रॉड हा ऑनलाईन होऊन राहला..
मागे माझ्या एका मित्राचे फेसबुक कोणी तरी हॅक केले आणि त्याच्या फेसबुक वरून सर्वांना पैसे मागत होता...
चॅटिंगद्वारे ब्लँकमेल करणे...अशा गोष्टी ऑनलाईन खुप घडत आहे...
त्यामुळे सोशल मीडियाचा उपयोग करताना आपण खुप सावध राहायला हवं...
मित्रांनो, सोशल मीडियाचा उपयोग करताना खालील टिप्स लक्षात ठेवा...
1) अनोळखी व्यक्तीपासुन सावध रहा..
👉 मित्रांनो, तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम किंवा या व्यतिरिक्त कोणत्या अँपचा उपयोग करत असाल तर हमेशा एक गोष्ट लक्षात ठेवा...
अनोळखी व्यक्तीची फ्रेंड्स Request Accept करू नका...
अनोळखी व्यक्ती सोबत चॅटिंग करू नका...
2) सोशल मीडियाचा वापर कामापुरता करा..
👉 मित्रांनो, सोशल मीडियाचा वापर काम असेल तेंव्हाच करा... जास्त वेळ एखाद्या अँपवरती ऑनलाईन राहु नका...
मित्रांनो, आता एक नवीन गेम आला होता, लहानमुलं तो game 24 तास खेळत होते याचा परिणाम असा झाला कि ते मुलं पागल झालेत... झोपेत सुद्धा बडबड करत, झोपेत चालत सुद्धा...
लक्षात ठेवा... सोशल मीडियाचा उपयोग कामापुरता करा..
3) वेळेचा सदुपयोग करा...
👉 खुप लोक सोशल मीडियाचा उपयोग फक्त आणि फक्त Time Pass करण्यासाठी करतात...
मित्रांनो, एक घंटा फेसबुक वापरण्यापेक्षा एक घंटा मोटिवेशनल लेख वाचा...
Google वरती खुप सारे लेख उपलब्ध आहेत... किंवा टेलिग्राम वर मराठी प्रेरणादायी विचार या ग्रुपवर सुद्धा खुप छान माहिती मिळते... तो ग्रुपमध्ये ऍड व्हा...
किंवा
PDF पुस्तके वाचा...
वेळेचा वाईट उपयोग करण्यापेक्षा वेळेचा चांगला उपयोग करायला शिका... 👍
4) चांगल्या ग्रुप मध्ये ऍड व्हा
👉 मित्रांनो, तुम्हाला फेसबुक इंस्टाग्राम, टेलिग्राम यासारख्या अँप वापरण्याची सवय जर तुम्हाला लागलीच असेल तर एक काम करा...
प्रत्येक ठिकाणी चांगले ग्रुप असतात... त्या ग्रुपमध्ये ऍड व्हा...
फेसबुकवर खुपसारे ग्रुप आहेत जे चांगली माहिती लोकांन पर्यंत पोहचवतात... टेलिग्रामवर पण खुप चांगले ग्रुप आहेत.. त्या ग्रुपमध्ये ऍड व्हा...
जेंव्हा पण तुम्ही फेसबुक किंवा टेलिग्राम ओपन कराल तेंव्हा तुम्हाला चांगले विचार वाचायला मिळतील... आणि याचप्रमाणे तुम्ही वेळेचा चांगला उपयोग करू शकाल...
मित्रांनो, सोशल मीडियाचा उपयोग करताना अनोळखी व्यक्ती सोबत फ्रेंड्सशिप करू नका, कोणाला स्वतःचे फोटो Share करू नका, स्वतःचा मोबाईल नंबर share करू नका... आणि अनोळखी व्यक्ती सोबत चॅटिंग सुद्धा करू नका...
आणि
सोशल मीडियाचा चांगला उपयोग कसा करता येईल ते पहा... आणि वेळेचा सदुपयोग करा...
असेच मोटिवेशनल लेख वाचण्यासाठी Marathi Motivational Blog ला Follow करा...
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback