Problem Solving Skills...




 मित्रांनो, तुम्हाला एखादा प्रॉब्लेम आला तर तुम्ही आनंदी होता का...? 

मित्रांनो, Problem हा एक असा शब्द आहे, जो कोणालाच आवडत नाही... 

प्रॉब्लेम शब्द ऐकूनच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्रास दिसायला सुरुवात होतो... Problem शब्द ऐकूनच हसरे चेहरे दुःखी होतात... 


मित्रांनो, विचार करा फक्त Problem शब्द ऐकूनच माणसाला एवढा त्रास होत असेल तर जास्त प्रॉब्लेम जीवनात आले तर काय होईल... सहाजिकच आहे माणसाला जीवन जगणे अवघड होईल... 

मित्रांनो, तुम्ही एखादा  असा व्यक्ती पाहिला का जो प्रॉब्लेम आल्यावर खुश होत असेल... 

एक मिनिट विचार करा 


मित्रांनो, या जगात जेवढे पण यशस्वी झालेले लोक आहेत त्यांना सुद्धा खुप प्रॉब्लेम येतात परंतु ते लोक प्रत्येक प्रॉब्लेमला सोप्या पद्धतीने solve करतात कारण त्याना Problem Solving skills  बद्दल माहिती असते... 


मित्रांनो, एक साधारण व्यक्तीला जर एखादा प्रॉब्लेम येत असेल तर तो त्याला प्रॉब्लेम दिसेल परंतु तोच प्रॉब्लेम एखाद्या यशस्वी झालेल्या लोकांना आला तर तो प्रॉब्लेम त्यांच्यासाठी एक संधी असते... 👍


मित्रहो, तुम्हाला पण यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला Problem Solving Skills येणे आणि समजणे खुप गरजेचं आहे.... 


आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कि Problem Solve कसा केला जातो... 


मित्रांनो, माणुस प्रॉब्लेमला कधीच घाबरत नाही परंतु त्या प्रॉब्लेममुळे होणाऱ्या नुकसानला खुप घाबरत असतो... एखादा प्रॉब्लेम किती नुकसान करेल हे त्या व्यक्तीच्या अटीट्युडवर डिफेन्ड करत असते... 👍


मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती तीन काळात जगत असतो... 

1) भूतकाळ 2) वर्तमानकाळ 3) भविष्यकाळ 



जो व्यक्ती भूतकाळात आणि भविष्यकाळात जीवन जगत असतो असा व्यक्तीच्या जीवनात खुप प्रॉब्लेम येत असतात... कसे ते पाहुयात 


1) भूतकाळात जीवन जगणारे... 

👉 या प्रकारचे लोक राहतात वर्तमानमध्ये परंतु जगतात भूतकाळात.

भूतकाळात जीवन जगणारे लोक हमेशा भूतकाळात घडलेल्या गोष्टीचा विचार करत असतात... जसे कि, 

मी परीक्षा मध्ये नापास झालो, माझा सर्व पैसा डुबून गेला, माझे सर्व plan Fail झाले, मी एखादी गोष्ट त्यावेळेस करायला हवी होती परंतु मी केली नाही... माझं नशीब खराब आहे वैगरे वैगरे... 


मित्रांनो, हे लोक हमेशा भूतकाळात घडलेल्या गोष्टीचा सारखा सारखा विचार करतात आणि दुःखी होतात... वर्तमान दिवसामध्ये सुद्धा भूतकाळात घडलेल्या गोष्टीचा विचार करतात आणि वर्तमान दिवस असाच वाया घालवतात विचार करून.... आणि आजचा दिवस हा दुसऱ्या दिवसी भूतकाळ बनतो... 


मित्रांनो, या प्रकारच्या लोकांना खुप प्रॉब्लेम येतात, याचे कारण म्हणजे ते हमेशा भूतकाळात काय वाईट झालं याचा विचार करतात आणि वर्तमान दिवस सुद्धा वाया घालवतात.... 


2) भविष्यकाळ  

👉 मित्रांनो, या प्रकारचे लोक सुद्धा राहतात वर्तमान मध्ये परंतु विचार करतात भविष्यकाळाचा... 😄

जसे कि, माझ्या जीवनात काय होईल...? मला यश कसे मिळेल...?  मी परीक्षामध्ये पास होईल का...?  

मित्रांनो, या टाईपचे लोक खुप दुःखी असतात कारण हे लोक हमेशा चिंतीत राहतात... आणि एकच विचार करत राहतात... 


वर्तमानमध्ये राहतात परंतु भविष्यकाळाचा विचार करत बसतात आणि आजचा जो दिवस असतो तो सुद्धा वाया घालवतात.... 😄

असे लोक स्वतःला प्रॉब्लेम मध्ये टाकतात, स्वतः प्रॉब्लेम तयार करतात.... 


3) वर्तमानमध्ये जीवन जगणारे 

👉 मित्रांनो, जे लोक वर्तमानमध्ये जीवन जगतात त्यांना कोणत्याच प्रॉब्लेम येत नाही... कारण हे लोक भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार अजिबात करत नाही... 👍


मित्रांनो, जे लोक वर्तमानमध्ये जीवन जगतात हे लोक दिवसाचे 24 तासाचा भरपूर उपयोग करतात... प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करतात... कारण त्यांना माहिती आहे आजचा दिवस उद्याचे भविष्य असते...त्यामुळे ते पूर्ण जीवन आजच म्हणजे वर्तमानमध्ये जगतात आणि यशस्वी होतात... 


मित्रांनो,, तुम्हाला आनंदी जीवन जगायचं असेल तर भूतकाळ आणि भविष्यामध्ये जीवन जगु नका... वर्तमानमध्ये जीवन जगा मग पहा तुमच्या जीवनातले 60% प्रॉब्लेम ऑटोमॅटिक गायब होतील... 


समजा तुम्ही वर्तमानमध्ये जीवन जगुन सुद्धा प्रॉब्लेम येत असतील तर तो प्रॉब्लेम नाही ती एक संधी आहे... 👍


वरील वाक्य तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरणं देतो... 

मित्रांनो, तुम्हाला मच्छर चावतात का..? 



रात्री 5 वाजले कि मच्छर चावायला सुरुवात होते... कधी कधी तर मच्छरला आपण शिव्या देखील देतो...  


मित्रांनो, आता विचार करा मच्छर हि प्रत्येकाची समस्या आहे कि नाही... समजा मच्छरचा प्रॉब्लेम solve झाला किंवा आपल्या भारतामधून मच्छर गायब झाले तर काय होईल...? 


तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे, आपल्याला मच्छर चावणार नाही... परंतु मच्छर गायब झाल्यामुळे हजारो कंपन्या बंद पडतील...आणि लाखो लोक बेरोजगार होतील... लाखो लोकांना एक साथ रोजगार सुद्धा मिळणार नाही... 


मित्रांनो, एक कंपनी खुप साऱ्या लोकांचे जीवन भागवत असते... मग विचार करा मच्छर चावणे हा प्रॉब्लेम आहे कि संधी... 


आता एक विचार करा 

आपल्या भारतात कोणीच बिमार पडले नाही तर काय होईल...? 


सर्वात अगोदर डॉक्टर लोक आणि हॉस्पिटलमध्ये काम करणारे करोडो लोक बेरोजगार होतील... कारण कोणी बिमारच पडणार नाही मेडिकल कसे चालेल.... औषधं निर्माण करणाऱ्या कंपन्या सुद्धा बंद पडतील...आणि  खुप साऱ्या  लोकांचा रोजगार सुद्धा चालल्या जाईल... 


मित्रांनो, आपल्याला जो प्रॉब्लेम असतो तो प्रॉब्लेम दुसऱ्यासाठी एक संधी असते हे लक्षात ठेवा... 👍


मित्रांनो, प्रत्येक प्रॉब्लेम solve कसा करावा यासाठी काही टिप्स सांगत आहे... त्या टिप्स वाचा आणि Follow करा... 

1) नेमका प्रॉब्लेम काय आहे... हे पहा 

👉 मित्रांनो प्रत्येक प्रॉब्लेम हा तसा प्रॉब्लेम नसतो जसा आपण समजतं असतो... प्रत्येक प्रॉब्लेम solve करण्यासाठी Why Therpay चा उपयोग करा... 

कोणताही प्रॉब्लेम आला तर स्वतःला विचारा Why... 


उदा, समजा तुमचे डोकं दुखत आहे... या प्रॉब्लेमला solve करण्यासाठी तुम्हाला स्वतःला Why विचारावा लागेल... 

जसे कि, माझं डोकं का दुखत आहे...? 

उत्तर मिळेल, जास्त टीव्ही पाहिल्यामुळे किंवा जास्त मोबाईलचा उपयोग केला त्यामुळे डोकं दुखत आहे... 


नंतर स्वतःला विचारा समाधान काय आहे... तुम्हाला उत्तर मिळेल 

टीव्ही किंवा मोबाईलचा वापर कमी करावा लागेल...


मित्रांनो, Why Therapy चा उपयोग करून तुम्ही खुप सारे प्रॉब्लेम solve करू शकता...



2) Problem share करा 

👉 मित्रांनो, प्रत्येक प्रॉब्लेमचे काही न काही समाधान असते... तुमचा जो कोणता प्रॉब्लेम असेल तो तुमच्या मित्राशी share करा... होऊ शकते कि तुमच्या Problem चे सोलुशन तुमच्या मित्राकडे असेल.... 



मित्रांनो, ज्या प्रॉब्लेमचे सोलुशन तुमच्यकडे नाही असे प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या मित्राशी किंवा आई बाबा जवळ share करायला हवे... 👍


3) प्रॉब्लेम वर चर्चा करा 

👉 मित्रांनो, क्रिकेट Match सुरु व्हायच्या अगोदर 11 खेळाडू हमेशा match बद्दल चर्चा करतात.... किंवा चालु match मध्ये ब्रेक मिळाला तर चर्चा करतात... 


मित्रांनो, तुमचा जो प्रॉब्लेम असेल जो तुमच्याकडून solve होत नसेल तर तो प्रॉब्लेम ग्रुप मध्ये चर्चा करा... प्रॉब्लेम चा विचार करा सोलुशनचा विचार करा... जेंव्हा तुम्ही ग्रुप मध्ये चर्चा करता तेंव्हा सुद्धा प्रॉब्लेमचे सोलुशन मिळत असते... 👍



मित्रांनो, 15 सप्टेंबर 2022 पासुन Basic Personality Development + Time Management Skills ची नवीन Batch सुरु होत आहे.  ज्या  व्यक्तीला कोर्स मध्ये सहभाग घ्यायचा त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा... 

WhatsAPP NO. 9545441697


✍️✍️ नरेंद्र दिपके

( Coach of Personality Development 

☎️☎️ 9545441697


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट