जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे...?
जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे...?
👉 नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्वजण आशा करतो, सर्वजण मजेत आणि आनंदी असाल...
मित्रांनो, एक प्रश्न रोज मला विचारला जातो तो प्रश्न म्हणजे असा कि, जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे...?
मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण याच प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोत...
चला मग पाहुयात उत्तर
मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती स्वप्न पाहत असतो, स्वप्न दोन प्रकारचे असतात...
रात्री झोपल्यानंतर जे स्वप्न आपण पाहतो ते स्वप्न आणि जागी राहुन जे स्वप्न आपण पाहतो ते स्वप्न... असे दोन स्वप्न असतात
रात्री झोपल्या नंतर जे स्वप्न आपण पाहतो ते जागी होण्यापर्यंत मर्यादित असते... झोपेतून जागी झाले कि स्वप्न समाप्त होते...
आता दुसरे स्वप्न ते म्हणजे भविष्याचं स्वप्न
स्वप्नाला आपण आपले Goal समजु.... ok
👉 प्रत्येकाचे काही न काही Goal असते, ते Goal प्राप्त करण्यासाठी आपण दिवस रात्र मेहनत करायला सुद्धा तयार राहतो...
परंतु
मेहनत करून सुद्धा जर आपल्याला फळ मिळत नसेल तर आपण दुःखी होतो, निराश होतो...
दुःखी होऊन आपण ठरवलेले सर्व Goal विसरून जायचं ठरवतो...आणि दुःखी होऊन बसतो
मित्रांनो, एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवा...
तुम्ही जे स्वप्न पाहु शकता ते प्राप्त सुद्धा करू शकता... त्यामुळे स्वप्न पाहणे सोडु नका... 👍
मित्रांनो, मेहनत करून सुद्धा आपल्याला सारखी सारखी निराशा हाती येत असेल तर नक्कीच आपण कुठे तरी चुकी करत आहोत... जेंव्हा आपल्याला आपली चुक समजत नाही तेंव्हा आपण Google वरती सर्च करतो कि, स्वतःचे स्वप्न पूर्ण कसे करावे...?
स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला तीन किंवा चार टिप्स सांगत आहे... त्या टिप्स वाचा आणि त्या टिप्स स्वतःच्या जीवनात लागु करा...
1) प्रत्येक कामात 100% योगदान द्या..
👉 मित्रांनो, तुम्ही जे कोणते छोटे मोठे काम कराल त्यामध्ये स्वतःचे 100% योगदान द्या...
समजा, तुम्ही एखाद्या व्यक्ती सोबत गप्पा गोष्टी करत असाल तर त्या व्यक्तीचे बोलणे किंवा त्याचे म्हणणे 100% ऐका...
असे केल्याने तुम्हाला खुप साऱ्या नवीन गोष्टी शिकायला मिळतील...
पुस्तक वाचताना सुद्धा 100% लक्ष देऊन वाचा...
चहा पिताना सुद्धा 100% लक्ष देऊन चहा प्यावा...
News पाहताना 100% लक्ष देऊन News पाहा...
मित्रांनो, तुमचे जे स्वप्न असेल त्या स्वप्ना प्रमाणे काम करा आणि प्रत्येक कामात स्वतःचे 100% योगदान द्या...
मित्रांनो, जेंव्हा तुम्ही प्रत्येक काम करताना स्वतःचे 100% योगदान देता तेंव्हा तुम्ही जे काम करता ते पूर्ण होते, दुसरा फायदा असा होतो कि, तुमची कॉन्सट्रेशन फोकस ठेवण्याची क्षमता वाढते...
2) वर्तमान मध्ये रहायला शिका...
👉 मित्रांनो, भविष्याचे स्वप्न पाहणे ठिक आहे परंतु रोज भविष्याचा किंवा भूतकाळात घडलेल्या गोष्टीचा विचार करणे चुकीचं आहे...
जेंव्हा तुम्ही भूतकाळाचा किंवा भविष्यकाळाचा विचार करत बसता तेंव्हा वर्तमान मधला किंमती वेळ तुमच्या हातामधून निघुन जात असतो...
मित्रांनो, नेहमी वर्तमान मध्ये रहा, आणि सध्या आपण कोणत्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करू शकतो यावर लक्ष द्या...
प्रत्येक काम वर्तमानमध्ये राहुन करा...
चहा पिताना पूर्ण लक्ष चहावरच द्या... आणि चहाचा आनंद घ्या
खुप लोक चहा पिताना दुसऱ्या गोष्टीचा विचार करतात, कामाबद्दल विचार करतील किंवा दुसऱ्या गोष्टीबद्दल विचार करत बसतात त्यामुळे त्यांच्या हातात असलेल्या चहाचा आनंद त्यांना घेता येत नाही...
मित्रांनो, वर्तमानमध्ये रहा आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याला शिका...
3 ) छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये परफेक्ट बना...
👉 मित्रांनो, तुम्हाला जर खरंच तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असेल ना तर छोट्या गोष्टी मध्ये परफेक्ट व्हा...
छोट्या छोट्या गोष्टी मध्ये परफेक्ट होऊनच मोठ्या गोष्टी मिळत असतात... हे लक्षात ठेवा
एक उदाहरणं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात लवकर येईल...
उदाहरणं :- समजा, तुम्हाला English भाषा शिकायची आहे... आता तुम्ही काय करणार...
खुप लोक English ग्रामर पुस्तके किंवा इंग्लिश स्पीकिंगचे पुस्तके विकत घेतात आणि पुस्तके वाचायला सुरुवात करतात...
2 किंवा 3 दिवस पुस्तके वाचतात नंतर पुस्तके वाचणे सोडुन देतात...
मित्रांनो, खुप लोक सध्या हिच चुक करत आहे..
स्वप्न मोठे पाहतात आणि पाऊल सुद्धा खुप मोठे उचलतात... याचा परिणाम असा होतो कि, त्यांना अपयश मिळते...
मित्रांनो, स्वप्न नक्की मोठे पहा परंतु त्याची सुरुवात छोट्या गोष्टी मधुन करा...
तुम्हाला English भाषा शिकायची असेल तर मोठमोठे पुस्तके वाचु नका...
अगोदर A B C D शिका... ABCD मध्ये परफेक्ट बना त्या नंतर English बाराखडी मध्ये परफेक्ट व्हा...
अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये परफेक्ट होऊनच तुम्ही एक दिवस English भाषा बोलु शकाल... 👍
लक्षात ठेवा,
प्रत्येक लहान गोष्टीकडे लक्ष द्या, आणि प्रत्येक लहान गोष्टीमध्ये परफेक्ट व्हा.. तेंव्हाच तुम्ही मोठ्या गोष्टी प्राप्त करू शकता...
4 ) रोज पुस्तके वाचा
👉 सुद्धा हवा घ्यायची असेल तर जंगलात फिरायला जा आणि सकारात्मक विचार पाहिजे असतील तर रोज पुस्तके वाचा...
प्रत्येक गोष्टी मागे एक पॉजिटीव्ह विचार असतो... पॉजिटीव्ह विचार असेल तर सर्व गोष्टी पॉजिटीव्ह मिळतील... परंतु तुम्ही निगेटिव्ह विचार करून तुमच्या स्वप्नांच्या मागे धावत असाल तर तुम्हाला मिळणार परिणाम सुद्धा निगेटिव्हच मिळेल...
मित्रांनो, पॉजिटीव्ह विचारांसाठी रोज किमान एक तास तरी पुस्तके वाचण्याची सवय स्वतःला लावा...
पुस्तकामधून मिळणारे सकरात्मक विचार तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करतील...👍
5) स्वतःवर विश्वास ठेवा..
👉 मित्रांनो, कोणतेही काम करण्या अगोदर स्वतःला सांगा... माझा माझ्या स्वतःवर विश्वास आहे, हे काम मी करू शकतो, आणि तुम्ही ते कामामध्ये 100% यशस्वी व्हाल...
मित्रांनो, रोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर स्वतःला सांगा... मला माझ्यावर विश्वास आहे... 👍
वरील टिप्स दोन तीन वेळा वाचा आणि स्वतःच्या जीवनात लागु करा...
मित्रांनो, तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सांगितलेल्या टिप्स तुमच्या नक्की कामी येतील अशी आशा करतो...
Time Management किंवा कंटेंट रायटिंगचा कोर्स शिकायचा असेल तर मला Whatsapp वर msg करा... 9545441697
मित्रांनो, असेच मोटिवेशनल लेख वाचण्यासाठी Marathi Motivational Blog पेजला Follow करा... धन्यवाद 🙏
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach Of Personality Development )
☎️☎️ 9545441697
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback