आनंदी राहण्याचे मार्ग...

 आनंदी राहण्याचे मार्ग... 


👉 नमस्कार मित्रांनो, मित्रांनो  आजच्या लेखामध्ये आपण आनंदी राहण्याचे मार्ग पाहणार आहोत... 


आजचा लेख खुप महत्वाचा आहे त्यामुळे आजचा लेख काळजीपुर्वक वाचा आणि सांगितलेल्या टिप्स जीवनात लागु करा... 


मित्रांनो, स्वतःला आनंदी ठेवायचे  असेल तर आपण स्वतःच प्रयत्न करायला हवेत, आनंदी राहण्याचे... जो पर्यंत आनंदी राहण्याचा विचार आपण आपल्या मनाशी पक्का करत नाही तो पर्यंत आपण आनंदी राहणं अशक्य आहे... आणि आनंद हा पैशाने सुद्धा विकत घेता येत नाही, म्हणुन तो आपल्यालाच निर्माण करावा लागतो... 


एखादे काम तुमच्या आवडीचे असो अथवा आवडीचे नसो तुम्ही जर ते काम करताना त्या कामामध्ये आनंद शोधला तर तुम्हाला ते काम करताना कंटाळा येणार नाही आणि ते काम करताना तुम्हाला नेहमी आनंद मिळेल... 👍


मित्रांनो, आनंदी राहण्यासाठी काही टिप्स देत आहे, त्या टिप्स वाचा आणि स्वतःच्या जीवनात लागु करा... 

1) स्वतःला आनंदी, उत्साही ठेवण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या रोजच्या कामातून एक दिवस सुट्टी घेऊन स्वतःला पूर्णपणे तणावमुक्त करायला हवं... 


2) मित्रांनो, रोजच्या कामातून एक दिवस घेतलेल्या सुट्टी मध्ये कुठे तरी फिरायला जा... निसर्गम्य ठिकाणी जा... निसर्गसौंदर्याचा आनंद घ्या... निसर्गामध्ये मनमोकळे फिरणाऱ्या पक्ष्याकडे पाहा, प्राण्याकडे पाहा, झाडे पाहा, निसर्ग पाहुन तुम्हाला खुप खुप आनंद होईल आणि तुम्ही तुमच्या  कामाचे टेंशन, जीवनाचे टेंशन विसरून जासाल... 

मित्रांनो, तुम्ही तुमच्या ऑफिसचे एकच काम करून कंटाळले असाल तर एक दिवस कुठे तरी बाहेर फिरायला जा... एका दिवसात मिळणारा आनंद तुम्हाला पूर्ण महिनाभर आनंदी ठेवेल.. 



3) मित्रांनो, रोजच्या कामाची यादी तयार करा... रोज रात्री झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवसाच्या कामाची यादी तयार करा... 

आणि त्या यादी नुसार काम करा... तुम्हाला 100%


आनंद मिळेल 


4) मित्रांनो, तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टीसाठी वेळ काढा आणि त्या गोष्टी करा... 

उदा, तुम्हाला चित्र काढायला आवडत असेल तर रोज थोडा वेळ काढा किंवा प्रत्येक रविवारला थोडा वेळ काढुन चित्र काढत जा... असे केल्याने तुम्हाला खुप खुप आनंद मिळेल... 



कोणाला सायकल खेळण्याची आवड असते, कोणाला पुस्तके वाचण्याची सवय असते तर कोणाला गाणे म्हणायची आवड असते.... तुम्हाला ज्या कोणत्या गोष्टी आवडतात त्या गोष्टीसाठी वेळ काढा आणि त्या गोष्टी करा.. तुम्हाला 100% आनंद मिळेल... 

5) मित्रांनो, आठवड्यातून एक दिवस तुमच्या मित्रांना भेटा किंवा तुमच्या आवडीच्या व्यक्तींना  भेटा. 

त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा गोष्टी करा, खा - प्या, सिनेमा बघा, हवं तसं जगा तुम्हाला तुमच्या आवडीच्या व्यक्तींना भेटुन खुप आनंद मिळेल...

6) मित्रांनो, तुम्ही जर खुप दुःखी असाल तर आशा वेळेस तुम्ही तुमच्या आवडीचे गाणे ऐका, आणि त्या गाण्यासोबत गाणे बोला...  तुमचे दुःख 100% गायब होईल आणि तुम्हाला प्रसन्न वाटेल... तुमच्या आवडीचे गाणे ऐकून तुम्ही आनंदी व्हाल... 👍



मित्रांनो, वरील सर्व पॉईंट तुम्हाला आनंदी राहण्यासाठी 100%मदत करतील... 


मित्रांनो, Marathi Motivational Blog वर तुम्ही नवीन असाल तर पेजला नक्की Follow करा... 


✍️✍️ नरेंद्र दिपके 

( Coach of Personality Development )

☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for feedback

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

Motivation आणि Discipline यशाचा खरा मंत्र

थोडं हसायला शिका...