उद्योगपती रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार

उद्योगपती रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार 




👉 नमस्कार मित्रांनो, मित्रांनो  Marathi Motivational Blog वरती तुमचे स्वागत आहे.. 


मित्रांनो, आज 28 डिसेंबर 2021 

आज उद्योगपती रतन टाटा यांचा आज वाढदिवस

उद्योगपती रतन टाटा यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐🌹🌹🌹💐💐


मित्रांनो, रतन टाटा असे एक उद्योजक आहे ज्यांनी केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात भारताचे नाव उंचावले आहे... 


मीठ ते सॉफ्टवेअर पर्यंत सर्व क्षेत्रात रतन टाटानी आपले योगदान दिले...


मित्रांनो, रतन टाटा सर हे एक यशस्वी उद्योगपती आणि गुंतवणूकदार असण्याबरोबरच ते दानशुर व्यक्ती देखील आहेत आहेत... 


जेंव्हा जेंव्हा आपला भारत देश अडचणीत आला, तेंव्हा तेंव्हा या महान उद्योजकाने आपला हात समोर केला आहे... 


Corona मध्ये सुद्धा रतन टाटानी  कोरोना रोखण्यासाठी तब्ब्ल 500 कोटीची मदत केली होती... 


मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण रतन टाटायांचे प्रेरणादायी विचार आपण पाहणार आहोत, प्रेरणादायी विचार वाचणार आहोत...


1) योग्य निर्णय घेण्यावर माझा कधीच विश्वास नाही. माझा विश्वास घेतलेला निर्णय सिद्ध करण्यावर आहे.. 


2) जीवनात पुढे जाण्यासाठी, चढ - उतार फार महत्वाचे आहेत.  अगदी हॉस्पिटलमध्ये ई. सी. जी.  म्हणजे सरळ रेषा व्यक्ती मृत मानली जाते.. 


3) जर तुम्हाला वेगवान चालायचे असेल तर एकट्यानेच चाला पण जर तुम्हाला यशाच्या पलीकडे जायचे असेल तर सर्वांसोबत घेऊन चाला. 


4) आपण यशस्वी लोकांकडून प्रेरणा घेतली पाहिजे की, जर ते यशस्वी होऊ शकतात तर मग आपण यशस्वी का होऊ शकत नाही...? परंतु प्रेरणा घेताना आपण आपले डोळे उघडे ठेवले पाहिजेत.


5) प्रत्येकजण कठोर परिश्रम करतो पण काही यशस्वी लोकही असतात. म्हणून तुम्ही यशस्वी लोकांप्रमाणे काम केले पाहिजे. 


6) प्रत्येक व्यक्तीमध्ये नक्कीच काही ना काही प्रतिभा असते, म्हणून आम्हाला त्या त्या प्रतिभेची ओळख पटविणे आणि त्यावर कार्य करणे आवश्यक आहे.. 


7) आपल्या खराब सवयीबद्दल गंभीरतेने विचार करा. त्याबद्दल जेवढं गरज आहे तेवढंच घ्यायची सवय लावा... 


8) महान बनणे म्हणजे लहान लहान गोष्टी करणे ज्याने देश आणखी मजबूत होईल, जसे पाण्याचं अपव्यय न करणे, विजेची बचत करणे, आणि तेवढेच घेणे जेवढे आवश्यकता आहे. अशी लहान पाहुलंच आपल्या देशाला महान बनवुन आपण महासत्ते कडे जाऊ. 


9) आपल्याला जे काम करायला आवडते ते कार्य आपण केले पाहिजे आणि तेच काम वेळेवर केले पाहिजे.


10) जर तुमचे निर्धार पक्के असेल आणि सोबत परिपूर्णता असेल तर यश तुमच्या मागे येईल.


11) कोणीही लोखंडाचा नाश करू शकत नाही परंतु माणसाचा नाश करण्यासाठी माणसाची स्वतःची मानसिकता आणि विचार पुरेसे आहे.. 


12) एक चांगले शिक्षण आणि चांगले करियर आयुष्यात पुरेसे नसते. आपल्या जीवनाचे ध्येय असावे जेणेकरून आपण संतुलित आणि यशस्वी आयुष्य जगु शकाल. 


13) आपण स्वतःला प्रोत्साहित करू इच्छित असाल तर आपण नेहमी नवीन गोष्टी जाणून घेण्यास उत्सुक असतो, प्रश्न विचारू शकता नवीन कल्पनाबद्दल विचार कराल आणि कोणी आपल्याकडे येईल तेंव्हा त्यांचे अनुसरण करण्यास मोकळ्या मनाने तयार असाल... 


14) प्रत्येकास माहीत आहे की प्रत्येकाकडे समान पात्रता नसतात परंतु आपल्यात कौशल्य विकसित करण्याच्या समान संधी आहेत.


15) सत्ता आणि संपत्ती ही माझी मुख्य तत्वे नाहीत.. 


मित्रांनो, आशा करतो की, उद्योगपती रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार तुम्हाला नक्की आवडले असतील...  तर हे विचार तुमच्या मित्रांसोबत सुद्धा  share करा... 👍


मित्रांनो, Marathi Motivational Blog वर तुम्ही नवीन असाल तर  पेजला नक्की Follow करा... 


भेटूयात पुढच्या लेखामध्ये... धन्यवाद 🙏



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for feedback

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट