2022 नवीन वर्षाच्या नवीन संकल्पना...
2022 नवीन वर्षाच्या नवीन संकल्पना...
👉 नमस्कार मित्रांनो, Marathi Motivational Blog मध्ये तुमचे स्वागत आहे...
मित्रांनो, नवीन वर्षाच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा,
2022 हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंद, प्रेम, उत्साह घेऊन येवो,
आणि वर्षाचे 365 दिवस मजेदार जावोत नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
मित्रांनो, आजचा लेख सर्वांसाठी खुप महत्वाचा आहे, आजच्या लेखामध्ये आपण नवीन वर्षाच्या नवीन संकल्प करणार आहोत...
मित्रांनो, माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या...
तुम्ही तुमच्या जीवनात आनंदी आहात का...?
2021 वर्षामध्ये स्वतःला बदलण्यासाठी तुम्ही काय काय केले... असा प्रश्न स्वतःला नक्की विचारा
मित्रांनो, तुम्हाला तुमचे जीवन खरोखर बदलायचे असेल तर सर्वात प्रथम वेळेचा सदुपयोग करायला शिका... आणि स्वतःला प्रॉमिस करा... 31 डिसेंबर 2022 पर्यंत तुम्ही ठरवलेल्या सर्व संकल्प पूर्ण कराल...
मित्रांनो, आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला काही संकल्पना सांगणार आहे... त्या संकल्पना वाचा आणि ज्या संकल्पना तुम्हाला आवडतील त्या आजपासुन Follow करा... 👍
1) स्वतःवर प्रेम करा...
👉 मित्रांनो, 2022 या नवीन वर्षामध्ये ठरवा मी माझ्या स्वतःवर प्रेम करेल...
मित्रांनो, तुम्हाला जर मी 5 करोड रुपये दिले तर तुम्ही तुमचे दोन्ही हात मला द्याल का...?
10 करोड रुपये दिले तर तुम्ही तुमचे दोन्ही डोळे द्याल का...?
नाही ना...
मित्रांनो, आपले शरीर आपल्यासाठी खुप अनमोल आहे... त्यामुळे मोटारसायकल चालवताना स्पीड कमी ठेवा...
मी आशा खुप लोकांना पाहिले ज्यांचे Accident मध्ये दोन्ही हात गेलेले आहेत...
मित्रांनो, 2022 या नवीन वर्षामध्ये संकल्पना करा की, तुम्ही मोटारसायकल, कार हळु चालवाल, आणि स्वतःवर प्रेम कराल, स्वतःची काळजी घ्याल... 👍
2) पैसाची बचत करा... & पैसाचे नियोजन करा
👉 मित्रांनो, फालतु गोष्टीसाठी पैसे खर्च करू नका, ज्या गोष्टी खुप महत्वाच्या आहेत अशाच गोष्टीसाठी पैसे खर्च करा...
पैसाची बचत करायला शिका... पैसाचे नियोजन करा... तुम्ही जर रोजचे 100 रुपयाची पण बचत केली तर महिण्याचे 3000 रुपये एक्सट्रा तुमच्याकडे जमा राहतील. आणि वर्षाचे 36000 हजार रुपये तुमच्याकडे शिल्लक राहतील, जमा राहतील...
3) व्यसनांपासुन दुर रहा...
👉 मित्रांनो, 2022 मध्ये स्वतःला प्रॉमिस करा की, तुम्ही तुमचे सर्व वाईट व्यसन सोडुन द्याल... आणि व्यसनांपासून दुर राहा, आणि वाईट मित्रांसोबत जास्त राहु नका... पुस्तके वाचणाऱ्या मित्रांसोबत मैत्री करा...
4) चांगल्या सवयी लावा...
👉 मित्रांनो, माणसाच्या सवयीच माणसाला घडवत असतात, त्यामुळे स्वतःला चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करा...
जसे की, रोज सकाळी लवकर उठणे, रोज व्यायाम करणे, रोज पुस्तके वाचणे, वेळेचे नियोजन करणे... ह्या सर्व सवयी स्वतःला लावा...
5) वडीलधाऱ्यांना मान द्या.
👉 मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीसोबत प्रेमाने वाघा... आणि प्रेमाने बोलण्याची सवय स्वतःला लावा... वडीलधाऱ्या माणसांना मान द्या त्यांच्याशी मोठ्या आवाजात बोलु नका... प्रत्येक मोठ्या व्यक्तीचा आदर करा, त्यांची मदत करा...
6) ध्येय ठरवा...
👉 2022 या नवीन वर्षात तुम्हाला कोण कोणत्या गोष्टी प्राप्त करायच्या त्या गोष्टीची यादी तयार करा...
एक निश्चित ध्येय ठरवा आणि त्या ध्येयानुसार काम करा... जसे की या वर्षी मी ठरवलं मला कार शिकायची आहे... कार शिकणे हे झालं माझे 2022 चे Goal... याप्रमाणे तुम्ही सुद्धा एखादे Goal ठरवा
7) मेडिटेशन करा...
👉 रोज सकाळी आणि संध्याकाळी मेडिटेशन करण्याची सवय लावा...
शांत रूममध्ये जा, डोळे लावा आणि दहा मिनिटे शांत बसा...
मेडिटेशन करण्याच्या सवयीमुळे तुमचे मन शांत होईल, तुम्हाला कोणत्याच कामात चिडचिड पणा वाटणार नाही...
2022 या नवीन वर्षी मेडिटेशन करण्याची सवय स्वतःला लावा.
8) पुस्तके वाचा...
👉 मित्रांनो, नवीन वर्षामध्ये तुम्हाला कोणता संकल्प करायचा असेल तर पुस्तके वाचण्याचा संकल्प करा....
स्वतःला घडवण्यासाठी पुस्तके वाचणे खुप आवश्यक आहे...
या जगात जेवढे पण श्रीमंत लोक आहेत ते सुद्धा रोज पुस्तके वाचतात... पुस्तके वाचल्यामुळेच ती मंडळी श्रीमंत झालेली आहे...
मित्रांनो या नवीन वर्षात पुस्तके वाचण्याचा संकल्प नक्की करा...
9) सकाळी लवकर उठा...
👉 मित्रांनो, सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, मेडिटेशन करणे या साऱ्या गोष्टीची सवय स्वतःला लावा...
जसे जेवण शरीरासाठी आवश्यक आहे तसेच व्यायाम करणे सुद्धा खुप खुप आवश्यक आहे...
तुम्हाला निरोगी जीवन जगायचं असेल तर रोज सकाळी 5 वाजता उठा...
10) वेळेचे नियोजन करा...
👉 मित्रांनो, नवीन वर्षांमध्ये तुम्ही केलेल्या संकल्पना तेंव्हाच नक्की होतील जेंव्हा तुम्ही 24 तासाचे नियोजन कराल...
मित्रांनो, कोणत्या कामासाठी किती वेळ द्यायचा हे अगोदर ठरवा आणि त्यानुसार वेळेचे नियोजन करा... आणि 24 तासाचा भरपूर उपयोग करा... आणि सोशल मीडियाचा वापर कमी करा, कारण आपला किंमती वेळ सर्वात जास्त सोशल मीडियामध्ये जातो... 👍
मित्रांनो, वरील सर्व संकल्पना वाचा आणि स्वतःच्या जीवनात लागु करा आणि त्यानुसार काम करा, तुमचे जीवन नक्की बदलेल 👍
मित्रांनो, आशा करतो की, आजचा लेख तुम्हाला आवडला असेलच, लेख आवडला असेल तर नक्की कंमेंट्स करा... 👍
पुन्हा एकदा नवीन वर्षाचा तुम्हाला खुप खुप शुभेच्छा... 💐💐
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
khup chan great
उत्तर द्याहटवा