प्रेरणादायी गोष्ट :- असली आणि नकली हिरा
प्रेरणादायी गोष्ट :- असली आणि नकली हिरा
नमस्कार मित्रांनो, कसे आहात मित्रांनो, मजेत आणि आनंदात आहात ना...
मित्रांनो, आज आपण एक नवीन प्रेरणादायी गोष्ट वाचणार आहोत, पाहणार आहोत...
या प्रेरणादायी गोष्टीचे नाव आहे:- असली आणि नकली हिरा
मित्रांनो, एक राजा असतो तो खुप दयाळु आणि प्रेमळ असतो...
त्या राजाचे त्याच्या प्रजेवर खुप प्रेम होते...
राजा नेहमी दरबार भरत होता आणि प्रजेच्या समस्याचे समाधान करत असे...
हिवाळ्याचा ऋतू सुरु असतो आणि थंडीचे दिवस असतात, त्यामुळे राजाने त्याचा दरबार महालात न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतो...
सूर्याच्या कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली असते, कामकाज सुरु होते, इतक्यात तिथे बाहेरगावाहून एक माणुस येतो, तो राजाला म्हणतो....
महाराज, माझ्याजवळ दोन वस्तु आहेत. त्यात एक नकली आहे आणि एक असली आहे.मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय. आजवर एकानेही असली वस्तु ओळखली नाही ती जर तुमच्यापैकी कोणी ओळखली तर ती वस्तु तुमच्या खजिन्यात मी आनंदाने जमा करेन, मात्र कोणीच ओळखली नाही तर त्या असली वस्तुच्या किंमती इतके धन तुम्ही मला दिले पाहिजे, आजवर माझे हे आव्हान कोणीही जिंकु शकले नाहीये.
जमलेल्या लोकात उत्सुकता पसरते की काय असेल ती वस्तु... शेवटी राजा तयार होतो. राजाच्या समोरच्या मंचावर तो माणुस आपल्या थेली मधुन दोन वस्तु काढुन ठेवतो. दोन्ही वस्तु एक सारख्या असतात. त्या दोन वस्तु मध्ये जरा ही फरक नसतो. एक सारखा रंग, आणि सारखाच प्रकाशमान...
राजा म्हणतो, त्यात काय अवघड आहे...? या दोन्ही वस्तु समानच आहेत. ते दोन्ही हिरे आहेत.
तो माणुस म्हणतो, नाही महाराज, त्या दोन हिरा मधुन एक हिरा नकली आहे, व एक हिरा असली आहे..
आता मात्र सगळेच चकित होतात, जवळून अनेकजण निरीक्षण करतात. कोणालाच ओळखू येत नाही. शेवटी राजाही प्रयत्न करून पाहतो तोही हरतो. मग ठरल्या प्रमाणे त्या असली हिऱ्याच्या किंमती इतके धन त्या माणसाला देण्याची वेळ येते.
इतक्यात प्रजेपैकी एक आंधळा माणुस उठतो आणि म्हणतो महाराज तसेही आपण आव्हान हरलो आहोत. मग एक शेवटची संधी मला द्या. जिंकलो तर आपला फायदा आहेच आणि हरलो तर तसेही तुम्ही धन देण्याची तयारी केली आहे.
राजा क्षणभर विचार करतो आणि त्या अंध व्यक्तीला परवानगी देतो. अंध व्यक्ती दुसऱ्या एका माणसाच्या मदतीने त्या मंचावर येतो. दोन्ही वस्तूवरून हात फिरवतो आणि एका झटक्यात सांगतो की, हा असली हिरा आहे आणि तो नकली आहे...
सगळेच चकित होतात. विशेतः तो माणुस देखील चकित होतो. कारण आजवर कुणालाच जे जमले नाही ते एका अंधाला कसे जमले असेल...?
पण शेवटी ठरल्या प्रमाणे तो असली हिरा राजाला देऊन तो माणुस या अंध व्यक्तीला विचारतो, की बाबारे तु कसे ओळखले...?
यावर हसुन अंध व्यक्ती म्हणतो सोप्प आहे, मी हात लावुन पाहिल्यावर त्यातला एक थंड होता आणि दुसरा गरम...
जो थंड होता तो हिरा आणि जो गरम झाला होता तो नकली होता... कारण काच जास्त गरम होते. हिरा तितका गरम होत नाही...
दरबार मध्ये टाळ्याचा कडकडाट होतो आणि अंध व्यक्तीच्या पायाशी तो माणुस वाकून नमस्कार करतो...
तात्पर्य :- मित्रांनो, जो माणुस वेळोवेळी गरम होत असतो, तो काच समजावा आणि जो विपरीत परिस्थितीत देखील थंड ( म्हणजे शांत ) राहतो तो हिरा समजावा... त्याच्याशी मैत्री वाढवावी. अशामुळेच आपल्या आयुष्याचे सोने होते... जेंव्हा पण तुमच्या जीवनात समस्या येतील तेंव्हा हिरा सारखं शांत रहा... शांत राहुनच प्रत्येक समस्याच समाधान मिळत असते...
मित्रांनो, आशा करतो की आजची प्रेरणादायी गोष्ट तुम्हाला आवडली असेलच... गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत प्रेरणादायी गोष्ट share करा...
धन्यवाद... 🙏
Nice
उत्तर द्याहटवाNicesbro
उत्तर द्याहटवा