दुसऱ्यांसाठी चांगल्या सवयी सोडू नयेत.

 

दुसऱ्यांसाठी चांगल्या सवयी सोडू नयेत. 

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो Marathi Motivational Blog पेज वर तुमचे स्वागत आहे... 


मित्रांनो, आज आपण प्रेरणादायी गोष्ट वाचणार आहोत... आजची गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल... 


👉 मित्रांनो, एका गावात एक माणुस राहत होता. तो नेहमी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना नमस्कार करायचा. तसा तो चांगला होता म्हणजे लोकांना नमस्कार करून त्यांच्याकडुन काही काम करून घेण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. 


पण तरीही त्याच्या  या सवयीच लोकांना खुप कुतूहल वाटे 


एक दिवस त्या गावात नवीन व्यक्ती आला तो व्यक्ती खुप खडूस होता त्या व्यक्तीला नमस्कार करणाऱ्या व्यक्तीबद्दल काहीच माहिती नव्हते. त्यामुळे त्या चांगल्या व्यक्तीने नमस्कार जरी केला तरी तो खडूस व्यक्ती नमस्कार करणाऱ्या व्यक्तीला शिव्या देई, कधी कधी रस्त्यात त्यांची भेट होई त्यावेळेस तो चांगला व्यक्ती नमस्कार करत असे आणि तो खडूस व्यक्ती त्याला नेहमी शिव्या देई... 


हे सर्व दृश्य गावातील लोक नेहमी पाहत आणि एक दिवस त्या गावातील एका माणसाला खुप राग आला आणि त्याने त्या खडूस व्यक्तीला बर भुल सुनावलं आणि  समजावून सांगितलं 


त्या खडूस व्यक्तीला त्याची चुक लक्षात आली... आणि त्याने नमस्कार करणाऱ्या व्यक्तीला माफी मागितली... 


गावातील त्या एका व्यक्तीने त्या चांगल्या माणसाला जवळच्याच एका हॉटेलात चहा प्यायला  घेऊन गेला.. 


चहा घेता घेता त्या माणसाने त्या व्यक्तीला विचारलं की, भाऊ मी बरेच दिवस पाहतो की, तो माणुस प्रत्येक वेळी तुम्हाला शिव्या देत असतो. तरीही तुम्ही प्रत्येक वेळेस त्याला नमस्कारच  करता... 


प्रत्येकाला नमस्कार करणारा तो चांगला व्यक्ती गालातल्या गालात हसला आणि म्हणाला जर तो माणुस त्याच्या वाईट सवयी सोडू शकत नाही. तर  मग मी माझ्या चांगल्या सवयी त्याच्यासाठी का सोडू...


तात्पर्य :- दुसऱ्यांसाठी आपण आपल्याला चांगल्या सवयी सोडायला नको.


मित्रांनो, आशा करतो की आजची गोष्ट तुम्हाला आवडली असेलच... गोष्ट आवडली असेल तर नक्की कंमेंट्स करा आणि Marathi Motivational Blog या पेजला Follow करा... धन्यवाद 🙏

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for feedback

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट