नवीन प्रधानची निवड...

 


मित्रांनो, एक राजमहल असतो त्या राजमहलामध्ये आणि राज्यामध्ये   सर्वत्र प्रेम,  सुख,  शांती असते...


असेच, काही वर्ष निघुन जातात. आणि राजाच्या दरबार मधला प्रधान म्हतारा होतो. आणि आपले शेवटचे वर्ष आपल्या नातू नात्यान सोबत राहायचा विचार करतो... आणि त्याचा विचार तो राजाला सांगतो. 


राजा, प्रधानला म्हणतो... प्रधानजी तुम्ही तुमचे पद सोडू शकता परंतू  त्याआधी तुम्हीच या राजदरबारला नवीन प्रधानमंत्री निवडा... 


👉 राजाच्या म्हणण्यानुसार प्रधान त्यांच्या पूर्ण राज्यात दवंडी द्याला  लावतो आणि सांगतो की ज्या व्यक्तीला नवीन प्रधान बनायचं आहे त्यानी उद्या सकाळी 10 वाजता राजदरबार मध्ये हजर राहावे... 


पुढच्या दिवसी, राजदरबार मध्ये 4 व्यक्ती हजर असतात... 


प्रधान त्या चारही व्यक्तीचे स्वागत करतो आणि म्हणतो थोड्या वेळाने तुमची परीक्षा होईल आणि प्रत्येकाला परीक्षा द्यावीच लागणार आहे... एवढे बोलुन प्रधान चालला जातो... 



आता चार ही व्यक्ती एकमेकांन सोबत बोलत असतात 


👉 पहिला व्यक्ती बाकी तिघांना सांगतो... मी 40 पेक्षा जास्त वेगवेगळे पुस्तक वाचलेले आहेत. त्यामुळे ही परीक्षा मीच पास होणार 


दुसरा व्यक्ती म्हणतो, मी सुद्धा काही पुस्तके वाचलेले आहेत त्यामुळे ही परीक्षा मीच पास होईल... अशी चर्चा ते चारजण  करत असतात... 


थोड्या वेळात प्रधान येतो. आणि त्या चार जणांना सांगतो तुम्हाला एक बंद रूममध्ये ठेवण्यात येत आहे.  त्यारूमला 2 दरवाजे आहेत... प्रत्येक दरवाजाला आतुन कुलूप लावलेले आहे... 


तुम्हाला ते कुलूप उघडून बाहेर यायचं आहे... जो व्यक्ती सर्वात आधी बाहेर येईल त्याला प्रधानमंत्री बनवण्यात येईल... 


आता, त्या चारही व्यक्तीला वेगवेगळ्या बंद रूममध्ये ठेवण्यात येते... 


👉 पहिला जो व्यक्ती असतो तो खूप हुशार असतो. त्याने 40 पेक्षा जास्त पुस्तके वाचलेले असतात... काही पुस्तके त्याच्या जवळ सुद्धा असतात... त्यामुळे तो विचार करतो की, कुलूप उघडण्याचा मार्ग या पुस्तकामध्ये नक्की असेल आणि तो त्याच्या जवळचे सर्व पुस्तक वाचतो / पाहतो...  खूप वेळ निघुन जाते तरी सुद्धा त्याला काही मार्ग सापडत नाही... 


👉 दुसरा व्यक्ती तो सुद्धा कुलूप उगडण्याचा मार्ग पुस्तकामध्ये पाहत बसतो... 



👉 तिसरा,  व्यक्ती स्वतःला बोलतो की, मला तर प्रधानमंत्री बनायचंच नव्हतं मी तर एन्जॉय करण्यासाठी येथे आलो आहे... तो व्यक्ती त्याच्या रूममध्ये ठेवलेले वेगवेगळे पक्क्वान मस्त खातो, फळे खाऊन टाकतो आणि मस्त झोपून जातो... 😴


👉  चौथा व्यक्ती सर्वात अगोदर शांत बसतो आणि  विचार करतो की, कुलूप आतुन सुद्धा लावेल आहे आणि बाहेरून सुद्धा... 


आतले कुलूप उघडण्याचा मार्ग नक्की याच रूममध्ये असेल किंवा त्याच कुलूपा मध्ये काही तरी मार्ग नक्की असेल...

आपण सर्वात आधी कुलूप पाहुयात.... तो व्यक्ती कुलूपा जवळ जातो आणि कुलुपाला थोडं ओढून पाहतो... जसा तो कुलुपाला हात लावतो तसे कुलूप उघडते... त्याचा लक्षात येते की कुलूप तर लावलेले नाही... 


 तो कुलूप उघडते आणि रूमच्या बाहेर येतो आणि त्याला पाहुन प्रधान खूप आनंदी होतो आणि त्याला राजदरबार मधला नवीन प्रधानमंत्री बनवण्यात येते... 


 👉 मित्रांनो, गोष्टीचे तात्पर्य काय आहे. हे तुमच्या लक्षात आलेच असेल 


मित्रांनो, 10 वर्षाआधी तुम्ही कुठे नोकरी करायला गेले किंवा इंटरव्हिव्ह द्याला गेले तर तेथे तुमचे कॉलेजचे मार्ग विचारल्या जायचे... 


परंतु 

👉 आता तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये जा तेथे तुमचे Skills पाहिल्या जाते... आजच्या जगात त्याच लोकांना जॉब मिळतो ज्याच्या मध्ये काही तरी Skills असेल... त्यामुळे स्वतःमध्ये Skills डेव्हलोप करा आणि  क्रीटीव्ह माईंडसेट वाले व्यक्ती बना. मग पाहा तुम्हाला ऑटोमॅटिक खूप साऱ्या संध्या दिसतील... 😊


✍️✍️ नरेंद्र दिपके 

( Coach Of Personality Development )

☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट