नेहमी Gratitude रहा...
नेहमी Gratitude रहा...
👉 मित्रांनो, एक वडील आणि त्यांचा 15 वर्षाचा मुलगा एका रेल्वे मध्ये बसलेले असतात. थोडयावेळाने रेल्वे सुरु होते. मुलगा खिडकी बाहेर पाहतो आणि वडिलांना प्रश्न विचारतो. बाबा बाबा हे काय आहे. बाबा सांगतात बेटा ते झाडे आहेत.
पुन्हा थोड्या वेळाने मुलगा प्रश्न विचारतो, बाबा बाबा हे काय आहे... बाबा म्हणतात बेटा ते पक्षी आहेत.
पुन्हा थोड्या वेळाने मुलगा प्रश्न विचारतो बाबा बाबा हे काय आहे. त्यावर वडील म्हणतात बेटा ते पर्वत आहेत.
मुलगा पुन्हा थोड्या वेळाने प्रश्न विचारतो बाबा बाबा हे काय आहे. बाप मुलाला म्हणतो बेटा ते तलाव आहे...
👉 हे पाहुन समोरच्या सीटवर बसलेला व्यक्ती त्या मुलाच्या बापाला म्हणतो तुम्ही या पागल मुलाचा इलाज का नाही करत.???
त्यावर वडील म्हणतात माझ्या मुलाचे कालच डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे... आणि आज तो हे नवीन जग पाहत आहे... 😊
👉 मित्रांनो, एक विचार करा जो व्यक्ती हे जग पाहु शकत नाही. त्याच्यासाठी हे जग कसे असेल... तो व्यक्ती देवाच्या मंदिरात गेल्यावर देवाला काय मागत असेल.??? यावर थोडा विचार करा...
आंधळा व्यक्ती देवाच्या मंदिरात गेल्यावर देवाला एकच विनंती करेल... देवा तु बनवलेले हे सुंदर जग मला पाहायचं आहे... मला फक्त डोळे दे बाकी काहीच देऊ नको...
ज्या व्यक्तीला हात नाही, तो सुद्धा देवाला हात शिवाय दुसरे काही मागत नाही...
👉 मित्रांनो, सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की, आपल्याला आपले सर्व शरीर गिफ्ट मिळालेले आहे. आपल्याला दोन डोळे आहेत. दोन हात आहेत. दोन पाय आहेत. तरी सुद्धा खूप लोक दुःखी आहेत. दुःखी जीवन जगत आहे... असं का???
मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की दुःख फक्त गरिबांना असते तर तसे काही नाही. मी स्वतः खूप श्रीमंत लोकांना कोणतेही कारण नसताना दुःखी पाहिलेले आहे.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. गरजेपेक्षा मिळालेले सुख हे दुःखाचे कारण बनतं असते...
आज तुम्ही ज्या कोणत्या पदावर असाल, सुखी असाल किंवा दुःखी असाल, तुम्ही स्वतःच्या घरात राहत असाल किंवा रूम करून राहत असाल...
तुमच्या जवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी Gratitude राहायला शिका.
आता तुम्ही हा लेख वाचत आहात याचा अर्थ तुम्ही बरोबर पाहु शकता. ऐकू शकता.तुमच्या जवळ मोबाईल आहे इंटरनेट आहे. या सर्व गोष्टीसाठी देवाला धन्यवाद म्हणा... आणि स्वतःला सांगा i am lucky man
ज्या गोष्टी तुमच्या जवळ नाहीत. त्याचा विचार करू नका. तुमच्या जवळ ज्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याचासाठी Gratitude रहा.
👉 रात्री जेवताना जेवणाच्या ताटात जी भाजी भाकर असेल त्यासाठी देवाला धन्यवाद म्हणा... खूप लोक जेवताना विचार करतात. भाजी दुसरी असती तर या जागी दुसरे पदार्थ असते तर असा विचार करतात. असे विचार करून एक तर तुम्ही तुमच्या समोर असलेल्या जेवणाचा अपमान करत आहात. दुसरी गोष्टी अशी की तुम्हाला त्या जेवणाची चवच लागणार नाही. 😄
त्यामुळे जेवण करताना देवाला धन्यवाद म्हणा... कारण खूप लोक असे आहेत ज्यांना एक टाइमच जेवण सुद्धा मिळत नाही... तुम्हाला रोज पोटभर जेवण मिळत आहे. त्यासाठी देवाला धन्यवाद करा.
सुंदर जग पाहण्यासाठी देवाने आपल्या सर्वांना सुंदर दोन डोळे दिले आहेत... डोळयांनी चांगल्याच गोष्टी पाहायला शिका. कानांनी चांगल्याच गोष्टी ऐका. तोंडाने चांगल्याच गोष्टी बोला.. आणि जेंव्हा तुम्ही श्रीमंत व्हाल पैसे कमवाल तेंव्हा थोडे फार पैसे दान करायला शिका... तुम्ही दान केलेल्या पैसामधुन खूप लोकांना मदत होईल.खूप मुलाना नवीन जग पाहायला मिळेल...❣️
👉 मित्रांनो, आजचा लेख वाचल्यानंतर तुमच्याजवळ ज्या ज्या वस्तु गोष्टी आहेत त्याची यादी बनवा... तुम्ही असे पण लिहु शकता. माझे आई बाबा माझ्या सोबत आहेत. आणि ते सुखरूप आहेत. यासाठी देवा तुझे धन्यवाद. खूप लोकांना आई बाबा नसतात त्यामुळे तुम्हाला आई बाबा आहेत त्यासाठी नेहमी Gratitude रहा...
जेंव्हा तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी Gratitude राहता. आणि आनंदी राहायला शिकता तेंव्हा तुम्हाला हव्या असलेल्या प्रत्येक वस्तु तुमच्याकडे येत असतात. त्यामुळे नेहमी आनंदी रहा आणि प्रत्येक गोष्टीसाठी Gratitude रहा. 😊
आजचा लेख आवडला असेल तर नक्की फीडबॅक द्या...
( मित्रांनो, लेखामध्ये सांगितलेल्या टिप्स तुमच्या उपयोगी असतील तरच Follow करा. जर टिप्स उपयोगी वाटत नसतील तर बिन्दास्त पणे सोडुन द्या...)
विशेष
📌 मित्रांनो 3 ऑगस्ट 2022 पासुन Time Management कोर्सची नवीन Batch सुरु होत आहे. पूर्ण कोर्स 10 दिवसाचा आहे. मागच्या Batch मध्ये ज्या व्यक्तीला सहभाग घेता आला नाही ते व्यक्ती या Batch ला सहभाग घेऊ शकता.... 🎯
WhatsApp No : 9545441697
धन्यवाद... 🙏
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach Of Personality Development )
☎️☎️ 9545441697
Atyanyt Sundar paddhtine lihayala lekh kharach krutadhyanta jeevanat killi aste
उत्तर द्याहटवा